AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवारांना स्वत:च्याच पक्षाकडून मोठा हादरा! शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पदाधिकाऱ्यांना आंदोलनाबाबत महत्त्वाचे आदेश, थेट…

रोहित पवारांना स्वत:च्याच पक्षाकडून मोठा हादरा बसला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पदाधिकाऱ्यांना आंदोलनात न जाण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

रोहित पवारांना स्वत:च्याच पक्षाकडून मोठा हादरा! शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पदाधिकाऱ्यांना आंदोलनाबाबत महत्त्वाचे आदेश, थेट...
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 23, 2026 | 11:55 AM
Share

आमदार रोहित पवार यांच्याकडून मागील अनेक महिन्यांपासून अजित पवार अपघात प्रकरणावरून सातत्याने महायुती सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. मागील काही महिन्यात आंदोलन करून रोहित पवारांनी महायुती सरकारला पद्धतशीर घेरण्याचं काम केलंय. आता रोहित पवार यांनी नागपूरमध्ये ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’ची हाक दिली आहे. परंतु या मोर्चाची सैन्यबळाची रसद तोडण्यात आल्याची बाब समोर आली आहे. शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलनात न जाण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित पवार यांच्या नागपुरातील आंदोलनाला पक्षातील सदस्य जाऊ नये, याची तजवीज शरद पवार गटाकडून घेतली आहे. विदर्भातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना रोहित पवारांच्या आंदोलनात न जाण्याच्या सूचना वरिष्ठ  नेत्यांनी दिल्या आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये विदर्भातील शहराध्यक्ष ग्रामीण, शहरी जिल्हाध्यक्षांची रविवारी बैठक घेण्यात आली. शेगाव ते बुटीबोरीमार्गे नागपूर विधान भवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. यासंदर्भात रोहित पवारांची बैठक पार पडली. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना वेगळ्याच सूचना दिल्या आहेत. केवळ प्रदेश कार्यालयातून सूचना प्राप्त होतील, त्याच पाळण्याच्या सूचना विदर्भातील ग्राऊंड लेव्हलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. रोहित पवारांच्या कोणत्याही चळवळीत किंवा आंदोलनात सहभागी होऊ नये, अशा सूचना शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट एनडीएसोबत केंद्र आणि राज्यात जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्याकडून सत्तेत होणार नसल्याचे स्पष्ट केले जात आहे. तर जर पक्ष सत्तेत सहभागी झाला तर पर्यायी मार्ग निवडणार असल्याची भूमिका देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केली होती. त्यामुळे रोहित पवारांना डावलण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे रोहित पवार आता काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या निर्णयाने रोहित पवारांची पक्षाकडून कोंडी हात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रोहित पवार हे वेगळा निर्णय घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण
निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर...; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं...
CJI Surya Kant : निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर प्रश्नचिन्ह नव्हे; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं महत्त्वपूर्ण विधान, नेमकं काय म्हणाले? 
बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी....
Bisleri : बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी; कंपनीने काय दिलं स्पष्टीकरण
13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा
NSEL Scam : 13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा मोठा निर्णय
सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची
Gold Sliver Price Today : सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची वाढ, खरेदीदारांना धक्का
आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप...
Sanjay Raut on Rahul Narwekar : आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप; संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
Mumbai : मुंबईतील उघड्या मॅनहोलचा प्रश्न सुटणार; नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच....
Maharashtra Auto Rickshaw Strike : रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच; संपाबाबत नेमका संभ्रम काय?
विवेकानंद पाटील, रविराज साबळेसह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Vivekanand Patil : विवेकानंद पाटील, रविराज साबळे यांच्यासह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा