कळंबोलीत हिट अँड रनची थरारक घटना, पादचाऱ्यांना चिरडत क्लिनिकला धडक; सीसीटीव्हीत कैद

नवी मुंबईतील कळंबोली येथे थरारक हिट अँड रनची घटना घडली. एका भरधाव कारने फूटपाथवरील चार पादचाऱ्यांना चिरडले आणि डेंटल क्लिनिकला धडक दिली. यात अडीच वर्षांच्या चिमुकलीसह चार जण गंभीर जखमी झाले. घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून कारचालक डॉ. संजय बारणवाल यांना कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी होत आहे.

कळंबोलीत हिट अँड रनची थरारक घटना, पादचाऱ्यांना चिरडत क्लिनिकला धडक; सीसीटीव्हीत कैद
हिट अँड रनमुळे हादरलं कळंबोली
| Updated on: Jun 16, 2026 | 12:48 PM

नवी मुंबई परिसर काल हिट अँड रनच्या घटनेने हादरून गेला आहे. एका भरधाव कारने फुटपाथवरील चार जणांना चिरडले आहेत. हे चारही पादचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. जखमींमध्ये एका मुलीचाही समावेश आहे. या हिट अँड रन प्रकरणी एका डॉक्टराला ताब्यात घेण्यात आले आहे. हा अपघात अत्यंत थरारक होता. त्यामुळे अपघात पाहून प्रत्यक्षदर्शी हादरून गेले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना पाहून अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही.

नवी मुंबईतील कळंबोली परिसरात भरधाव कारचा थरार पाहायला मिळाला. सेक्टर-1 मधील मार्केट परिसरात एका आलिशान कारने पादचाऱ्यांना धडक देत थेट डेंटल क्लिनिकला धडक दिली. या अपघातात महिला, पुरुष आणि दोन लहान मुले जखमी झाली असून अनेक दुचाकींचेही नुकसान झाले आहे. कार चालक डॉ. संजय बरनवाल यांना कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. काल संध्याकाळी ही हिट अँड रनची घटना घडली.

अडीच वर्षाची चिमुकलीही जखमी

नवी मुंबईतील कळंबोली येथील भीषण अपघातात अडीच वर्षांच्या चिमुकलीसह तिचे वडील आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमींमध्ये गणेश घागरे (वय 34), त्यांची मुलगी ऋषींका घागरे आणि शिवचरण राजपूत (वय 30) यांचा समावेश आहे. गणेश घागरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून चिमुकली ऋषींकाच्या चेहऱ्यावर व शरीरावर जखमा आहेत. सर्व जखमींवर सध्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नियंत्रण सुटले

अपघातानंतर नियंत्रण सुटलेली कार फुटपाथ ओलांडून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात घुसली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार, कळंबोली येथील सत्यम हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय बारणवाल हे स्वतः वाहन चालवत होते. घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हा अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला आणि त्यामागील नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.

 

Follow Us