येवल्यात पतंगोत्सव, अंगावर ढीगभर सोनं घालणाऱ्या गोल्डमॅनचा पतंग कसा आहे?

नाशिक : चढाओढीन चढवीत होते गं बाई, मी पतंग उडवीत होते..! अशा गाण्याने नववर्षाचे स्वागत येवल्यात पतंगोत्सवाने भोगी, संक्रांत आणि कर या तीन दिवशी होते. सर्व जण सुट्टी घेतात आणि पतंग उडविण्याची मजा करतात. या येवल्यातील पतंग महोत्सव दरम्यान गोल्डमॅन म्हणून ज्यांची देशात नव्हे तर साता समुद्रापार ओळख आहे, ते पंकज पारख त्यांनी पिवळ्या रंगाच्या […]

येवल्यात पतंगोत्सव, अंगावर ढीगभर सोनं घालणाऱ्या गोल्डमॅनचा पतंग कसा आहे?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

नाशिक : चढाओढीन चढवीत होते गं बाई, मी पतंग उडवीत होते..! अशा गाण्याने नववर्षाचे स्वागत येवल्यात पतंगोत्सवाने भोगी, संक्रांत आणि कर या तीन दिवशी होते. सर्व जण सुट्टी घेतात आणि पतंग उडविण्याची मजा करतात. या येवल्यातील पतंग महोत्सव दरम्यान गोल्डमॅन म्हणून ज्यांची देशात नव्हे तर साता समुद्रापार ओळख आहे, ते पंकज पारख त्यांनी पिवळ्या रंगाच्या शर्टच्या दोन्ही बाजूने पतंग आणि त्याला उडवण्यासाठी लागणारी आसारी नक्षीदार काम केलेला शर्ट परिधान करून येवलेकरांचे लक्ष वेधले होते.

पतंगोत्सव म्हटलं की येवलेकरांच्या मनात जणू काही उधाणच येते. नववर्षाचे स्वागत पतंगोत्सवाने दरवर्षी साजरे केले जाते. येथील पतंगोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. गुजरातमधील सुरत, अहमदाबाद तसेच इंदूर भिवंडी या पतंगवेड्या शहरांमध्ये येवल्याची गणना केली जाते.

भोगी, संक्रांत आणि कर या तीन दिवशी येवल्यात पतंगोत्सव साजरा केला जातो. लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत मग युवक, युवती, महिला, पुरुष आणि माहेरवासीनी या सणासाठी खास येतात आणि सारेच जण आपापल्या घरांच्या गच्चीवर तीन दिवस तळ ठोकून पतंग उडविण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. मग साथीला असते येवल्याची प्रसिद्ध हलकडी, चित्रपटांची गीते अन ढोलताशांचा गजर.

पतंगोत्सवात येवल्यात तीन दिवस जणू काही अघोषित संचारबंदी लागू असते. पतंग उडविण्याची चक्री म्हणजे येवल्याची आसरी ही सुद्धा एक खासियत आहे. ही आसारी तुम्हाला दुसऱ्या शहरांमध्ये पतंग उडविण्यासाठी बनवताना दिसणार नाही.

येवल्यातील बुरुड समाज बांबूपासून ही आगळ्यावेगळ्या पद्धतीची आसारी बनवतो. येवल्याची पतंग सुद्धा उत्कृष्ट प्रकारची असते. पतंग कटली की ‘वक्काट  वक्काट’ असे म्हटले जाते. हलकडीचा निनाद, ढोलताशांचा गजर अन चित्रपटांची गीते यावर पतंग उंच उंच गगनभेदी उडविताना प्रतीस्पर्धीची पतंग कापल्यानंतर  वक्काट वक्काटचा उच्चाराचा आवाज तर सर्वच पतंगप्रेमींचे लक्ष वेधून जाते आणि पतंगप्रेमींचा उत्साहही भर टाकतो. तहानभूक विसरून येवलेकरांचे पतंगप्रेमही जणू काही शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा एक नमुनाच आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.