सतेज पाटलांना कोल्हापुरात दंगल घडवायची आहे का?; भाजप नेत्याचा थेट सवाल

Dhananjay Mahadik on Satej Patil : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच कोल्हापुरातील भाजप नेत्याने सतेज पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच नरेंद्र मोदींच्या कोल्हापुरातील जाहीर सभेवरही ते बोलले आहेत. वाचा सविस्तर...

सतेज पाटलांना कोल्हापुरात दंगल घडवायची आहे का?; भाजप नेत्याचा थेट सवाल
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 7:58 PM

सतेज पाटील यांना कोल्हापुरात दंगल घडवायची आहे का?, असा सवाल भाजपचे राज्यासभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. रात्री बारा वाजता काठी घेऊन येऊ या… या सतेज पाटील यांच्या वक्तव्यावर धनंजय महाडिक यांनी जोरदार टीका केली आहे. सतेज पाटील विसरलेत की ते गृहमंत्री नाहीत. आता त्यांनी सांभाळून बोललं पाहिजे. आता आमचं सरकार आहे. ते गृहमंत्री नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी जाहीर वक्तव्य करू नयेत, असं धनंजय महाडिक म्हणालेत. कोल्हापुरात टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी ते वक्तव्य केलं आहे. तसंच नरेंद्र मोदी यांच्या सभेवरही त्यांनी भाष्य केलं आहे.

सतेज पाटील यांना निवडणुकीचा निकाल लक्षात आलेला आहे. निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ते वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसत आहेत. त्यांचा उमेदवारी संदर्भातला जो प्लॅन होता. तो फेल झाल्याचं त्यांच्या लक्षात आल्याचं दिसत आहे. शाहू महाराजांबद्दल आदर पण महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. कुणी कुणाच्या आडवं जायचं कारण नाही लोकशाही आहे. सतेज पाटील वक्तव्य करत आहे की आमच्या आडवं येऊ नका. कोण कोणाच्या आडवं जात आहे?, प्रतिप्रश्न धनंजय महाडिक यांनी केलाय.

“सतेज पाटील घाबरेले आहेत”

लोकशाहीमध्ये सर्वच प्रचार करत असतात. ते काठीची भाषा वापरतात कदाचित त्यांना दंगल घडवायची असावी. त्यांचा तो नेहमीचा फॉर्मुला आहे आपल्या हातातून यशनिष्ठ असेल तर अशा पद्धतीने एखादं स्टंट करायचं आणि लोकांचा अट्रॅक्शन मिळवायचं. गृहमंत्री असताना ते सोडणार नाही उचलून आणतो ही भाषा ते वापरायचे. कोल्हापूरकरांना माहिती आहे ते घाबरलेले आहेत. या आधी सुद्धा बिंदू चौकमध्ये त्यांनी अंमल महाडिक यांना आव्हान दिलं होतं ते आले नाहीत. कोणीही भाजप कार्यकर्ता त्यांच्या आडवं जाण्याचा प्रश्नच नाही, असं धनंजय महाडिक म्हणालेत.

 नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सभा

येत्या 27 एप्रिलला नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी पाच वाजता तपोवन मैदानात ही सभा होणार आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी ही माहिती दिली आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. या सभेसाठी दोन लाख लोक उपस्थित राहणार असल्याचा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केलाय.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.