
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे 19 वर्षांत तरुणीवर दोन जणांकडून बलात्कार प्रकरणी रांजणगाव पोलिसांनीदोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना 7 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी पीडित तरुणीच्या अंगावरील सोन जबरदस्ती काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीतून देखील मोठी बातमी समोर येत आहे. 65 बेकायदा इमारती उभारणारे भूमाफिया मोकाट फिरत आहेत. 260 हून अधिक भूमाफिया गायब, नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेच्या मोबाइल संचाची तांत्रिक तपासणी करण्यात येत असून, पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक तपासणीत उघडकीस आले आहे.
जयपूर पोलिसांनी जयपूरमधील आयआयटी बाबांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. बाबाची तपासणी करताना, गांजा (अंमली पदार्थ) आढळून आला. तथापि, प्रमाण कमी असल्याने, बाबांना अटक करण्यात आली नाही.
महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांच्या मुंबईत झालेल्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांचे विधान अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ४० दिवस छळले आणि अशा व्यक्तीला चांगले म्हणणे हे मोठे पाप आहे, म्हणून अबू आझमी यांनी माफी मागावी. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा.
अहमदपूर लातूरहून येणाऱ्या बसला आज दुपारी अडीच वाजता महाराष्ट्रातील लातूर शहराजवळील नांदगाव पार्टी येथे अपघात झाला. ही बस अहमदपूरहून लातूरला येत होती. बस नांदगाव पार्टी येथे पोहोचताच, वेगाने येणाऱ्या मोटारसायकलला टाळण्यासाठी चालकाने बस दुभाजकावर आदळवली. यादरम्यान एक भीषण अपघात झाला आणि बस उलटली. या अपघातात २० ते २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लातूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कल्याण रेतीबंदर खाडी परिसरात रेतीबंदर ते उंबर्डे दरम्यान बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी रेती बंदर ते उंबर्डे दरम्यान खाडीलगत छापे टाकले.
घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने रायगड भवनवर 2011 पूर्वीच्या झोपड्याचा सर्वे करण्यात यावा, 2011 पूर्वीच्या झोपडीवर तोडक कारवाई थांबवावी, यासाठी आंदोलन करण्यात आले.
भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा या पिकांची शासनाने खरेदी करावी, या मागणीसाठी अकोल्यामध्ये आज काँग्रेसकडून धरणे आंदोलन करण्यात आली.
बिहार बुद्धगया येथील महाबोधी महाविहार येथील 1949 चा महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट कायदा दुरुस्त करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, अशी मागणी बौद्ध समाजाचे वतीने करण्यात आली. अमरावतीच्या जिल्हाधीकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन त्यासाठी करण्यात आले.
राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा निकालानंतर परिषदेच्या 5 जागा रिक्त होत्या. विधान परिषदेतील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
लोकांनी आम्हाला प्रचंड बहुमत दिलंय. विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ नाही. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील,असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच शिंदेंनी मविआवर टीका केली केली. मविआ म्हणजे महाराष्ट्र विरोधी आघाडी, असं शिंदे म्हणाले.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आमरण उपोषण केलं आहे. आज (3 मार्च2025 )पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी उपोषणाला करणार सुरुवात केली आहे.उपोषणस्थळी ज्ञानेश्वरी मुंडे यांचे कुटुंबीय देखील दाखल झाला आहेत. 16 महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांची परळी तहसील समोरील मैदानात हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार असून जोपर्यंत आमच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण असंच सुरू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकावर गेल्या आठवड्यात एका तरुणीवर अत्याचार झाला होता. याच गुन्ह्यातील गुन्हेगार दत्ता गाडे आणि पीडित तरुणीचा कोणताही संपर्क नाही पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर. गाडे याने वकिलांमार्फत आपण पीडित तरुणीला महिनाभरापासून ओळखत होतो. असा दावा केला होता. त्यामुळे या दोघांच्या फोन कॉलची चौकशी व्हावी, अशी मागणी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी केली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केल्यानंतर त्याच्या आणि पीडितेच्या मोबाईलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासले आहेत. यामध्ये कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आलेले नाही.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान सभापती विरोधात अविश्वास ठराव झाल्याने 18 पैकी 15 सदस्य विद्यमान सभापतींच्या विरोधात आहेत. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्वास सादर करणारे 15 सदस्य पोलीस बंदोबस्तात दाखल झाले आहेत. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्ताने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झालं आहे. ज्यांचा विरोधात अविश्वास ठराव आणला आहे ते अजित पवारांचा राष्ट्रवादीचे नेते आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.
