Manoj Jarnage: व्हिडिओ व्हायरल करायला सुरूवात करा… जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब, काय शिजला प्लॅन? त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय?
Manoj Jarange Audio Clip: 500 कोटी रुपये दिल्याचा आरोपावर आज मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात ऑडिओ बॉम्ब टाकला आहे. त्यांनी काही ऑडिओ क्लिप ऐकवल्या. त्यातील एका क्लिपमधील संभाषणात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, काय आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये?

Manoj Jarange Audio Clip: मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतानाच आज पत्रकार परिषेदतून ऑडिओ बॉम्ब टाकला. जरांगे पाटील यांनी माध्यमांना एक ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यात जरांगे पाटील यांच्या विरोधात मोहिम राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये अनेक जणांचे आवाज येत आहेत. एकाच कॉलवर अनेक व्यक्तींना जोडण्यात आले होते. त्यात प्रत्येक जण त्याचे मत मांडताना दिसतो. या कथित ऑडिओ क्लिपची टीव्ही9 मराठी कोणतीही पुष्टी करत नाही.
त्या ऑडिओ क्लिपममध्ये काय?
पहिली व्यक्ती: अंधारे, त्या एकदमच खालच्या लेव्हलला आहे. त्या कलाकारच आहेत. त्यांच्या नादाला लागायचंच नाही.
दुसरी व्यक्ती: त्यांच्या नादाला लागूच नये, सगळं जमतंय ना राव पाटील
तिसरा व्यक्ती (महिला) : एक विषय आहे. या चर्चेत एक मुद्दा मांडत आहे. जरांगे पाटील यांना अगोदरच 500 कोटी रुपये पोहचलेले आहेत. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत हे पैसे पोहचले आहेत. आता जरांगे पाटील विधानसभा निवडणूकीत आपल्या फायद्याचे असतील वा नाही? याविषयीचे माझे मत वेगळे आहे आणि तथ्यही वेगळे आहे. तुम्हाला वस्तुस्थिती अधिक चांगल्याप्रकारे माहिती आहे. मला वाटते की, जरांगे पाटील यांचे वैयक्तिक निशाण्यावर देवेंद्र फडणवीस आणि भाजप हेच असेल. बाकी विधानसभेत जरांगे हे आपल्या फायद्याचे तिसरा फ्रंट ठरू शकतो. जरांगे पाटील यांच्या विषयात आपल्याला त्यांच्यावर वैयक्तिक टीका करायचीही नाही आणि त्यांच्याकडून भाजप टार्गेट होईल असंही होऊ द्यायचं नाही. जे विषय आपल्या कामाचे नाहीत, त्यावर आपण अधिक ऊर्जा खर्च करतो, तर जे विषय कामाचे आहेत, त्याकडे दुर्लक्ष करतो. सभेत त्याच्या मुद्दा ठरत नाही. श्रीरामपूरमध्ये एका एससी मुलाला कन्व्हर्ट करण्यात आले. त्याच्या घरात त्याच्या आईवडिलांना धमकावण्यात आले. यावर कोणताही नेता बोलला नाही. माध्यमातही फारसं काही आले नाही. अशा विषयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा आपल्याला या मुद्दांआधारे बाजूला करावे लागतील.
दुसरी व्यक्ती: या विधानानंतर माझ्या मनात, अजयजी बाहेर पडलेत. मला एक सबमिशन करायचं आहे. जरांगे जे आरोप करत आहेत, त्यांना मदत करणाऱ्यांमध्ये भाजपचेही काही नेते आहेत. मला ही माहिती आहे. मग हे भाजपचे लोक थर्ड फ्रंटसाठी काम करत आहेत, की फडणवीसांना बदनाम करण्यासाठी? हा चर्चेचा विषय नाही. श्रीरामपूरचा विषय निघाला म्हणून सांगतो की मी एक बातमी टाकली होती छत्रपती संभाजीनगरची. पण त्यावर ना विखे यांनी मत व्यक्त केले आहे ना संभाजीनगरच्या मराठा नेत्यांनी मत व्यक्त केले आहे. लव्ह जिहादचा हा विषय आहे. एका बँकेच्या कर्मचाऱ्याने मुस्लिम महिलेला त्याच्या दुचाकीवर दुसऱ्या शाखेत नेऊन सोडलं यावरून त्याला तुफान धुतला. पुजा पवार यांना मारणारा मुस्लिमच आहे. तरीही कोणाला निषेध करावा वाटतं नाही. हे भाजपच्या लोकांनी करायला हवे.
तिसरा व्यक्ती (महिला) : श्रीरामपूरमध्ये एका बॅनरवरून श्रीराम हे नाव हटवण्यात आले. व्हिडिओ असताना पण त्याविरोधात कोणीच काही बोलले नाही. कारण आपल्याकडे बोलण्यासाठी माणसचं नाहीत.
चौथी व्यक्ती : एक वोट जिहादचं राजकारण आणि मुस्लिम आक्रमण हा एक मुद्दा आणि दुसरं जे मराठा समाजाचा ओबीसीकरण करा. अशी मागणी जरांगे हे वारंवार करत आहेत. या दोन मुद्दांवर विविध लोकांनी, विविध बॅनरखाली यात्रा नाही, पण प्रचाराची मोहिमच राबवली पाहिजे. अनेक ठिकाणी बैठका, सभा, चर्चा असं जर काही केलं, तर वातावरण ढवळून निघेल, असं मला वाटतं. हे कॅम्पेन प्लॅन करून केलं तर त्याचा चांगला परिणाम होईल.
दुसरी व्यक्ती: खूप महत्त्वाचा विषय मांडलात. यापूर्वी सुद्धा आपण याविषयी सातत्याने चर्चेत मुद्दा मांडत आलो आहोत. पाच- सात कार्यक्रम केलेत आपण काही लोकांना सोबत घेऊन. अजून आपण करू शकतो. हे कॅम्पेन करायला फार काही लागत नाही. म्हणजे आमची तयारी आहे, त्याविषयात कॅम्पेन करायची.