AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी तर विचार करतोय तिथे मटणाची पार्टी ठेवावी; आव्हाड एवढे का संतापले?

कल्याण डोंबिवलीत मांस विक्री बंदच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे, त्यांनी यावेळी बोलताना जोरदार हल्लाबोल केला.

मी तर विचार करतोय तिथे मटणाची पार्टी ठेवावी; आव्हाड एवढे का संतापले?
| Updated on: Aug 10, 2025 | 3:08 PM
Share

कल्याण डोंबिवलीत मांस विक्री बंदच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. यांच्या बापाचं राज्य आहे का? लोकांनी कधी काय खावं आणि काय विकावं याला कायद्याने काही बंदी आहे का? हा काय तमाशा आहे? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हणाले आव्हाड? 

लोकांनी कधी काय खावं आणि काय विकावं याला कायद्याने काही बंदी आहे का? हा काय तमाशा आहे? बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे. मनुष्य प्राणी याच्या दाताची रचना बघितली तर, कोणाला ही विचारा ती मांसाहारी आहे की नाही? हजारो वर्षांचा इतिहास आहे माकडापासून आपली उत्पत्ती झाली, तुम्ही जर दाताची रचना पाहिली तर कळतं की तुम्ही मांसाहारी आहात.

ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी आमचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहात, हा काय तमाशा आहे? कल्याण, डोंबिवलीमध्ये बहुजन समाजाला विरोध होतोय, माझा तर विचार आहे, त्या ठिकाणी मटणाची पार्टी ठेवावी. ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुसलमान झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं आता शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असं सुरू करा असा जोरदार हल्लाबोल यावेळी आव्हाड यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मंत्री प्रताप सरनाई यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.  पहिली प्रयोगशाळा त्यांच्याच मतदारसंघात झाली,  जैन धर्माच्या नावाने मच्छी मटनाचे दुकान बंद करण्यात आले, सरनाईक यांच्या पत्नी मांसाहार खूप सुंदर बनवतात. मी अनेकदा त्यांच्या हातचं जेवलो आहे, त्यांना विचारावं की तुम्ही बनवणं बंद करणार आहात का? नेत्यांची पोर बाहेर जाऊन कुठल्या प्राण्याचे मटन खातात हे मला माहिती आहे, लोकप्रतिनिधी नाही तर आयुक्तांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असंही यावेळी आव्हाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून देखील त्यांनी सरकारवर यावेळी निशाणा साधला.

Follow Us
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण