
विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाचं पारडं जड राहतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राची निवडणूक ही देशावर प्रभाव टाकते असं म्हणत गृहमंत्री अमित शाह यांनी आधीच या निवडणुकीचं महत्त्व अधोरेखित केले आहे. महायुतीचे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध मविआचे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात हा थेट सामना होणार आहे. विधानसभा निवडणुकीतासाठी जागा वाटपांसाठी बैठका देखील सुरु आहेत. निवडणुकीची घोषणा होण्याआधीच जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा महायुती आणि महाविकासआघाडीचा प्रयत्न असणार आहे. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून लवकरच पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत यंदा कल्याण पूर्व विधानसभा निवडणुकीकडे देखील राज्याचं लक्ष असणार आहे. कारण येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. कल्याण विधानसभा निवडणूक चर्चेत विद्यमान आमदार...