गुजरातहून कल्याणला आलेल्या महिलेसोबत स्टेशनवर धक्कादायक घटना, मध्यरात्री उठल्यानंतर झालं होत्याचं नव्हतं
Crime : गुजरात येथून कल्याण येथे आलेल्या महिलेसोबत असं काही घडलं आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. रात्री स्टेशनवर झोपलेल्या महिलेसोबत मध्यरात्री असं काही घडलं ज्यामुळे तिच्यावर मोठं संकट ओढावलं... याप्रकरणी पोलीस आता अधिक चौकशी करत आहेत.

Crime : घरातून बाहेर पडल्यानंतर कधी काय होईल सांगता येत नाही. घरातून बाहेर पडल्यानंतर कायम सतर्क राहण्यासाठी सांगितलं जातं. अशात गुजरात येथून कल्याण येथे आलेल्या महिलेसोबत असं काही घडलं आहे. ज्यामुळे तिच्यावर मोठं संकट ओढावलं आहे. महिला गुजरात येथून मैत्रिणीला भेटण्यासाठी कल्याण येथे आली. पण कल्याण येथे पोहोचल्यानंतर मैत्रिणीने महिलेचा फोनच उचलला नाही. अशात रात्र कल्याण स्टेशनवर काढल्यानंतर मध्यरात्री जेव्हा महिलेला जाग आली तेव्हा सर्वकाही होत्याचं नव्हतं झालेलं होतं… तर जाणून घ्या त्या महिलेसोबत नेमकं काय झालं आहे.
गुजरात येथून महिला तिच्या सहा महिन्यांच्या मुलासह कल्याण येथे आली. पण उड्डाणपुलाखाली झोपलेल्या महिलेच्या कुशीतून अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाचं अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली आहे. इतकंच नाही तर अपहरणकर्त्याने महिलेचा मोबाईल फोनही चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असू, बाळाच्या शोधासाठी पोलिसांनी चार विशेष पथके तयार केली आहेत.
गुजरात येथील दादरा नगर हवेली येथील रहिवासी रोशनी साहू, मैत्रिणीला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आली होती. कल्याण येथे पोहोचल्यानंतर तिने मैत्रिणीला फोन केला. पण तिचा मैत्रिणीसोबत संपर्क होऊ शकला नाही. अखेर तिने स्टेशनवर बसण्याचा निर्णय घेतला. अशात महिलेचा डोळा लागला आणि रात्री उशिरा झोपेचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने महिलेच्या कुशीतून सहा महिन्यांच्या आर्यनचं अपहरण केलं. याचवेळी महिलेचा मोबाईल फोनही चोरून नेण्यात आला.
मंगळवारी पहाटे जाग आल्यानंतर बाळ आणि मोबाईल दोन्ही गायब असल्याचे लक्षात येताच आईने आक्रोश केला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने महिलेने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अपहरण आणि चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक विकास मडके अधिक तपास करत आहेत. तर चिमुकल्या आर्यनचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथके तयार करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.