
मोठी बातमी समोर येत आहे, दिल्ली स्पेशल सेलने कल्याणमधील एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे, या तरुणाचं इसिस (ISIS) कनेक्शन समोर आलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती देखील घेतली आहे. आफ्ताब कुरेशी असं या दिल्लीच्या स्पेशल सेलनं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचा शहरात मटण विक्रीचा व्यावसाय आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार आफ्ताब कुरेशी नावाच्या तरुणाला दिल्लीच्या स्पेशल सेलनं दिल्लीमधून ताब्यात घेतलं आहे. या तरुणाचं इसिस कनेक्शन समोर आलं आहे. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा हल्ला करण्याचा कट उघड झाला आहे, या तरुणानं इसिससोबत मिळून दहशतवादी हल्ल्याची आणखी केल्याचा पोलिसांना संशय आहे. आफ्ताबचा शहरात मटण विक्रीचा व्यावसाय आहे, तो आपल्या सुफियान नावाच्या मित्रासोबत दिल्लीला गेला होता, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान आफ्ताब कुरेशी याच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार तो सतत मोबाईलमध्ये व्यस्त असायचा, तो सतत व्हिडीओ पाहायला यावरून त्याच्या कुटुंबामध्ये वाद देखील निर्माण झाला होता, त्याला कुटुंबानं मारहाण देखील केली होती. तो ऐकत नव्हता, त्याला कुठेही जाण्यास त्याच्या घरच्यांनी मनाई कोली होती, मात्र तरी देखील तो आपल्या एका मित्रासोबत दिल्लीला पोहोचला, मला माझ्या मित्राच्या गावी जायचं आहे, असं सागून तो घराच्या बाहेर पडला होता, त्याने वडिलांच्या मोबाईलमधून ऑनलाईन पैसे देखील घेतले होते, असा दावा त्याच्या कुटुंबानं केला आहे.
10 सप्टेंबरचं नेमकं कनेक्शन काय?
पुन्हा एकदा दहा वर्षांनंतर कल्याणचा तरुण ISIS मध्ये गेल्याचा संशय आहे, हा तरुण दिल्ली स्पेशल सेलच्या हाती लागला आहे. या तरुणानं इसिससोबत मिळून दहशतवादी हल्ल्याची आणखी केल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान या घटनेच्या बरोबर दहा वर्षांपूर्वी दहा सप्टेंबरलाच कल्याणचे चार तरुण इसिसमध्ये गेले होते. 2014 मधील ही घटना आहे, त्यानंतर बरोबर याच तारखेला म्हणजे दहा सप्टेंबरला हा तरुण कल्याणमधून गायब झाला होता, ज्याला दिल्लीमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.