आमदार जयकुमार गोरे अपघातातून थोडक्यात बचावले, कार 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली; गोरे यांच्यासह चौघांना बारामतीला हलवले

| Updated on: Dec 24, 2022 | 8:24 AM

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला भल्या पहाटे भीषण अपघात झाला. गोरे यांची कार 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. मात्र, दैव बलवत्तर म्हणून जयकुमार गोरे या अपघातातून थोडक्यात बचावले.

आमदार जयकुमार गोरे अपघातातून थोडक्यात बचावले, कार 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली; गोरे यांच्यासह चौघांना बारामतीला हलवले
Follow us on

सातारा: भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला भल्या पहाटे भीषण अपघात झाला. गोरे यांची कार 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. मात्र, दैव बलवत्तर म्हणून जयकुमार गोरे या अपघातातून थोडक्यात बचावले. या अपघातात गोरे यांच्यासह चारजण जखमी झाले आहेत. गोरे आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांना किरकोळ मार लागला आहे. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघा गंभीर जखमींना उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गोरे यांच्यासह त्यांच्या सुरक्षा रक्षकावर साताऱ्यात उपचार करण्यात येत आहेत. या चौघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे.

सातारा येथील फलटणच्या मलठण येथे भल्या पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी हा भीषण अपघात झाला. पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ पुलावरून गाडी जात होती. त्याचवेळी चालकाचं फॉर्च्युनरवरील नियंत्रण सुटलं अन् काही क्षणात ही कार 30 फूल खोल खड्ड्यात पडली.

हे सुद्धा वाचा

या कारमधून जयकुमार गोरे यांच्यासह चौघेजण प्रवास करत होते. हे सर्वजण कारसह 30 फूट खोल खड्ड्यात कोसळले. मात्र, सुदैवाने चौघांचेही प्राण वाचले.

या अपघातात जयकुमार गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्याला किरकोळ मार लागला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांना पुढील उपचारासाठी बारामतीला नेण्यात आलं आहे. या दोन जखमींना अधिक उपचारासाठी पुण्याला नेण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं. तर आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या सुरक्षारक्षकावर फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला. जयकुमार गोरे आपल्या मतदारसंघात जात होते. मात्र, काळोखामुळे कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. जयकुमार गोरे यांची प्रकृती चांगली असल्याचंही त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.