AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे झाड म्हणजे सापांचं दुसरं घरच; साप चुंबकासारखा आकर्षित होतो, तुमच्या घरी आहे का?

काही विशिष्ट झाडं ही अशी असतात की ते आपल्या गुणधर्मांमुळ सापांना आकर्षित करतात. अनेकदा अशा झाडांखाली किंवा त्या परिसरात सापं आढळून येतात. त्यामुळे अशी झाडं बागेत किंवा घरात लावताना काळजी घेतली पाहिजे.

हे झाड म्हणजे सापांचं दुसरं घरच; साप चुंबकासारखा आकर्षित होतो, तुमच्या घरी आहे का?
snake Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 23, 2026 | 1:35 PM
Share

भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, यातील काही प्रजाती या विषारी आहेत, तर काही प्रजाती या बिनविषारी आहेत. भारतामध्ये जेवढ्या सापांच्या प्रजाती आढळतात त्यातील बहुतांश साप हे बिनविषारीच आहेत. भारतामध्ये केवळ काहीच सापांच्या जाती अशा आहेत, ज्या अतिशय विषारी आहेत. ज्यामध्ये पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे मण्यार या जातीचा सापाचा हा साप दिसायला लहान असतो, मात्र या सापाच्या दंशामुळे मृत्यू होणार्‍या लोकांची संख्या ही अधिक आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या सापाचा दंश झाल्याचं लवकर लक्षात येत नाही, जेव्हा लक्षात येत तोपर्यत खूप उशिर झालेला असतो. साधारणपणे रात्रीच्यावेळी हा साप दंश करतो. मण्यार नतंर नाग, फुरसे आणि घोणस या सापांच्या प्रजातींचा समावेश होतो. याला भारतामध्ये बीग4 असंही म्हटलं जातं. विशेष म्हणजे या चारही जातीचे साप महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळून येतात. परंतु तुम्हाला कुठे साप दिसला तर त्याला घाबरून जाऊ नका, किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न देखील करू नका, त्याची माहिती तुमच्या परिसरातील सर्पमित्राला द्या, ते या सापाला पकडून सुरक्षितस्थळी सोडतील.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटना वाढतात त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात साप हे जमीन गरम झाली म्हणून बिळाच्या बाहेर येतात, आणि आपल्यासाठी सुरक्षित तसेच थंड निवाऱ्याचा शोध घेतात. अशावेळी हे साप तुमच्या घरात शिरण्याचा देखील धोका असतो. तुमच्या घरात जर एखादी अडचण असलेली जागा असेल जिथे सापाला सुरक्षित वाटलं तर तो तिथे जाऊ बसू शकतो. त्यामुळे कायम सावध राहिलं पाहिजे. दरम्यान अशा देखील काही वनस्पती असतात त्याच्याकडे साप आकर्षित होतो. त्यामुळे शक्यतो बागेत अशा वनस्पती लावताना काळजी घेतली पाहिजे.

या वनस्पतीमध्ये असे काही विशिष्ट गुणधर्म असतात ज्यामुळे साप त्यांच्याकडे आकर्षित होतो. यामध्येच एका वनस्पतीचा समावेश होतो ती म्हणजे लेमन ग्रास. लेमन ग्रास ही वनस्पती प्रचंड प्रमाणात पसरते, त्यामुळे ही वनस्पती जिथे असेल तिथे अडचण निर्माण होते. सापांना या ठिकाणी सुरक्षित निवारा उपलब्ध होतो. त्यामुळे साप या झाडाकडे आकर्षित होतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लेमन ग्रास हे हिरवं आणि थंड असल्यामुळे देखील साप या झाडाकडे आकर्षित होतात. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या बागेत लेमन ग्रास्त लावलं असेल तर काळजी घ्या, त्याची वेळेवर कटिंग करावी, त्यामुळे संभाव्य धोका टळू शकतो.

Follow Us
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत