Ladki Bahin : लाडक्या बहिणींना सर्वात मोठी खुशखबर! खात्यात जमा झाले थेट…3000 रुपयांबाबत मोठी अपडेट!
जून महिना संपला तरीही लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळाले नव्हते. आता अर्धा जुलै महिना संपलेला आहे. तरीदेखील महिला पैशाची वाट पाहात होत्या. त्यामुळे सरकार दोन्ही महिन्याचे एकूण 3000 रुपये एकदाच बँक खात्यावर टाकणार का? असे विचारले जात होते.

Ladki Bahin Installment : राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आथिक मदत केली जाते. जून महिना संपलेला असला तरीही या महिन्याचे पैसे अद्याप महिलांच्या बँक खात्यात पाठवण्यात आले नव्हते. परंतु आता याच लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर मिळाली आहे. लाडक्या बहिणींचे बँक खाते आता पैशांनी भरले आहे.
नेमकी काय माहिती समोर आली?
राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर 1500 रुपये पाठवले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे पैसे लवकरच बँक खात्यात जमा होतील, असे सांगितले जात होते. म्हणूनच लाभार्थी लाडक्या बहिणी रोज आपले बँक खाते तपासत होते. आता मात्र याच लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर मिळाली आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून 1500 रुपये पाठवले जात आहेत. लाडक्या बहिणींनी आपापले बँक खाते तपासावे असे आवाहन केले जात आहे.
जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार?
जून महिना संपला तरीही लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळाले नव्हते. आता अर्धा जुलै महिना संपलेला आहे. तरीदेखील महिला पैशाची वाट पाहात होत्या. त्यामुळे सरकार दोन्ही महिन्याचे एकूण 3000 रुपये एकदाच बँक खात्यावर टाकणार का? असे विचारले जात होते. परंतु याचे उत्तर आता नाही असे मिळाले आहे. सध्यातरी महिलांना फक्त जून महिन्याचे पैसे दिले जात आहेत. जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार, याबाबत सध्यातरी अनिश्चितता आहे.
पैसे जमा झाले नसतील तर काय करावे?
दरम्यान, जून महिन्याचा लाभ देण्यास सुरुवात झाल्याने लाभार्थ लाडक्या बहिणींनी आपापले बँक खाते तपासावे, असे आवाहन केले जात आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत, त्यांनाही लवकरच हा लाभ मिळेल, असे सांगण्यात आले आहे. ऐन पेरणीच्या काळातच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळाल्याने त्यांना यांचा चांगला लाभ होईल, असे म्हटले जात आहे.