AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत मोठ्या हालचाली, पवारांचे ८ खासदार PM मोदींना भेटणार; नेमकी काय चर्चा होणार?

दिल्लीत आज शरद पवारांचे खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दिल्लीत मोठ्या हालचाली, पवारांचे ८ खासदार PM मोदींना भेटणार; नेमकी काय चर्चा होणार?
| Updated on: Aug 10, 2026 | 8:00 AM
Share

संसदेच्या पावसाळी अधिवशेनाचा आज शेवटचा आठवडा असणार आहे. अधिवेशनच्या शेवटच्या आठवड्यात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आज संसेदत महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहेत.  संसदेत डिलीमिटेशन विधेयक देखील नव्याने सादर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लील सत्ताधारी खासदारांनंतर आता शरद पवारांचे खासदार देखील पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. ही भेट आज सोमवारी अकरा वाजताच्या सुमारास होणार असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संसदेत डिलीमिटेशन विधेयक सादर होणार असल्याने साऱ्यांचं लक्ष या घडामोडींकडे लागलं आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीच पत्रकार परिषद घेत या भेटीविषयी माहिती दिली आहे. तर रोहित पवार यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली. शरद पवारांचे खासदार हे डिलीमिटेशनच्या विरोधातच मतदान करतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. या भेटीत खासदारांच्या मतदारसंघातील रखडलेले विकासकामे आणि लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.

शरद पवारांच्या खासदारांची यादी

सुप्रिया सुळे – बारामती डॉ. अमोल कोल्हे – शिरूर अमर काळे – वर्धा निलेश लंके – अहमदनगर बाळ्यामामा म्हात्रे (सुरेश म्हात्रे) – भिवंडी धैर्यशील मोहिते पाटील – माढा भास्कर भगरे – दिंडोरी बजरंग सोनावणे – बीड

लोकसभेत दोन विधेयके करणार सादर

दिल्लीतील संसदेत पावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या आठवड्यातही गदरोळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येणे टाळले आहे. या गैरहजेरीवरून विरोधकांनी संसदेत रान पेटवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज गदारोळामुळे तहकूब होत आहे. त्यात या शेवटच्या आठवड्यात लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयक सादर केली जाण्याची शक्यता आहे. यात केरळ राज्याचे नाव ‘केरळम’ करण्याची तरतूद करणारे विधेयक आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक सादर केले जाणार आहे, या दोन्ही विधेयकांकडेही सर्वांचं विशेष लक्ष असणार आहे.

Follow Us
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण