मला पक्षातून हकालणार होते…आव्हाड यांनी किस्सा सांगत राज ठाकरे यांना लगावला टोला…

| Updated on: Nov 28, 2022 | 3:04 PM

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजप आणि राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मला पक्षातून हकालणार होते...आव्हाड यांनी किस्सा सांगत राज ठाकरे यांना लगावला टोला...
Image Credit source: Google
Follow us on

ठाणे : मला पक्षातून काढून टाकणार होते, पण त्यावेळी शरद पवार यांनी सांगितलं जितेंद्रचा अभ्यास आहे, पण त्यावेळी ई माझी भूमिका बदलली नाही. राज ठाकरेंनी चार-चार भूमिका घेऊ नये असा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि शिवाजी महाराज यांचा अवमान होईल अशी विधाने केल्याने राज्यभर आंदोलने केली आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यातून हटवायला पाहिजे यासाठी पहिला आवाज उठवणारा मी असल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. शिवसेनेचे संजय राऊत आणि मी आम्ही दोघेच राज्यपाल यांच्या विरोधात बोलत होतो, असं आव्हाड यांनी म्हंटलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे म्हातारे झाले असले तरी त्यांचा मेंदू सात-आठ वर्षाच्या पोरासारखा असल्याचा टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असल्याचे देखील आव्हाड यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजप आणि राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

भगतसिंग कोश्यारी यांच्यावर बोलत असतांना जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली आहे, यामध्ये राज्यपाल पदावरून भगतसिंग कोश्यारी यांना हटवा अशीही मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे म्हातारे झाले असून त्यांचा मेंदू लहान मुलांसारखा असल्याचा टोला लगावत तात्काळ राज्यपाल पदावरून हटवावे अशी मागणी देखील आव्हाड यांनी केली आहे.

याशिवाय केंद्र सरकारने म्हणजेच भाजपने भगतसिंग कोश्यारी यांची निवड केल्याने महाराष्ट्रा भाजपचे नेते कात्रीत सापडल्याचे देखील आव्हाड यांनी म्हंटलं आहे.

याशिवाय मी वेगवेगळ्या भूमिका मांडत असतांना मला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातून काढून टाकणार होते, पण मी भूमिका बदलली नाही, शरद पवार यांनी सांगितले की जितेंद्रचा अभ्यास आहे.

पण राज ठाकरे यांनी आता कोणती तरी एक भूमिका नक्की करावी, चार-चार प्रकारच्या चार भूमिका मांडू नये असंही राज ठाकरे यांना टोला लगावत आव्हाड यांनी निशाणा साधला आहे.