अफजल खानचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाच्या पायथ्याशी काढला, भाजप नेते गोपीचंद पडळकर

अफजल खानचा कोथळा शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाच्या पायथ्याशी काढला, अशा शब्दात पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर जयंत पाटलांनी प्रत्युत्तर देत पडळकरांची बोलती बंद केली.

अफजल खानचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाच्या पायथ्याशी  काढला, भाजप नेते गोपीचंद पडळकर
gopichand padalkar news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 8:54 AM

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी 20 मतांनी विजय मिळवला. राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केलेल्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी विजयाचा गुलाल उधळला. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना डिवचलयाचे दिसून आले. त्यानंतर एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानंतरही गोपीचंद पडळकर यांनी खोचक टोला लगावला. अफजल खानचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाच्या पायथ्याशी  काढला, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर जयंत पाटील यांनीही इतिहास काढत जोरदार पलटवार केला.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अफजलखानाचा कोथळा हा शिवाजी महाराजांनी पन्हाळागडाच्या पायथ्याशी काढला,असे विधान जाहीर भाषणात करण्यात आले आहे. गोपीचंद पडळखर यांच्या विधानावरून जयंत पाटील यांनी पडळकरांच्या इतिहासावरून खोचक टोला लगावण्यात आला आहे.  अफजलखानाचा कोथळा पन्हाळगडच्या नव्हे,तर प्रतापगडाच्या पायथ्याशी काढला, असं सांगत पुढच्या वेळी जरा चांगला अभ्यास करून या. पाठ केलेले भाषण केले की असं होतं, असा खोचक टोला जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे.  सांगलीच्या बावची येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्या निमित्ताने आमदार जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यात आला, यावरून जयंत पाटलांनी पडळकरांचा चांगलाच समाचार घेतला.

Loading...

…त्यावेळी घरात घुसून कार्यक्रम करायचा असतो, पडळकरांचा निशाणा 

‘शत्रू कितीही मोठा असला,तरी घाबरायचे नसतं,त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचं असतो, अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटलांना टोला लगावला. तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात वेढा पडतो, पण घाबरायचा नसतं, मग तो राजकीय असेल किंवा आर्थिक असेल,वेढा किती जर पडला तर बाहेर कसं पडायचं, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून शिकायचं,असं विधान देखील पडळकरांनी केलं. हे विधान छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची छाटलेल्या बोटांचा इतिहास सांगताना केले आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये देखील गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असं संघर्ष पाहायला मिळाला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us