Maharashtra Assembly Session 2026 LIVE : लाल किल्ला स्फोट प्रकरणातील दोन्ही आरोपींना 10 दिवसांची NIA कोठडी
Maharashtra Assembly Budget Session 2026 LIVE Updates: अर्थसंकल्पीय अधिवेशाचा आज तिसरा दिवस आहे. अनेक मुद्द्यांवर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात आज काय काय होणार, त्याचे अपडेट्स जाणून घ्या..

LIVE NEWS & UPDATES
-
सांगली – ‘कृष्णाई मिनी सरस’ प्रदर्शनाला सुरुवात
सांगली मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने कृष्णाई मिनी सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ‘उमेद’च्यावतीने या जिल्हास्तरीय ‘कृष्णाई मिनी सरस’ बचत गट उत्पादन विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या असून प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील शंभरहून अधिक बचत गटांनी आपले स्टॉल्स लावले आहेत.
-
बीड – वकील संघाकडून काम बंद आंदोलन
बीड जिल्हा न्यायालयाच्या परिसरात वकिलाला झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करा या मागणीसाठी वकील संघाच्या वतीने न्यायालयाच्या दारात काम बंद आंदोलन करण्यात आले. जिल्हा वकील संघांचे सदस्य ॲड. राम डोंगरे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत चोवीस तास झाले तरी गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ जिल्हा न्यायालयाच्या दारात वकिलांनी काम बंद आंदोलन केले.
-
-
बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणी पाचवी अटक
बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणी बदलापूर पोलिसांनी पाचव्या आरोपीला अटक केली आहे. सुमित सोनकांबळे असं आरोपीचं नाव आहे. स्त्री बीज प्रकरणी अवैधरित्या इंजेक्शन्स आणि इतर औषधांचा पुरवठा केल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
-
लाल किल्ला स्फोट प्रकरणातील दोन्ही आरोपींना 10 दिवसांची NIA कोठडी
लाल किल्ला स्फोट प्रकरणातील दोन्ही आरोपींना 10 दिवसांची NIA कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टातील विशेष NIA कोर्टाने ही कोठडी सुनावली आहे. तुफैल अहमद भट आणि जमीर अहमद अहंगर अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. या दोघांवर शस्त्र आणि दारूगोळा गोळा केल्याचा आरोप आहे.
-
दादर रेल्वे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त, पालिका-पोलीस संयुक्त धडक कारवाई
अनेक वर्षापासून स्टेशन परिसरात कब्जा केलेल्या फेरीवाल्यांवर मुंबई महानगरपालिका, मुंबई वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई केली आहे. दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसर, केशवसुत उड्डाणपुलाखालील भाग, रानडे रोड, एन. सी. केळकर रोड अतिक्रमणमुक्त झाला आहे. हजारो फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तयांच्याकडून माल-सामग्री जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
-
-
कर्नाटकच्या आडमुठेपणामुळे महाराष्ट्रातील सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित
कर्नाटकच्या आडमुठेपणामुळे महाराष्ट्रातील सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत. उजनी धरणातून सोडलेले पाणी कर्नाटकने आडवल्याने महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कर्नाटक सरकारने भीमा नदीवर उमराणी गावाजवळ नव्याने उभारलेल्या बंधाऱ्यामुळे महाराष्ट्रातील 9 गावांना फटका बसत आहे. उमराणी गावाजवळ 1 टीएमसी पाणी अडवल्याने दक्षिण सोलापूर, अक्कलकोटअधिक शेकडो हेक्टर शेती धोक्यात आली आहे.
-
सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप फाटे याला अटक करा बीडमध्ये उपोषण
जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप फाटे याला अटक करण्याच्या मागणीसाठी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कुटुंबीयांचे आमरण उपोषण सुरू आहे. यादरम्यान त्यांनी tv9 शी बोलताना आरोपी प्रदीप फाटे याला तात्काळ अटक करावी तसेच पारदर्शक तपास व्हावा यासाठी एसआयटी गठीत करून तपास करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. आपण तपासाबाबत समाधानी नसल्याची देखील प्रतिक्रिया मयुरी जाधवर यांनी दिली आहे. तर पोलिसांनी आम्ही उन्हामुळे टाकलेला मंडप हटवला, गुन्हे दाखल करू अशी धमकी दिली असा आरोप मयुरी जाधवर यांनी केलाय. दरम्यान पोलिसांनी याबाबत कुठल्याही प्रकारची परवानगी नसून जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत यामुळे आपण पेंडॉल हटवण्यास सांगितले असे तोंडी माहिती देताना सांगितले आहे.
