
मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि त्यांचे आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरतोय. भाजपने याच मुद्द्यावर राज्य सरकारला घेरलंय. एसटी महामंडळाचे कर्मचारी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत असल्याचे म्हटले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंत काय केलं याची विचारणा होत आहे. 2018 साली राज्याने एसटी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या सुविधा तसेच त्यांचा पगार आणि भत्त्यात केलेली वाढ यांची आकडेवारी आता समोर आली आहे.
एसटी महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने 2018 साली काही घोषणा केल्या होत्या. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पाल्याचे शिक्षण, वेगवेगळ्या भत्त्यांमध्ये वाढ, बिनव्याजी कर्जयोजनचा यांचा समावेश होता. सरकारने कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाचं सूत्र वापरून 2.57 नुसार वेतनवाढ केली होती. एसटी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना सवलतीचा पास दोन महिन्यांऐवजी सहा महिने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई ज्योतीबा फुले शिष्यवृत्ती योजनेद्वारे 750 रुपये प्रति महिना देण्याची 2018 साली घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी तत्कालीन सराकनरने 22 ते 23 कोटी खर्च करणार असे आश्वासन दिले होते. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक शुल्कासाठी कर्मवीर भाऊराव पाटील अग्रीम बिनव्याजी कर्ज योजना जाहीर करण्याची घोषणा केली होती. पाल्यांच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी लागणारा खर्च एसटी महामंडळ देणार, अशी घोषणादेखील करण्यात आली होती.
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यामधली विकृती नष्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याचं रावतेंनी जाहीर केलं होतं. त्यामुळे 2018 साली वेगवेगळ्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली होती.
हजेरी प्रोत्साहन – 180 रुपयांवरुन 1200 रुपये
धुलाई भत्ता – 50 रुपयांवरुन 100 रुपये
वुलन धुलाई भत्ता – 18 रुपयांवरुन 100 रुपये
रात्री तीन तास काम केल्यास तीन रुपये भत्ता मिळायचा, तो 35 रुपये देण्याची केली होती घोषणा
रात्रपाळी भत्ता चार रुपये होता, तो 75 रुपये देण्याची घोषणा केली होती
जिल्ह्याच्या ठिकाणी 15 रुपये भत्ता होता, तो 100 रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते
महाराष्ट्र – 4700 ते 15367 रुपये
कर्नाटक- 12400 ते 17520
तेलंगणा – 13070 ते 34490
राजस्थान- 5200 ते 20200
उत्तर प्रदेश- 5200 ते 20200
महाराष्ट्र- 4350 ते 14225 रुपये
तेलंगणा- 12340 ते 32800
कर्नाटक- 11640 ते 15700
राजस्थान- 5200 ते 20200
उत्तर प्रदेश- 5200 – 20200
इतर बातम्या :
Kisan Andolan News: सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला
अल्पवयीन असतानाच समीर वानखेडेंना बारचं परमीट मिळालं; मलिकांकडून वानखेडे कुटुंबाचा आणखी फर्जीवाडा उघड