
सातारा : सातार जिल्ह्याचे (Satar District) सुपुत्र न्यायमूर्ती रणजीत मोरे (Ranjit More) यांची केंद्रीय प्रशासकीय लवादाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी न्यायमूर्ती रणजीत मोरे यांची केंद्रीय प्रशासकीय लवाद कॅटच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. रणजीत मोरे यांनी मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केे आहे, तसेच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात देखील न्यायदानाचे कार्य केले आहे. आता रणजीत मोरे यांची केंद्रीय प्रशासकीय लवादाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी मोरे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. वृत्त समजताच सातारा जिल्हयासह राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच त्यांना पुढ कार्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात येत आहेत. रणजीत मोरे हे गेल्या अनेक वर्ष न्यायदानाचे काम करत आहेत.
निमसोड हे रणजीत मोरे यांचे मूळ गाव आहे. निमसोड सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात येते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण निमसोडमध्ये म्हणजे आपल्या मूळ गावी पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून बीएपर्यंतचे शिक्षण घेतले. बीएची पदवी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सांगलीच्या महाविद्यालयातून वकिलीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. 8 सप्टेंबर 2006 रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनले त्यानंतर त्यांची मेघालय उच्च न्यायालयात बदली झाली. पुढे ते ऑक्टोबर 2021 मध्ये मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बनले. आता त्यांची केंद्रीय प्रशासकीय लवादाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रणजीत मोरे यांची केंद्रीय प्रशासकीय लवादाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी न्यायमूर्ती रणजीत मोरे यांची केंद्रीय प्रशासकीय लवाद पॅटच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर करताच त्यांच्यावर सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी नागरिक शुभेच्छा देत आहेत.