-
-
इगतपुरीच्या मानस हॉटेलच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
नाशिक : इगतपुरीच्या मानस हॉटेलच्या संचालकांवर इगतपुरीत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटे संमतीपत्र तयार करून शासनाची आणि आदिवासी इसमाची दिशाभूल केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात मानस हॉटेलचे संजीव करंबेळकर यांच्यासह इतर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 42 गुंठा जागेचे खोटे संमतीपत्र तयार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.
-
सदाशिव पेठत उलट्या दिशेने येणाऱ्या गाडीमुळे मोठी वाहतूक कोंडी
पुण्यातील सदाशिव पेठ मध्ये उलट्या दिशेने येणाऱ्या गाडीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सामान्य नागरिक व रूपाली ठोंबरे यांच्यामध्ये रस्त्यातच बाचाबाची झाली आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांच्या नातेवाईकाकडून वाहतुकीचे नियम मोडत उलट्या दिशेने गाडी चालवण्यात आली.
-
सचिन जाधवर यांच्या कुटुंबीयांना भर उन्हात उपोषण करण्याची वेळ
बीड जिल्ह्यात सचिन जाधवर यांच्या कुटुंबीयांना भर उन्हात उपोषण करण्याची वेळ आली आहे. उपोषण स्थळी लावलेला मंडप पोलीस अधिकाऱ्यांनी काढायला लावला आहे. मंडप काढून घ्या अन्यथा गुन्हे दाखल करू असा इशारा पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे.
-
चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात मोठी घडामोड
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस नेते आणि चिमूर विधानसभा क्षेत्रातील महत्त्वाचे काँग्रेस नेते, माजी आमदार अविनाश वारजूरकर आणि माजी जि. प. अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनी याच क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.
-
शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाची सिनेस्टाईल गुंडागर्दी
सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या अल्पसंख्याक जिल्हाप्रमुखाची सिनेस्टाईल गुंडागर्दी. ऑफिसच्या बाजूला गाडी लावण्याच्या झालेल्या वादातून थेट चारचाकी गाडीच फोडली. शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मुस्ताक शेख यांचे गाडी फोडतानाचे व्हिडिओ वायरल.
-
नागपूरमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृ्त्यू
नागपूर शहरातील अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कळमना पोलीस ठाणे हद्दीत दोन वर्षांच्या कुश पटले या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मिनिमाता नगर, गल्ली क्रमांक १२ इथं घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुश घरासमोर खेळत असताना शेजाऱ्याच्या पाण्याच्या टाकीजवळ गेला. त्यावेळी अचानक तोल जाऊन तो थेट टाकीत पडला. काही वेळाने ही बाब लक्षात आल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
-
अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का? रोहित पवारांचा सवाल
FIR दाखल करायला घेतलेली, पण ती नंतर रद्द केली. अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का? उद्या सकाळी 10 वाजता आम्ही बारामती पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करू. तिथे न्याय नाही मिळाला तर तिथल्या न्यायालयात आम्ही दाद मागू, असं रोहित पवारांनी सांगितलं आहे.
-
पोलिसांनी FIR दाखल करण्यास नकार दिला- रोहित पवार
“माझं स्टेटमेंट टाइप करताना एक मोठे अधिकारी आले आणि ते म्हणाले, हे एफआयआर होऊ शकत नाही. मग आम्ही त्यांना विचारलं की, का नाही होऊ शकत? त्यावर ते म्हणाले की, हा पोलिसांचा अधिकार आहे. आम्ही ही एफआयआर नोंद करू शकत नाही. तुम्हाला जिथे जायचंय, तिथे जा. ज्यांना कोणाला सांगायचंय, त्यांना सांगा. दुर्दैवाने या देशाचा नागरिक म्हणून आमचाच अधिकार आम्हाला वापरू देत नाहीयेत,” अशी तक्रार रोहित पवारांनी केली.
-
रोहित पवारांची DGCA विरोधात मरिन ड्राइव्ह पोलिसांत तक्रार दाखल
रोहित पवारांनी DGCA विरोधात मरिन ड्राइव्ह पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. डीजीसीएविरोधात गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी रोहित पवार आक्रमक झाले आहेत. “एफआयआर करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. डीजीसीएनं व्हिएसआरचे फक्त 5 विमान ग्राऊंड केले,” असं ते म्हणाले.
-
रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापन
रायगडमध्ये शिवसेनेला विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. कारण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापन करण्यात आली आहे. झेडपी अध्यक्षपद भाजपकडे, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलं आहे.
-
कल्याणमध्ये अनधिकृत ‘युसूफ हाईट्स’ इमारतीची फाईल गहाळ झाल्याने खळबळ
कल्याणमध्ये अनधिकृत ‘युसूफ हाईट्स’ इमारतीची फाईल गहाळ झाल्याने खळबळ उडाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य अभिलेख कक्षातून मूळ गायब झाल्याचं कळतंय. RTI मध्ये माहिती मागितल्या नंतर प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्राबाहेर नेल्याचा किंवा नष्ट केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
आता महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ अंतर्गत पालिकेने बाजारपेठ पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. फाईलचा शोध आणि पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांकडून फॉरेन्सिक पथक केडीएमसी अभिलेख कार्यालयात दाखल झाले आहेत. फाईल नेमकी कुठे गायब झाली याचा तपास सुरू आहे.
-
सोलापुरात अवकाळी पावसामुळे आंबा बागेचं नुकसान
सोलापुरात अवकाळी पावसामुळे आंबा बागेचे नुकसान झालं. वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आंबा बागेला आलेला मोहोर पूर्णपणे गळून गेला. यावर्षी आंब्याला चांगला मोहोर आला होता त्यामुळे चांगले पीक येण्याची आशा होती. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सर्व मोहोळ खाली पडला. गेल्या वर्षीही अशाच पद्धतीने अवकाळी पावसामुळे आंब्याचे नुकसान झालं होतं.
-
गोंदियात धान बोनस रखडल, हजारो शेतकरी प्रतीक्षेत
गोंदियात धान बोनस रखडल्यामुळे हजारो शेतकरी प्रतीक्षेत आहे. भीम पोर्टलच्या त्रुटींमुळे 2,268 शेतकऱ्यांचे 4.95 कोटी प्रलंबित आहेत. बोनससाठी शेतकऱ्यांना पणन कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. प्रशासनाकडून दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे,
-
फळांवर उंदीर मारण्याचे औषध फवारणाऱ्या फळ विक्रेत्याच्या बेकायदेशीर दुकानावर BMCची कारवाई
मालाडमधील फळांवर उंदीर मारण्याचे औषध फवारणाऱ्या फळ विक्रेत्याच्या बेकायदेशीर दुकानावर BMCने कारवाई केली. फळ विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फॉरेन्सिक टीमने नमुनेही घेतले.
-
अवकाळी पावसामुळे सोलापूरमध्ये रब्बी पिकांचं मोठं नुकसान
अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं. अवकाळी पावसामुळे मंद्रूप मधील शेतकऱ्याचे ज्वारीचं पीक पूर्णपणे झोपलं. हातातोंडाशी आलेली ज्वारी अवकाळी पावसामुळे हातातून गेली. खरीब हंगामानंतर आता रब्बी हंगामातील पीके हातातून गेली, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
-
काँग्रेस आमदार सज्जाद पठान यांना बिष्णोई गँगची धमकी
बिष्णोई गँगची धमकी मिळालेले काँग्रेस आमदार सज्जाद पठान डीजी ऑफिसला काही वेळात होणार रवाना. काँग्रेसचे सर्व आमदार देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट. सज्जाद पठाण यांनी टीव्ही9 वर सांगितली आपबिती. मारलं तरी पैसे मिळणार नाहीत, आमदारांना धमकी मिळतेय कायदा सुव्यवस्था राहीला नाही अशी दिली प्रतिक्रिया.
-
एफआयआर होत नाही, तो पर्यंत उठणार नाही – रोहित पवार
“आज आमचा एफआयआर घेतला नाही, तर उद्या बारामतीला जाऊन लोकांच्या उपस्थितीत जाऊन तिथल्या पीआय समोर जाऊन बसू. एफआयआर होत नाही, तो पर्यंत उठणार नाही” असं रोहित पवार म्हणाले.
-
त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही – रोहित पवार
“टीडीपी नेत्याचे आणि VSR चे आर्थिक संबंध. 28 तारखेलाच VSR कंपनीला क्लीन चीट देण्याचा प्रयत्न झाला. राममोहन नायडूंना पदावर राहण्याचा अधिकार नाही. पाताळात जावं लागल तरी जाऊ. जो जबाबदार माणूस आहे, त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही” असं रोहित पवार म्हणाले.
-
डीजीसीएने सुद्धा चूक केली – रोहित पवार
“VSR ला तुम्ही चूक केली सांगताय तर डीजीसीएने सुद्धा चूक केली. आता तुम्ही VSR वेंचरच्या मालकावर कारवाई केली पाहिजे. डीजीसीएचे जे अधिकारी या विमानाशी निगडीत होते. त्यांच्यावर कारवाई होणं गरजेच आहे” असा आरोप रोहित पवार यांनी केला.
-
VSR चा मालक हलकट माणूस – रोहित पवार
“तुम्ही दिखावा करताय, Action घेतली असा दाखवताय. VSR च्या पाच विमानांची उड्डाणं थांबवली. VSR चा मालक हलकट माणूस. तो कामचुकार माणूस. मेन्टेन्समध्ये पैसे खातोय” असा आरोप रोहित पवार यांनी केला.
-
मंत्र्याचा राजीनामा मागत राहणार – रोहित पवार
डीजीसीएने क्लीन चीट दिली. मंत्र्याचा राजीनामा मागत राहणार. हवाई वाहतूक मंत्र्याकडून VSR ची पाठराखणं. DGCA ने दिलेले अहवाल समोर मांडणार. VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप रोहित पवार यांनी केला.
-
ज्या दिशेने तपास जायला पाहिजे, त्या दिशेने हा तपास जात आहे – रोहित पवार
ज्या दिशेने तपास जायला पाहिजे, त्या दिशेने हा तपास जात आहे. डीजीसीएने जो अहवाल दिला त्यावर मी बोलेन. दोन दिवसात अजून एक प्रेस घेणार. त्या माध्यमातून अजून काही गोष्टी सांगणार आहे. 28 जानेवारीला डीजीसीएने अहवाल दिला असं रोहित पवार म्हणाले.
-
जो घात झाला,अपघात झाला याची माहिती समोर आली पाहिजे – रोहित पवार
जो घात झाला,अपघात झाला याची माहिती समोर आली पाहिजे. दादांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी महाराष्ट्रातील सामान्य लोकं या सर्वांची इच्छा आहे.ते त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोणी सोशल मीडियावर, कोणी चहाच्या टपरीवर बोलत आहेत. लाडकी बहिण योजना आणली तोच माणूस तिथे राहिला नाही असं रोहित पवार म्हणाले.
-
आमदार रोहित पवार DGCA विरोधात गुन्हा नोंदवणार
आमदार रोहित पवार DGCA विरोधात गुन्हा नोंदवणार. VSR कंपनीवर कारवाईला उशीर केल्याने गुन्हा नोंदवणार. रोहित पवारांकडून VSR कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित.
-
सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात शेतीपिकांचे मोठे नुकसान
अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात शेतीपिकांचे मोठे नुकसान. अवकाळी पावसामुळे मंद्रूप मधील शेतकऱ्याची टोमॅटो बाग पूर्णपणे झोपली. हातातोंडाशी आलेली टोमॅटो बाग जमीनदोस्त झालीय. या बागेसाठी एकरी 40 हजार खर्च केला. त्यातून दीड लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं. मात्र अवकाळी पावसामुळे काढणीला आलेली टोमॅटो बाग पूर्णपणे झोपली.
