AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?

Hotels Open Till 4 AM : फिफा वर्ल्डकप 2026 चा अंतिम सामना आज रात्री रंगणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट्स सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?
hotel open newsImage Credit source: Google
| Updated on: Jul 19, 2026 | 7:52 PM
Share

अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील फिफा वर्ल्डकप 2026 चा अंतिम सामना रंगणार आहे. न्यूयॉर्कमधील स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे. रात्री 12.30 वाजल्यापासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात फुटबॉलचे चाहते आहेत. या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट्स सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हॉटेल्स पहाटे 4 वाजेपर्यंत ठेवण्यास परवानगी

राष्ट्रीय रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई यांनी दिनांक 19.07.2026 रोजी फिफा वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना होणार असल्याने महाराष्ट्रातील सर्व खाद्यगृहे, हॉटेल व रेस्टॉरंट या आस्थापना पहाटेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. या मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 33 मधील तरतुदीनुसार राज्यातील खाद्यगृहे, हॉटेल व रेस्टॉरंट या आस्थापनाधारकांना त्यांच्या आस्थापना दिनांक 19 जुलै, 2026 रोजीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास खालील अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.

सरकारकडून अटी

राज्य सरकारने परवावनगी देताना काही अटी घातल्या आहेत. आस्थापनाधारकाने आस्थापनेच्या आतील व बाहेरील बाजूस मुबलक प्रमाणामध्ये खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करुन, सदर जागी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगण्यात आले आहे. तसेच आस्थापनेच्या आतील बाजूस अथवा बाहेर कोणताही अनुचित प्रकार/गुन्हा घडल्यास व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी आस्थापनाधारकावर राहील. त्याप्रमाणे आस्थापनाधारक / परवानाधारक हे कारवाईस पात्र राहणार आहेत.

वेळेच्या संदर्भामधील शिथिलता ही जागेच्या परवान्याकरीता देण्यात येत आहे. परंतु ध्वनीक्षेपण कायदा व नियमांचे पालन करणे आस्थापनाधारकास बंधनकारक राहणार आहे. तसेच, याबाबत मा. सर्वोच्च/उच्च न्यायालयाने यासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा.

वरीलप्रमाणे वाढीव वेळेची परवानगी, फक्त बंदिस्त जागेतील/इमारतीमधील आस्थापनांनाच देण्यात येत आहे. सार्वजनिक शांतता तसेच, कार्यजा व सुव्यवस्था यांचा विचार करुन, योग्य वाटल्यास आवश्यकतेनुसार वरीलप्रमाणे वेळेच्या बंधनामधील शिथिलता नाकारण्याचे अधिकार स्थानिक पोलीस प्रशासनास राहणार आहेत. तसेच, सर्वत्र अत्यंत चोख बंदोबस्त ठेवण्याबाबत सर्व संबधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच