आमची बदनामी बंद करा, नाही तर मी आत्महत्या करेन; पूजाच्या वडिलांचा आक्रोश

| Updated on: Feb 14, 2021 | 9:16 PM

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण अत्यंत व्यथित झाले आहेत. (lahu chavan's first reaction on Pooja Chavan suicide case)

आमची बदनामी बंद करा, नाही तर मी आत्महत्या करेन; पूजाच्या वडिलांचा आक्रोश
lahu chavan
Follow us on

बीड: पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे पूजाचे वडील लहू चव्हाण अत्यंत व्यथित झाले आहेत. पूजाच्या आत्महत्येवरून विनाकारण आमची बदनामी केली जात आहे. आमची ही बदनामी त्वरीत थांबवा. आम्हाला चार दिवस जगू द्या, नाही तर मी आत्महत्या करेन, अशी उद्विग्न प्रतिक्रिया लहू चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. (lahu chavan’s first reaction on Pooja Chavan suicide case)

लहू चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणात आमची बदनामी करू नका. आमचे अर्धे कपडे काढलेच आहेत. आता पूर्ण कपडे काढू नका. कृपा करा, आता आणखी बदनामी करू नका, अशी हातजोडून विनंती करतानाच तुम्ही आणखी बदनामी केली तर मी आत्महत्या करेन असा आक्रोशच त्यांनी केला.

सांगा आता कुणावर आरोप करू?

माझी मुलगी खूप चांगली होती. लोकं उगाच तिची बदनामी करत आहेत. राजकारणाच्या दबावाखाली मी बोलत आहे का असंही विचारलं जात आहे. पण माझ्यावर कोणताही दबाव नाही, असं लहू चव्हाण यांनी सांगितलं. मी पुण्याला गेलो होतो. तिथे विचारपूस केली. त्यावेळी पूजा गॅलरीत बसली होती. दीड वाजता ती खाली पडली. चक्कर येत असल्याचं ती सांगत होती, असं तिच्यासोबत राहणाऱ्या तिच्या मित्राने सांगितलं. सांगा आता मी कुणावर आरोप करू? असा सवाल त्यांनी केला.

25-30 लाखांचं कर्ज होतं

पूजाने पोल्ट्री व्यवसायासाठी 25 ते 30 लाखांचं कर्ज घेतलं होतं. पण लॉकडाऊनमुळे धंद्यात खोट आल्याने ती टेन्शनमध्ये होती, असं सांगत कर्जाच्या टेन्शनमुळे पूजाने आत्महत्या केल्याचे संकेतही त्यांनी दिले. तिच्यावर 25-30 लाखांचं कर्ज होतं. पप्पांचं चांगलं व्हावं म्हणून तिने तिच्या नावावर कर्ज घेतलं होतं. तिला पोल्ट्री काढायची होती. आम्ही बांधकाम केलं. बॅच टाकला. पण कोरोना आल्यामुळे आम्ही सर्वांना कोंबड्या फूकट वाटल्या. पोल्ट्रीतून आम्हाला एक रुपयाही आला नाही. सरकारला मदतीसाठी अर्ज दिला. मदतही मिळाली नाही. नंतर बर्ड फ्लू आला. त्यातही नुकसान झालं. त्यामुळे तिच्यावर संकट उभं राहिलं होतं. तेव्हा मी तिला बेटा घाबरू नको, माझी 25 लाखाची एलआयसी आहे. त्यावरून लोन घेऊ म्हणून सांगितलं. एलआयसीवर मला चार-पाच लाखाचं लोनही मिळालं. त्यानंतर एक दिवस पूजा म्हणाली गावाकडे मन लागत नाही. पुण्याला जाते. जाताना मी तिला 25 हजार रुपये खर्चाला दिले होते, असं त्यांनी सांगितलं. तिच्यावर कर्जाचा ताण होता. हप्ते भरण्याचं टेन्शन होतं, असंही ते म्हणाले.

शेवटचं बोलणं

ज्या दिवशी ही दुर्घटना घडली. त्या दिवशी पूजाशी बोलणं झालं होतं. तिला पैसे हवेत का म्हणून विचारलं होतं. ती नाही म्हणाली होती. त्यानंतर रात्री दोन वाजता मला तिच्या मित्राचा फोन आला. तिच्या डोक्याला मार लागल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे मी क्षणाचा विचार न करता त्याचवेळी पुण्याचा रस्ता धरला. सकाळी साडे आठ – नऊच्या सुमारास पुण्यात आलो. तेव्हा तिचा मृतदेहच दिसला. तिचा मृतदेह पाहून मला चक्कर आल्यासारखं झालं, असं सांगताना चव्हाण यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. (lahu chavan’s first reaction on Pooja Chavan suicide case)

 

संबंधित बातम्या:

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप, चित्रा वाघांना धमकीचे फोन

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पूजाच्या आत्महत्येची CID सारख्या संस्थेकडून चौकशी करा, आजोबांची मागणी

(lahu chavan’s first reaction on Pooja Chavan suicide case)