
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. योजनेसाठी राज्यातील दीड कोटींपेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या आहेत. त्यांच्यांपैकी अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. परंतु अजूनही ही प्रक्रिया सुरु आहे. काही महिलांच्या खात्यांत येत्या काही दिवसांत पैसे जमा होणार आहे. काही महिलांच्या अर्जातील त्रुटी आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाही. त्यांनी नेमके काय करावे, यासंदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी केल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. यवतमाळच्या आर्णीत ही योजना वेगळ्याच कारणाने चर्चेत आली. महिलांसाठी सुरु झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झाले. विशेष म्हणजे, या भावाने ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे दिली तरी ही त्यांच्या खात्यात तीन हजार रूपये जमा झाले. ही तांत्रिक चूक आधार कार्डच्या शेवटच्या चार क्रमांकामुळे झाली आहे. ती दुरुस्त करुन पात्र महिलेच्या खात्यात पैसे वर्ग होणार आहे.