एक तोळा सोन्याच्या किमतीची चप्पल, 6 किलो कातडी चपलेला बल्ब आणि घुंगरु, चांगदेवाची ‘नागीण’ कशी आहे?

माणसाला अनेक गोष्टींचे छंद असतात. पंढरपुरातील चांगदेव दावणे यांना कातडी चपला घालण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या कातडी चपला आहेत. याच छंदापायी त्यांनी चक्क 25 हजार रुपयांची राजस्थानी माठाची चप्पल बनवली आहे.

एक तोळा सोन्याच्या किमतीची चप्पल, 6 किलो कातडी चपलेला बल्ब आणि घुंगरु, चांगदेवाची 'नागीण' कशी आहे?
Follow us
| Updated on: Dec 13, 2019 | 1:17 PM

पंढरपूर : माणसाला अनेक गोष्टींचे छंद असतात. पंढरपुरातील चांगदेव दावणे यांना कातडी चपला घालण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या कातडी चपला आहेत. याच छंदापायी त्यांनी चक्क 25 हजार रुपयांची राजस्थानी माठाची चप्पल बनवली आहे. ही चप्पल 15 वर्षापूर्वी बनवली आहे. म्हणजेच त्यावेळी जवळपास एक तोळा सोन्याच्या किमतीची ही चप्पल होती.

चांगदेव दावणे हे पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. चांगदेव दावणे यांची शरीरयष्टी धिप्पाड, पिळदार मिशा असा त्यांचा रूबाब. पण याच चांगदेवाला नाद लागला तो वेगवेगळ्या चपला जमवण्याचा. मागील 40 वर्षापासून त्यांनी आपला हा आगळा वेगळा छंद जोपासला आहे.

याच छंदातून त्यांनी एक चप्पल बनवून घेतली आहे. या चपलेचं नाव नागीण असं ठेवलं आहे. 2004 मध्ये तीन तळी कातड्याची सहा किलो वजनाची चप्पल त्यांनी तयार करून घेतली.  यासाठी तेव्हा त्यांना  25 हजार रूपये इतका खर्च आला.

राजस्थानी माठाच्या या चपलेला त्यांनी सुंदर सजवले आहे. तिला सात नागफण्या काढल्या आहेत. चालताना आवाज यावा म्हणून शंभर घुंगरे लावली आहेत. यापेक्षाही भन्नाट म्हणजे अंधारात चप्पल चमकावी यासाठी संपूर्ण चपलेवर विविध रंगाचे लहान बल्ब लावले आहेत. यासाठी छोटी बॅटरीसुध्दा बसवली.

घरची परिस्थिती  बिकट असतानाही चांगदेव यांनी आपला छंद जोपासला आहे. चांगदेव मामा जेव्हा ही राजस्थानी माठाची नागीण चप्पल घालून चालतात तेव्हा त्यांचा रूबाब हा पाहण्यासारखा असतो. चांगदेव यांच्या या छंदावरून हौसेला मोल नसते हे अधोरेखित होतं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.