पुणे बलात्कार प्रकरण – आरोपी दत्ता गाडे आणि पीडित तरुणीचा कोणताही संपर्क नाही अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
दत्तात्रय गाडे याने वकिलांमार्फत आपण पीडित तरुणीला महिनाभरापासून ओळखत होतो असा दावा केला होता. मात्र संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले नाही.
हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. मुलभूत अधिकार शाबित राहिले पाहिजेत – आव्हाडांची मागणी
प्रेमीयुगुलाने वीज टॉवरला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील उचली शिवारात उघडकीस आली. रोहित रमेश लिंगायत (25) आणि 14 वर्षीय मुलीने आपली जीवनयात्रा संपविली.
राज्यात रोज लाडक्या बहिणींचा विनयभंग होत आहे, राज्यात केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नाही – संजय राऊतांचे टीकास्त्र
दिनकर पाटील हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंज येथे आले आहेत. भेटीचे कारण दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले नसले तरी मोठ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी तातडीने बोलवल्याची माहिती समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यात 2024 या एका वर्षात तब्बल 56 बलात्काराच्या तर 231 विनयभंग घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे वर्षभरात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या तब्बल 95 घटना तर अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या 87 घटना घडल्या आहेत. छेडखानी, विनयभंग, अत्याचार अशा घटना पाहता पोलिसांचा धाक संपला की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.
ठाणे ते मुलुंड-ऐरोली मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा. गेल्या एक तासापासून वाहतूक कोंडी रस्त्यावर दिसून येत आहे. सिग्नल यंत्रणा आणि वाहन बंद पडल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहन अडकून पडली आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे आणि मुंबई वाहतूक विभागाची नाचक्की.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेड प्रकरणात सात आरोपींपैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पॉस्को अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे. या आरोपींना न्यायालयात आज दुपारी हजर केलं जाणार आहे.
टपालाने येणारे आधारकार्ड, पॅन कार्ड, नियुक्ती पत्र चक्क विरार पश्चिम पुरापाडा येथील एका नाल्यात सापडल्याने खळबळ माजली आहे. अर्नाळा भागातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कावळी, जागरूक नागरिक संतोष शिर्के, गणेश तांडेल यांनी हा सर्वप्रकार उघड केला आहे. सापडलेल्या कागदपत्रात आधारकार्ड, पॅन कार्ड, एल आय सी पत्र, नियुक्ती पत्र अशा कागदपत्राचा समावेश असून हे सर्व अर्नाळा गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील पत्यावरील असल्याचे समोर आले आहे. जागरूक नागरिकांनी नाल्यात सापडलेली सर्व कागदपत्र जमा करून ती अर्नाळा पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत.
सात पीर दर्गा विरुद्ध नाशिक महानगर पालिका यांच्यात सुनावणी… छत्रपती संभाजीनगर येथे ही सुनावणी होणार… सकल हिंदू समाजाच्या वतीनेही हस्तक्षेप याचिका दाखल होण्याची शक्यता… नाशिकच्या जिल्हा न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतांना वक्फ बोर्डात सुनावणी… फेब्रुवारी महिन्यात नाशिक महानगरपालिकेने दर्ग्याच्या परिसरातील काढले होते अतिक्रमण… वक्फ बोर्डाच्या सुनावणीत आज काय घडतं याकडं लक्ष
नाशिक | मार्चच्या पहिल्या दिवसापासून शहरातील किमान व कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात… किमान तापमान १७.९ अंश सेल्सियस, तर कमाल तापमानाने ३५.४ अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडला.. पुढील काही दिवसांत तापमान ३६ ते ३८ अंशांपर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली… उत्तरेकडील गार वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता उष्णतेच्या लाटांची शक्यता… सलग आठ दिवसांपासून नाशिक शहरात कोरडे हवामान… कमाल तापमानाच्या वाढीमुळे उकाडा, सकाळपासून उन्हाच्या झळा
काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर तसेच आता प्रशांत कोरटकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन… मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी,शिवप्रेमी सहभागी होणार… खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, बच्चू कडू, यशोमती ठाकूर देखील मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती… अमरावतीच्या डॉ पंजाबराव देशमुख स्मारक पंचवटी चौक येथून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा इर्विन चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा..