केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात ट्विस्ट; हत्येचा कट कसा अन् कधी शिजला? पोलीस तपासात हादरवणारी माहिती उघड

ketan agrawal Murder case : केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात ट्विस्ट निर्माण झालाय. आरोपींनी मे महिन्यात लोहगडावर रेकी केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे.

केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात ट्विस्ट; हत्येचा कट कसा अन् कधी शिजला? पोलीस तपासात हादरवणारी माहिती उघड
| Updated on: Jun 27, 2026 | 7:29 AM

पुण्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ला चर्चेत आला आहे. प्रसिद्ध उद्योगपती विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल यांच्या हत्येनंतर लोहगड किल्ला चर्चेत आलाय. लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतनने मिळूनच केतन अग्रवालची हत्या केल्याचे उघड झालंय. केतनची हत्या करण्यासाठी दोघांनी मे महिन्यात लोहगड किल्ल्याची रेकी केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. त्याचबरोबर आरोपींनी मोबाइलमधील चॅट देखील डिलीट केल्याचे कळतंय.

केतन आणि सिया हे दोघे १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. त्यादिवशी केतनचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु काही तासांत केतनची हत्या झाल्याचा आरोप समोर आला. त्यानंतर पोलीस चौकशीत आरोपी सिया आणि चेतन चौधरीने हत्येची कबुली दिली. पोलिसांकडून आता दोघांची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून या हत्याकांडांशी संबंधित हादरवणारी माहिती समोर येत आहे.

पोलीस तपासात काय उघड झालं?

आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी मे महिन्यापासूनच लोहगड किल्ल्याची रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर स्वतःला वाचवण्यासाठी आरोपींनी त्यांच्या मोबाईलमधील सर्व कॉल आणि मेसेज डिलीट केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्यांचे मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

नीरज कुमार साक्षीदार होणार

आरोपी चेतन चौधरीच्या दुकानातील कर्मचारी नीरज कुमार साक्षीदार होणार असल्याचे सांगितले जात आहे. स्वतःचे लोकेशन पुण्यात दाखवून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चेतन घटनेच्या दिवशी निरजसोबत मोबाईलची अदलाबदल केली होती. नीरजने दिवसभर चेतनचे फोन स्वीकारले, तर चेतन मिरजचा फोन घेऊन लोहगडाला गेला. मात्र पोलिसांच्या तांत्रिक तपासात निरजच्या मोबाईलचे लोहगड येथील लोकेशन समोर आल्याने चेतनचा हा बनाव उघडकीस आलाय.

सिया-वडिलांनी केली कारवाईची मागणी

सियाच्या कृत्यावर तिच्या आई-वडिलांनी देखील संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात कोणीही दोषी असेल, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. सिया दोषी असेल, तर जसं केतनची किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आली. त्याचप्रकारे सियाला देखील ढकललं पाहिजे, अशी मागणी सियाच्या आईने केली.

Follow Us