Narpar Project : ‘मला वेड्यात काढणारी लोकं आज….’, ‘नारपार’साठी झपाटलेले विश्वासराव भोसले यांची Exclusive मुलाखत

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी झटणाऱ्या माणसांची संख्या मोठी आहे. यामध्ये अनेक सामाजिक संघटना, माजी मंत्री प्रशांत हिरे, आमदार एकनाथ खडसे यांच्यापासून अनेक दिग्गज माणसं या योजनेसाठी पाठपुरावा करत आहेत. यापैकी आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे विश्वासराव भोसले. "या प्रकल्पासाठी मला वेड्यात काढणारी लोकं आज नारपार आंदोलनात उतरली याचा मला आनंद आहे", असं विश्वासराव भोसले सांगतात.

Narpar Project : मला वेड्यात काढणारी लोकं आज...., नारपारसाठी झपाटलेले विश्वासराव भोसले यांची Exclusive मुलाखत
'नारपार'साठी झपाटलेले विश्वासराव भोसले यांची Exclusive मुलाखत
| Updated on: Sep 07, 2024 | 9:39 PM

दशरथ माँझी हे नाव आपण ऐकलं असेल किंवा दशरथ माँझी यांची कथा नक्कीच ऐकली असेल. या माणसाला भारताचा ‘माऊंटन मॅन’ म्हणून ओळखलं जातं. कारण या माणसाने एकट्याने डोंगर फोडून रस्ता बनवला. या माणसाला रस्ता बनवण्यासाठी 22 वर्षे लागली. पण हा माणूस खचला नाही. दशरथ माँझी यांनी सुरुवात केली तेव्हा अनेकांनी त्यांना वेडं ठरवत हेटाळणी केली. पण दशरथ माँझी यांनी हार मानली नाही. वेडेच इतिहास घडवतात ही म्हण त्यांनी खरी ठरवली. दशरथ माँझी यांच्यासारखं झोकून देवून काम करणारी माणसं आजही हयात आहेत. महाराष्ट्रातही असाच एक सर्वसामान्य माणूस गेल्या तीन दशकांपासून नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी काम करत आहे. विश्वासराव भोसले असं या दिग्गज व्यक्तीचं नाव आहे. नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प यशस्वी व्हावा, असं या माणसाचं स्वप्न होतं. त्यासाठी हा माणूस सातत्याने पाठपुरावा करतोय. विशेष म्हणजे त्यांच्या या लढ्याला आता काहीसं यश मिळताना दिसत आहे. कारण नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास आता मान्यता मिळाली आहे. अर्थात 10.64 टीएमसी पाण्याने खान्देशाची तहान भागणार आहे का? हा चर्चेचा विषय...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा