गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाने दोघांना उडवलं; चुलत भावांचा जागीच मृत्यू

कोल्हापुरातून अपघाताची मोठी बातमी हाती आली आहे. गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाने दोघांना उडवलं आहे. या अपघातात चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला आहे

गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाने दोघांना उडवलं; चुलत भावांचा जागीच मृत्यू
Breaking News
| Updated on: Nov 23, 2026 | 12:18 PM

राजस्थानच्या कोटामध्ये धुळ्यातील भाविकांचा 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या दुर्दैवी घटनेनंतर आता कोल्हापुरात अपघाताची भीषण घटना घडली आहे. कोल्हापुरात भीषण अपघात घडला आहे. कोल्हापुरात तरुणाने दोघांना उडवल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात रविवारी मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार उघडकीस आला आहे. गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांच्या मुलाने दोघांना चिरडल्याची घटना घडली. शिवाजी विद्यापीठ परिसरात ही अपघाताची घटना घडली आहे.  पद्मसिंह रणजितसिंह पाटील याच्या कृत्याने हा अपघात घडला. या अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस ठाण्यात पद्मसिंह पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात दोघांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

Loading...

 

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us