‘म्हाडा’ वसाहतीतील रहिवाशांना मोठा दिलासा, थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ

| Updated on: Jun 29, 2021 | 3:30 PM

गेल्या 21 ते 22 वर्षांपासून नागरिकांनी सेवा शुल्क भरलं नव्हतं. त्यांच्यासाठी आम्ही अभय योजना सुरु केल्याची आव्हाड यांनी दिली आहे. त्यानुसार थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतल्याचं आव्हाड यांनी सांगितलं.

म्हाडा वसाहतीतील रहिवाशांना मोठा दिलासा, थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ
जितेंद्र आव्हाड
Follow us on

मुंबई : म्हाडाच्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना राज्य सरकारने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अभय योजने अंतर्गत 1 एप्रिल 1998 ते 2021 पर्यंतच्या थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. गेल्या 21 ते 22 वर्षांपासून नागरिकांनी सेवा शुल्क भरलं नव्हतं. त्यांच्यासाठी आम्ही अभय योजना सुरु केल्याची आव्हाड यांनी दिली आहे. त्यानुसार थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. (relief to the residents of Mhada colony, waiver of interest on overdue service charges)

या अभय योजनेनुसार म्हाडा वसाहतीतील रहिवाशी थकीत सेवा शुल्क एकत्र न भरता 5 वर्षात 10 हप्त्यात भरु शकणार आहेत. म्हाडाच्या इमारतीत राहणाऱ्या 1 लाख 81 हजार रहिवाशांना या योजनेचा लाभ होणार आहे. तसंच आता म्हाडा कार्यालयात जाऊन रांगेत उभं राहून बिल भरण्याची गरज राहणार नाही. ऑनलाईन प्रणालीद्वारे तुम्ही घरबसल्या हे सेवा शुल्क भरु शकणार आहात, अशी माहितीही आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडाच्या 4 हजार 973 इमारतीत जवळपास 14 लाख 6 हजार 382 रहिवासी राहतात. या रहिवाशांना या योजनेचा लाभ होणार आहे.

टाटा कॅन्सर रुग्णालयाला बॉम्बे डाईंग 100 सदनिका

म्हाडाच्या 100 सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याच्या आव्हाडांच्या निर्णयाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं. त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली. म्हाडाच्या 100 सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देण्यात आल्या. पण काही स्थानिकांनी विरोध केला आणि शिवसेना आमदाराने मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला आज बोलावून घेतलं आणि सांगितलं की, त्याच परिसरात जागा शोधून निर्णय घ्या, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हा निर्णय 15 मिनिटात झाला आणि बॉम्बे डाईंगमध्ये 100 सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही विसंवाद नाही. विसंवाद असता तर 24 तासाच्या आत निर्णय झाला नसता. मला आनंद याचा आहे की, काल मिळालेल्या स्थगितीला आज तेवढ्याच जागा, त्याच परिसरात देऊ शकलो, असंही आव्हाड यांनी म्हटलंय.

‘टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय?’

राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. अशा परिस्थितीत टाटाने आपला सीएसआर फंड वापरावा. टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केलाय. टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका घेण्याचा निर्णय जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या सदनिकांच्या चाव्या टाटा रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. मात्र, या निर्णयावर महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नसल्याचं आता पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या :

शरद पवार नाराज या चर्चेला अर्थ नाही, महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणारच, संजय राऊतांचा दावा

‘उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत’, राजू शेट्टींची शरद पवारांकडे तक्रार, अजित पवारांना म्हणाले….

relief to the residents of Mhada colony, waiver of interest on overdue service charges