AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donlad Trump : अमेरिकेची सर्वात मोठी हार, इराणसमोर ट्रम्प झुकले, मैदानातून पळ काढणारी भूमिका

Donlad Trump : इराण मुद्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नवीन भूमिका घेतली आहे. हे एकप्रकारे हार मानण्यासारखं आहे. इस्रायलसाठी सुद्धा हा मोठा झटका आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांजवळ ही इच्छा बोलून दाखवली आहे.

Donlad Trump : अमेरिकेची सर्वात मोठी हार, इराणसमोर ट्रम्प झुकले, मैदानातून पळ काढणारी भूमिका
Donald trump Image Credit source: PTI
| Updated on: Aug 10, 2026 | 8:25 AM
Share

इराणची अणवस्त्र क्षमता संपवणं या एकमेव उद्देशाने अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात युद्ध सुरु केलं होतं. पण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता त्याचं मुद्यावरुन माघार घेणार आहेत. इराण सोबत अणवस्त्र डील न करताच अमेरिकेला हे युद्ध संपवायचं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांजवळ ही इच्छा बोलून दाखवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची ही भूमिका म्हणजे अमेरिकेचा हा सर्वात मोठा पराभव आहे. कारण लक्ष्य साध्य न करताच ते मैदानातून पळ काढत आहेत. त्याशिवाय इस्रायलसाठी सुद्धा हा झटका आहे. इराणचा अणवस्त्र कार्यक्रम हाच दोन्ही देशांसाठी युद्धाचं मुख्य कारण होता. इराण नेहमीच इस्रायलवर अणूबॉम्ब टाकण्याची धमकी देत आला आहे. त्यामुळे इस्रायलने पद्धतशीरपणे कित्येक वर्ष वेगवेगळ्या मार्गांनी इराणचा अणवस्त्र कार्यक्रम उधळून लावला. पण आता ट्रम्प इराणशी अणवस्त्र डील न करता माघार घेत असतील, तर त्यामुळे इस्रायलला इराणपासून असलेला धोका कायम राहणार आहे.

इराण विरुद्ध सैन्य कारवाई थांबवून डोनाल्ड ट्रम्प यांना रणनितीमध्ये बदल करायचा आहे. वॉशिंग्टन आता तेहरानवर आर्थिक दबाव टाकण्याच्या रणनितीवर काम करणार आहे. रविवार ‘एक्सियोस’ ला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली नवीन भूमिका सांगितली. इराणची विस्कटणारी आर्थिक घडी आणि तिथल्या महागाईवर आमची बारीक नजर आहे असं ट्रम्प यांनी सांगितलं. इराणमध्ये मोठ्या प्रमाणात महागाई आहे. त्यांच्याकडे पैसे नाहीयत. ही गोष्ट ध्यानात घेऊन आम्ही शांत आहोत. त्यांच्यासोबत अंशत: चर्चा सुरु आहे असं ट्रम्प यांनी सांगितलं.

नरमाईची भूमिका स्वीकारण्यामागे हे सुद्धा एक कारण

डोनाल्ड ट्रम्प यांच्यानुसार, इराणची आर्थिक स्थिती खूप खराब आहे. त्यांच्याकडे सैनिकांचं वेतन देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीयत. अमेरिकी नौदलाच्या नाकेबंदीने तेहरानच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव आणखी वाढवला आहे. इराणवर सैन्य कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर आर्थिक आणि कूटनितीक दबाव टाकण्याचा आखातामधील मित्र देशांनी सल्ला दिल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. इराण विरुद्ध युद्ध लढताना अमेरिकेचा मिसाइल स्टॉक मोठ्या प्रमाणात कमी झाल्याच्या बातम्या अलीकडे प्रसिद्ध झाल्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका स्वीकारण्यामागे हे सुद्धा एक कारण असू शकतं.

Follow Us
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील