Nilesh Rane : राणे असल्याचा फायदा होतोय, मंत्र्यासमोर असचं उभं राहिलं तर कोण..निलेश राणेंच्या वक्तव्याची चर्चा

Nilesh Rane : "तुम्ही काम दर्जेदार केलंच पाहिजे. ताफा बघून लोक सांगतायत की हा नारायण राणेंचा ताफा आहे. तस तुमचं काम बघून लोकांनी सांगितलं पाहिजे" असं निलेश राणे म्हणाले.

Nilesh Rane : राणे असल्याचा फायदा होतोय, मंत्र्यासमोर असचं उभं राहिलं तर कोण..निलेश राणेंच्या वक्तव्याची चर्चा
Nilesh Rane
| Updated on: Sep 08, 2026 | 11:24 AM

अनंत पाताडे, प्रतिनिधी : कुडाळ विधानसभेचे आमदार निलेश राणे हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेक मुद्यांवर ते स्पष्टपणे आपली भूमिका मांडत असतात. आता त्यांनी मतदारसंघातील त्यांचे विरोधक वैभव नाईक यांच्यावर टीका केली आहे. “मंत्रालयामध्ये विचारा कुडाळ मालवण मतदार सघाची काय किंमत होती, मागच्या 10 वर्षामध्ये 288 पैकी कोण ओळखत नव्हतं. मी स्वतःच मोठेपण सांगत नाही, राणे असल्याचा देखील फायदा होतोय. मंत्र्यासमोर असचं उभं राहिलं तर कोण किंमत देणारं आहे?. मी बघितलं नाही, मी सत्तेच्या कुठल्या बाजूला आहे. वाटेल ते बोललो आणि खरं आहे ते बोललो” असं निलेश राणे म्हणाले.

“नवीन सीईओना खडेबोल सुनावले. मी तुमच्याकडे चहाला सुद्धा येणार नाही. माझ्या शहराला तुम्ही जपलं पाहिजे, मी जपतो. माझ्या अंगाला डाग लागू देत नाही,तसं तुमच्याही अंगाला डाग लागता कामा नये.तुम्ही काम दर्जेदार केलंच पाहिजे. ताफा बघून लोक सांगतायत की हा नारायण राणेंचा ताफा आहेय. तस तुमचं काम बघून लोकांनी सांगितलं पाहिजे” असं निलेश राणे म्हणाले.

ही कारण स्वतः शोधली पाहिजे

शकूनी मामाची उपमा देत माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर निलेश राणे यांनी टीका केली. “पूर्वीचा तुमचा मान होता, तुम्ही का घालवला? लोकांनी तुम्हाला का घरी बसवलं. ही कारण स्वतः शोधली पाहिजे” असं निलेश राणे म्हणाले. “शकुनींनी आयुष्य नकारात्मक घालवलं. प्रतिशोधाच्या भानगडीत होता. कधी त्याला समाधान मिळालं नाही. कौरवांचा वंश संपला. माझ्याबरोबर चांगलं झालं नाही ना. त्यामुळे असे शकूनी आपल्या मतदारसघामध्ये होता कामा नये” असं निलेश राणे म्हणाले.

तो राग जनतेवर काढलेला नाही

“आमचे पण दोन पराभव झाले, राणे साहेब दोन वेळा हरले. तो राग जनतेवर काढलेला नाही. काहीचं चांगलं होता कामा नये असा शकूनी करायचा. त्यामुळं कधी महाभारताच्या निकालावर परिणाम झाला नाही पांडवचं जिंकले” असं निलेश राणे म्हणाले. निलेश राणे यांनी नावं न घेता माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us