Manoj Jarange: ऑडिओ बॉम्बनंतर आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत मनोज जरांगे यांचा मोठा डाव! म्हणाले दोन दिवस उशीर पण….

Manoj Jarange On Maratha Reservation Agitation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ बॉम्ब टाकताच भाजप आणि शिंदे सेनेत चकमक सुरू झाली. आता मराठा आरक्षण आंदोलनाविषयी जरांगे पाटील यांनी मोठा डाव टाकला आहे.

Manoj Jarange: ऑडिओ बॉम्बनंतर आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत मनोज जरांगे यांचा मोठा डाव! म्हणाले दोन दिवस उशीर पण....
ऑडिओ बॉम्बनंतर आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत मनोज जरांगे यांचा मोठा डाव! म्हणाले दोन दिवस उशीर पण....
| Updated on: Oct 24, 2026 | 6:36 AM

Manoj Jarange On Maratha Reservation Agitation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी ऑडिओ बॉम्ब टाकला. 500 कोटी रुपये कोणी कोणाला दिले? यावरून वादाची ठिणगी पडली. शिंदे सेना आणि भाजप नेत्यांमध्ये कलगीतूरा सुरू झाला. दोन अडीच वर्षांपूर्वीच्या या ऑडिओ क्लिपमधून आपण शहाणे झालो आता मराठा समाजानेही शहाणे व्हावे असे जरांगे म्हणाले. त्यांनी आता मराठा आरक्षण आंदोलनाविषयी मोठी भूमिका घेतली आहे.

कट्टर मराठा सेवकांची फळी

Loading...

ऑडिओ रेकॉर्डिंगनंतर आता अधिक शहाणा झालोय. मराठा समाजाने सुद्धा शहाणे व्हावे लागेल. आता कट्टर मराठा सेवकांची फळी तयार करणार आहे. प्रत्येक विभागात मराठा सेवकाची फळी तयार करण्यात येईल. मराठा सेवकांना एक व्हॉट्सॲप क्रमांक दिला जाणार आहे. सध्या कोण फुटला आणि कुठे गेला हे कळत नाही. आंदोलन चार दिवस उशिरा करू, पण मराठा सेवकांची फळी तयार करण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणात अनेक अडचणी उभ्या केल्या

आम्ही इमानदारीने काम केलं. पण तुम्ही आमच्यासोबत जीव घेणे डाव टाकले. आम्ही आरक्षण मागितलं, तुम्ही त्यात मोठ्या अडचणी उभ्या केल्या. पडद्यामागचं बाहेर आलं आहे, हे कशी प्लॅनिंग करू शकतात हे समोर आलं आहे. आपल्याला राज्यभरात एक मजबूत फळी उभी करावी लागणार आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सरळ माणसाचं जणगं या दुनियेत लय अवघड

या ऑडिओ क्लिपनंतर महायुतीमधील नेते आमने-सामने आले आहेत. तो त्यांचा भाग आहे. आम्ही तुमचं इतकं काय वाईट केलं की तुम्ही आमच्या विरोधात इतकं षडयत्रं रचलं. आजही तुम्ही आमच्यावर आरोप करत आहात. आमच्या समाजाचे आंदोलन चिरडण्यासाठी तुम्ही का षडयंत्र उभं केलं? पडद्याआड काय षडयंत्र सुरू होतं, हे आमच्या राज्याच्या समोर आणलं आहे. या दुनियेत सरळ माणसाचं जगणं खूप अवघड झालं आहे, अशी खंत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

आता मराठा समाजाने कोण जवळचं आणि कोण कसं, हे ओळखलं पाहिजे. मराठा सेवकांची नवीन चांगली फळी मराठा समाजाला बांधावी लागणार आहे. त्यानंतर पुढील आंदोलनात उतरावं लागणार आहे. हे काम आता दोन ते तीन दिवसात हाती घेणार आहे. आज कोण फुटला आणि कोण जवळचा हे कळत नाही. राज्यात लवकरच कट्टर मराठा सेवकांची फळी तयार करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us