राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा; मतदानाला सुरुवात

Grampanchayat Election 2023 Voting begins : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. मतदान केंद्रांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर उद्या या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. वाचा सविस्तर...

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा; मतदानाला सुरुवात
| Updated on: Nov 05, 2023 | 9:22 AM

मुंबई | 05 नोव्हेंबर 2023 : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक पार पडतेय. ठिकठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ६१ सार्वत्रिक ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. भिवंडी 16 शहापूर 16 तर मुरबाड मध्ये 29 जागे साठी निवडणूक मतदान प्रक्रियेला सुरवात झाली आहे. तर 7 जागी पोटनिवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. यात एक ग्रामपंचायत बिनविरोध सहा ग्रामपंचायत विविध कारणे रद्द करण्यात आल्या आहे.तर सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही शहापूरमध्ये असून खरी लढत ही भाजप विरूद्ध ठाकरे गट अशीच होणार असली, तरी शिवसेना शिंदे गटातून शरद पवार गटात गेलेल्या आमदार पांडुरंग बरोरा विरुध्द अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार आहे.

हर्षवर्धन पाटील यांना तगडं आव्हान

इंदापूर तालुक्यातील 6 ग्रामपंचायत साठी आज मतदान पार पडणार आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या बावडा ग्रामपंचायतसाठी देखील आज मतदान होणार आहे. बावडा गावात हर्षवर्धन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. स्थापनेपासूनच बावडा ग्रामपंचायत ही माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहे. यंदा मात्र हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर तगड आव्हान आहे. बावडा गावात हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनल विरूद्ध दत्तात्रय भरणे यांच्या राष्ट्रवादीचं पॅनल अशी लढत होतेय. बावडा गावात हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशी लढत होणार आहे. बावडा ग्रामपंचायत 17 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात आहेत. हर्षवर्धन पाटील थोड्याच वेळात मतदानासाठी पोहोचतील.

मावळमध्ये मतदानाला सुरुवात

मावळात ग्रामपंचायत मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रात महिलांची मतदानासाठी मोठी गर्दी पाहायला मिळतेय. मावळ तालुक्यात एकूण 19 ग्रामपंचायती पैकी 4 ग्रामपंचायत बिनविरोध तर 15 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होतंय. मावळात 10 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होत्या. त्यातील 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या तर उर्वरित 5 ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे.मावळ मध्ये एकूण 52 मतदान केंद्र असून त्यासाठी 300 कर्मचारी काम पाहत आहेत. सरपंच पदाच्या एकूण 15 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात असून,ग्रामपंचायत सदस्य पदाच्या एकूण 79 जागांसाठी 207 उमेदवार रिंगणात असणार आहेत. तर अनेक उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे

अमरावतीत ग्रामपंचायत निवडणूक

आज अमरावती जिल्ह्यातील 36 ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. 38 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अमरावती जिल्ह्यात 20 सरपंच पदासह 149 सदस्यांकरिता 500 उमेदवार रिंगणात आहेत. 19 ग्रामपंचायींमध्ये सार्वत्रिक तर 17 ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. अमरावती जिल्ह्यात 85 मतदान केंद्रावर मतदान होत आहे.