
जळगाव : जळगावमध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे. आज पुन्हा एकदा भिषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. एरंडोल-भडगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भिषण होता की अपघातामध्ये दुचाकीचा चकनाचूर झाला आहे. अपघातानंतर वाहनचालक गाडीसह फरार झाला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल – भडगाव रस्त्यावर अज्ञात भरधाव वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीयेत. वाहन चालक फरार झाला असून, घटनेचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातामध्ये दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान जळगाव जिल्ह्यात एकाच आठवड्यात तीन भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या तीन अपघातात मिळून दाहा ते बारा जणाचा मृत्यू झाला आहे. पहिले दोन अपघात हे जामनेर परिसरात घडले आहेत. तर हा अपघात एरंडोल-भडगाव रस्त्यावर झाला. गुरुवारी रात्री अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली, या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Nagpur | सामूहिक बलात्कार प्रकरण : अडीच महिन्यांपासून आरोपी फरार; कसे आले पोलिसांच्या जाळ्यात?
Sangli Accident | दोन गाड्यांची समोरासमोर धडक, दाम्पत्यासह तिघांचा मृत्यू, कारचा चक्काचूर