आठवणी जपण्यासाठी आईच्या मृत्यूनंतर मुलानं बांधलं आईचं मंदिर

आईच्या आठवणी या मंदिराच्या स्वरूपात जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने शिवकुमार यांनीहे मंदिर उभारले आहे. काशीबाई या हयात असताना त्यांच्या मुलांनी त्यांची मनोभावे सेवा केली.

आठवणी जपण्यासाठी आईच्या मृत्यूनंतर मुलानं बांधलं आईचं मंदिर
Mother Temple
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 3:20 PM

लातूर- लातूर जिल्ह्यातल्यातील चाकूर इथं एका मुलाने , आपल्या आईवरच्या प्रेमापोटी ” आईचं मंदिर ” उभारलं आहे . जन्मदात्या आईवर सर्वच जन प्रेम करतात ,त्यांची सेवा करतात .मात्र आईचं मंदिर उभारल्या गेल्याने मुलाची आईवरची श्रद्धा चर्चेला आली आहे. आई-वडिलांना वृद्धश्रमाची वाट दाखवणाऱ्या मुलांना आईचं हे मंदिर डोळ्यात अंजन घालणारं आहे.

आईच्या या मंदिरातच मी रमतो

चाकूर इथल्या काशीबाई सोनटक्के याचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं त्यानंतर मुलगा शिवकुमार याने आईचं मंदिर उभारलं आहे. आईच्या आठवणी या मंदिराच्या स्वरूपात जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने शिवकुमार यांनीहे मंदिर उभारले आहे. काशीबाई या हयात असताना त्यांच्या मुलांनी त्यांची मनोभावे सेवा केली. आई-वडिलांची सेवा कशी केली जाते याचा आदर्शच शिवकुमार आणि त्यांच्या भावंडानी घालून दिला आहे . आईच्या या मंदिरातच मी रमतो ,माझं जेवण देखील इथंच करतो असं शिवकुमार सांगतात.

आई- वडिलांच्या सेवेत ईश्वर भक्त

काशीबाई यांना तीन मुले आणि तीन मुली आहेत. या सगळ्या मुलांचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे आई गेल्यावर देखील मंदिराच्या माध्यमातून श्रद्धा फुलून वाहते आहे. आपल्या आई-वडिलांवर प्रेम केलं पाहिजे ,त्यांच्या सेवेतच ईश्वर भक्ती मानली पाहिजे ,असं साधू-संतांनी सांगितले आहे. हाच संदेश शिवकुमार यांनी आपल्या आईच मंदिर उभं करून दिला आहे. भविष्यात आईच हे मंदिर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे .

Virat Kohli Resign: संजय मांजरेकरांनी सांगितलं, विराटच कॅप्टनशिप सोडण्यामागचं नेमकं कारण…

Travel Special : पर्यटनाला जाण्याचा विचार करताय, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर तुमच्यासाठी ठरेल भन्नाट पर्याय

Crop Insurance : पीक विम्याचा प्रश्न आता राज्यपालांच्या दरबारी, उस्मानाबादच्या आमदारांची काय आहे भूमिका?