पूजाच्या आत्महत्येची CID सारख्या संस्थेकडून चौकशी करा, आजोबांची मागणी

सरकारनं CID सारख्या यंत्रणेमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी पूजाच्या वसंतनगरमध्ये राहणाऱ्या आजोबांनी केली आहे.

पूजाच्या आत्महत्येची CID सारख्या संस्थेकडून चौकशी करा, आजोबांची मागणी
पूजा चव्हाण

बीड : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर आता जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अशावेळी पूजाच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी तिच्या आजोबांनी केली आहे. सरकारनं CID सारख्या यंत्रणेमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी पूजाच्या वसंतनगरमध्ये राहणाऱ्या आजोबांनी केली आहे.(Grandfather demands investigation of Pooja Chavan case through CID)

वडील म्हणाले, चौकशी करा

पूजाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचे कुटुंब मानसिक धक्क्यात असून कुटुंब काही बोलायला तयार नाही. परळी शहरात पूजाचं घर आहे, या घरात तिचे आई-वडील राहतात पूजाच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. माझ्या मुलीच्या आत्महत्येची चौकशी करा एवढीच मागणी पूजाच्या वडिलांनी केली.

पूजाची बहीण दियाची पोस्ट

या प्रकरणी पूजाची बहीण दियाने एक भावूक पोस्ट केली आहे. त्यात तिने अनेक पूजाचं वर्णन करतानाच तिच्या मानसिकतेवरही भाष्य केलं आहे. दिया म्हणते, 2 दिवसांपासून मी पाहात आहे की तुम्ही काही ही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता, ती फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघिण होती माझी बहीण. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की कसं काही करेल आणि हे तुम्हालापण चांगलंपणे माहिती आहे. मला आजसुद्धा विश्वास होत नाही तिने सुसाईड केलं आहे आणि जरी केलं असेल तर मोठीच कोणती तरी गोष्ट असेन.

दीदीने नेहमी सर्वांना मदत केली आहे. काही विचार न करता तिने फक्त बंजारा समाज नाहीतर सर्वांना पाठिंबा दिला आहे. जेवढं होईल तेवढं तिने मदत केली आहे. मी तिची लहान बहीण आहे हे माझं नशीब आहे. ती आज आपल्या सोबत नाही याचं जर तुम्हाला एवढं दु:ख होत असेल, तर विचार करा आम्ही कसा स्वत:ला सांभाळत आहोत. मला आधीच याचा त्रास सहन होत नाही. मम्मी पप्पाला सांभाळायचं आहे अजून. आणि तुम्ही अशा पोस्ट टाकत आहात. निदान तिला जस्टिस मिळू शकत नाही तर अशा पोस्ट करुन आम्हाला त्रास तर देऊ नका. तिला स्वर्गामध्ये शांतीने राहू द्या , ती जर हे सर्व पाहात असेल तर तिला किती त्रास होत असेल विचार करा.

‘तांत्रिक अडचणीमुळे गुन्हा दाखल नाही’

पूजा चव्हाण प्रकरणाला आज आठवडा होत आहे. या प्रकरणावर पुणे पोलिसांनी माहिती दिली आहे. पूजा चव्हाण प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार असल्याचं सांगतानाच कायदेशीर अडचणींमुळे गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं. पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, काही कायदेशीर अडचणी असल्याने गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तसेच या प्रकरणातील दोन्ही तरुणांचे जबाब नोंदवण्यात आल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या :

संजय राठोड यांची हकालपट्टी करा, पूजा चव्हाण प्रकरणावरुन अतुल भातखळकर आक्रमक

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, एकनाथ शिंदे म्हणतात…

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?

Grandfather demands investigation of Pooja Chavan case through CID

Published On - 3:42 pm, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI