जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले असून त्यांना एका कंत्राटदाराकडून दहा लाख स्वीकारताना रंगेहात अटक झाल्याचे पुढे आले आहे.

जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक
| Updated on: Oct 16, 2025 | 10:13 PM

जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्तानाच पालिकेच्या बांधकामाचे बिल अदा करण्याच्या बदल्यात कंत्राटदाराकडून १० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक झाल्याची बातमी असून त्याने जालना शहरासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी त्यांच्या मोतीबाग येथील शासकीय निवासस्थानी झडती घेत असून त्यामुळे यात पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून 10 लाखांची लाच घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहेत. महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात पालिका आयुक्तांच्या मोती बाग येथील शासकीय निवास स्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी घराची झडती घेत असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु असल्याचे खात्रीलायक सू्त्रांनी सांगितले आहे.

शासकीय निवासस्थानाची झाडाझडती सुरु

जालना शहरात थेट पालिकेच्या आयुक्तांनाच लाच घेताना लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तक्रारदार हा कंत्राटदार होता. या कंत्राटदाराचे बिल अडकले होते. त्या बिलाच्या संदर्भात पालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दहा लाखाची लाच मागितली. या संदर्भात कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात पालिका आयुक्त खांडेकर रंगेहात लाच स्विकारताना सापडले. तक्रारदाराकडून दहा लाख स्वीकारतान त्यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली आहे. त्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या मोतीबाग येथे अधिाकारी झडती घेत असून पुढील कारवाई सुरु आहे.