-
सोलापूर शहरातील कोनापुरे चाळीतील मनपा दवाखान्याची अज्ञातांकडून तोडफोड
सोलापूर शहरातील कोनापुरे चाळीतील मनपा दवाखान्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. एकाच दवाखान्याची अज्ञातांकडून आतापर्यंत चार ते पाच वेळा तोडफोड करण्यात आली. तोडफोडीमध्ये मनपा दवाखान्यातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोनापुरे चाळीतील एका समाज मंदिरामध्ये सुरु करण्यात आलेल्या मनपा दवाखाना बंद पाडण्यासाठी वारंवार प्रयत्न होतोय. महापालिका आरोग्य विभागाकडून सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
-
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी थोड्याच वेळात निवडणूक
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी थोड्याच वेळात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. भाजप आणि शिवसेनेचे सहलीला गेलेले सर्व सदस्य रामायण बंगल्यावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात सर्व नगरसेवक महापालिकेत जाणार आहेत. भाजपचे मच्छिंद्र सानप सभापती होणार हे जवळपास निश्चित आहे. तर अजित दादांच्या राष्ट्रवादीचे मुकेश शहाणे वेळेवर माघार घेण्याची शक्यता आहे.
-
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना रुबी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज…
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना रुबी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या चार दिवसापासून शरद पवार हे रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते…. प्रकृती व्यवस्थित असल्याने शरद पवारांना डिस्चार्ज देण्यत आला आहे.
-
रोहित पवारांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर चौकशी व्हावी… – सुप्रिया सुळे
रोहित पवारांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर चौकशी व्हावी… सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. रोहितने अभ्यासपूर्वक पाठपुरावा केला आहे… दादांच्या विमान अपघाताचं सत्य समोर आलंच पाहिजे… ऑडिट प्रत्येक विमानांचं झालं पाहिजे… विमान अपघातप्रकरणी पारदर्शक चौकशी व्हावी… असं वक्तव्य देखील सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
-
आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथे विद्युत तारांचे शॉर्टसर्किट, दोन शेतकऱ्यांचे घरं जळून खाक
बीडच्या दौलावडगाव येथे मध्यरात्री अचानक विद्युत तारांमध्ये शाॅटसर्किट झाल्याने दोन घराला आग लागली यामुळे शेतकरी संजय कोहोक यांच्यासह अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. कोहोक कुटुंब झोपेत आसतांनाच आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. यावेळी बाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्याने मोठेमोठ्याने भुंकायला सुरुवात केली. कुत्र्याचा आवाज ऐकून घरात झोपलेले कोहोक कुटूंब जागे होऊन बाहेर पळाले. यामुळे मोठा अनर्थ टळला. संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-
नागपुरात काळजाचा थरकाप, 12 वीचा पेपर द्यायला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा बसच्या धडकेत जागीच मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील खापा-पारशिवणी मार्गावरील खैरी परिसरात एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये बारावीचा पेपर देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सिलेंडन परतेती असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आपल्या दुचाकीने रामटेक येथील जयसेवा आदिवासी कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्राकडे जात होता. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव स्कूल बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने सिलेंडनचा जागीच अंत झाला. या घटनेमुळे परिसरात आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
-
मुंबई विमानतळावर स्पाइसजेटच्या प्रवाशांचा राडा; ७ तास विमान रखडल्याने प्रवासी संतप्त
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (T-1) वर स्पाइसजेट कंपनीच्या विमानाच्या विलंबावरून आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. मुंबईहून पश्चिम बंगालमधील सिलिगुरीला जाणारे विमान तब्बल सात तास उशिरा असल्याने प्रवाशांचा संयम सुटला. आम्हाला परतावा (रिंफंड) नको, तर तात्काळ विमानाची पर्यायी व्यवस्था करून द्या, अशी मागणी करत प्रवाशांनी विमानतळ प्रतिनिधींसोबत जोरदार बाचाबाची केली. सात तासांच्या प्रतीक्षेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
कोकणात आंबा उत्पादक शेतकरी संकटात; बदलत्या हवामानामुळे फवारणीचे संकट
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या बदलत्या हवामानामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि अचानक वाढलेल्या धुक्यामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे मोहर काळा पडू लागला आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळही झाली आहे. सध्याचे वातावरण थ्रीप्स आणि तुडतुड्यांसारख्या किटकांना पोषक असल्याने, आपला मोहर वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामातील सहावी फवारणी करावी लागत आहे. यामुळे उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
-
एकनाथ शिंदे यांचा सलमान खानला फोन; सलीम खान यांच्या प्रकृतीची केली विचारणा
ज्येष्ठ लेखक सलीम खान यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खान याच्याशी फोनवरून संवाद साधला आणि सलीम खान यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. यावेळी सलमान खानने मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की, सलीम खान यांची प्रकृती स्थिर असून येत्या दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महाविद्यालयांना दणका; पदव्युत्तर प्रवेशावर येणार गदा
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना कडक अल्टिमेटम दिला असून, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ज्या महाविद्यालयांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी नकारात्मक शिफारस मिळाली आहे, त्यांना त्रुटी दूर करण्यासाठी २ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. शिक्षक भरती, प्रयोगशाळा आणि पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांनी या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर न केल्यास, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून त्यांच्या प्रथम वर्ष प्रवेश क्षमतेवर स्थगिती आणली जाईल, असा इशारा विद्यापीठ प्रशासनाने दिला आहे.
