Jishnu Dev Varma : मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती, दिल्लीत मोठ्या घडामोडी

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची निुयक्ती, दिल्लीत मोठ्या घडामोडी!

Jishnu Dev Varma : मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती, दिल्लीत मोठ्या घडामोडी
Jishnu Dev Varma appointed as governor of maharashtra
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 06, 2026 | 12:30 AM

Jishnu Dev Varma : दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदेशानुसार देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालपदी नव्या चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच आदेशान्वये महाराष्ट्राचेही राज्यपाल बदलण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आता जिष्णू देव वर्मा हे राज्याचे नवे राज्यपाल असतील. ते याआधी तेलंगाना राज्याचे राज्यपाल होते. विष्णू देव वर्मा यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी आल्यानंतर आता शिव प्रताप शुक्ला हे तेलंगानाचे राज्यपाल असतील.

कोण आहेत जिष्णू देव वर्मा

जिष्णू देव वर्मा हे याआधी तेलंगाना राज्याचे राज्यपाल होते. आता ते महाराष्ट्राचे राज्यपाल असतील. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी झाला. ते मूळचे त्रिपुरा येथील आहेत. 1990 च्या दशकात त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचे वर्चस्व असूनही त्यांनी तेथे भाजपाला मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न केले. त्या राज्यात भाजपाचा प्रचार, प्रसार कसा होईल, यासाटी त्यांनी तेथे काम केले होते. 1996, 1998, 1999 सालच्या निवडणुकीत त्यांनी त्रिपुरा इस्ट या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकलेली होती.

जिष्णू देव वर्मा राजघराण्याशी संबंधित

जिष्णू देव वर्मा हे त्रिपुरा येथील राजघराण्याशी संबंधित आहेत. भाजपात त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांनी त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केलेले आहे. विशेष म्हणजे वित्त, उर्जा, ग्रामविकास यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळलेली आहे.

अन्य राज्यांचे राज्यपालही बदलले

महाराष्ट्रासह इतरही राज्यांसाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नागालँडच्या राज्यपालपदी नंद किशोर यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तामिळनाडूचे राज्यपाल असलेले आर एन रवी हे आता पश्चिम बंगालचे राज्यपाल असतील. केरळचे राज्यपाल राजेंद्र अरळेकर यांच्यावर हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाचीही अतिरिक्त जबादारी असेल. लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल वी कुमार सक्सेना यांची लडाखच्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तरनजीत सिंह सिंधू हे दिल्लीचे उपराज्यपाल असतील.

Follow Us