Ladki Bahin e-KYC : लाडक्या बहिणींनो नाव होऊ शकतं कट, ई-केवायसी करताना ही चूक करू नका, अन्यथा…

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी करावी लागणार आहे. मात्र ही केवायसी करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे नाव लाभार्थी यादीतून काढले जाण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin e-KYC : लाडक्या बहिणींनो नाव होऊ शकतं कट, ई-केवायसी करताना ही चूक करू नका, अन्यथा...
mazi ladki bahin
| Updated on: Sep 21, 2025 | 4:32 PM

Ladki Bahin e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता e-KYC करावी लागणार आहे. त्यासाठी सरकारने प्रक्रिया चालू केली असून ही e-KYC ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. दरम्यान, e-KYC नेमकी कशी करायची? त्यासाठीची प्रक्रिया काय आहे, याबाबतची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान, एकीकडे अनेक महिला ई-केवायसी करत असताना त्यांना अनेक प्रश्न पडत आहेत. आता मात्र महिलांनी केवायसी करताना योग्य काळजी घेतली नाही तर त्यांचे नाव थेट लाभार्थी यादीतून काढले जाण्याची शक्यता आहे. ई-केवायसी करताना पहिला आणि दुसरा मुद्दा आता अडचणीचा ठरू शकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळ नेमकी कोणती काळजी घ्यावी? हे जाणून घेऊ या…

ई-केवायसी नेमकी का केली जात आहे?

लाडकी बहीण योजनेत काही महिलांनी नियमांना डावलून लाभ घेतला होता. त्या महिलांची नावे लाभार्थी यादीतून हटवली जात आहेत. दुसरीकडे इतरही काही गैरप्रकार आढळून आले आहेत. हेच प्रकार थांबावेत यासाठी सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना e-KYC करणे बंधनकारक केले आहे. पात्र आणि योग्य महिलेलाच या योजनेचा लाभ मिळावा, असा उद्देश यामागे आहे.

दुसरा मुद्दा नेमका काय आहे?

ई- केवायसी करताना महिलांना दोन बाबी प्रमाणित कराव्या लागणार आहेत. तुम्ही सदर बाबी प्रमाणित केल्यानंतरच ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यातील दुसरा मुद्दा थोडा अडचणीचा होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक आणि योग्य तोच पर्याय निवडायला हवा. दुसऱ्या मुद्द्यात तुम्हाला माझ्या कुटुंबात केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिलाच लाभ घेत आहे याबाबत होय किंवा नाही यामध्ये उत्तर द्यायचे आहे. तसेच पहिल्या मुद्द्यातही तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्य शासकीय कर्मचारी नसल्याचे प्रमाणित करायचे आहे. तुमच्या कुटुंबात कोणीही शासकीय कर्मचारी नसूनदेखील तुम्ही होय या पर्यायावर क्लिक केल्यास भविष्यात तुम्हाला मिळणारा लाभ थांबवला जाऊ शकतो. त्यामुळेच या दोन्ही पर्यायांचे उत्तर देताना योग्य पर्याय निवडलेला आहे ना? याची खातरजमा करावी आणि नंतरच ई-केवायसीचे सबमीट बटण दाबावे.