-
अकोल्यातून लाल वादळ संगमनेरच्या दिशेने, लाँगमार्चचा आज दुसरा दिवस, सरकारकडून चर्चेचे निमंत्रण
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि कामगार संघटनांच्या लॉंगमार्चचा आज दुसरा दिवस असून, आंदोलकांचा उत्साह कायम आहे. काल राजूरहून निघालेला हा मोर्चा रात्री अकोले येथे मुक्कामी होता, जिथून आता हे ‘लाल वादळ’ संगमनेरच्या दिशेने कूच करणार आहे. कडक ऊन आणि पायपिटीचे आव्हान पेलत आंदोलक अकोले तहसील कार्यालयासमोर जमायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली असून आज दुपारी ४ वाजता मुंबईत पाच मंत्र्यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले आहे. एकीकडे शिष्टमंडळ चर्चेसाठी रवाना होणार असले, तरी दुसरीकडे मागण्या मान्य होईपर्यंत मोर्चाचा प्रवास थांबणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
-
AQI 170 ते 220 पार, ‘स्वच्छ हवा’ मोहिम अंतर्गत हजारो बांधकामांना कामबंद कारवाईनंतरही प्रदूषणात वाढ
दादर चौपाटी धुकटली! AQI 170 ते 220 पार, ‘स्वच्छ हवा’ मोहिम अंतर्गत हजारो बांधकामांना कामबंद कारवाईनंतरही प्रदूषणात वाढ; आरोग्य धोक्यात? मुंबईसह उपनगरांमध्ये प्रदूषणात लक्षणीय वाढ नोंद. दादर चौपाटी परिसरात पहाटेपासून धूळ आणि धुरक्याची चादर. हवामान खात्याच्या अंदाजानुसार AQI 170 ते 220 दरम्यान. हवेत PM2.5 कणांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये आरोग्याची चिंता.तज्ज्ञांच्या मते दमा, हृदयविकार व श्वसनाच्या त्रासाचा धोका वाढू शकतो. हवामानातील बदलांमुळे AQI मध्ये चढ-उतार होणार असल्याची माहिती.
-
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
प्रकृती अस्वस्थामुळे शरद पवार हे गेली चार दिवसापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार घेत आहेत. शरद पवारांची प्रकृती व्यवस्थित असल्याने आज डिस्चार्ज मिळणार….
-
किरणोत्सवाच्या दिवशी वेरूळ लेणी खुली ठेवण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे दरवर्षी मार्च महिन्यात होणारा किरणोत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातून इतिहासप्रेमी आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. वेरूळ लेणी क्रमांक १० मधील भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीवर सूर्यकिरणे अचूक पडण्याचा हा अद्भुत सोहळा यंदा १० मार्च रोजी होणार आहे. मात्र दर मंगळवारी लेणी पर्यटकांसाठी बंद ठेवली जातात आणि यंदा किरणोत्सवाचा मुख्य दिवस मंगळवारीच आल्याने इतिहासप्रेमींची निराशा होण्याची शक्यता आहे.
-
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु आज शेगाव दौऱ्यावर..
आज देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या शेगावच्या दौऱ्यावर आहे . शेगाव येथील श्री संत गजानन महाराज समाधी च्या त्या दर्शन घेणार आहेत.. राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिरात विशेष आरतीही करण्यात येणार आहे.. इतिहासात प्रथमच राष्ट्रपती शेगावात येणार असल्याने भाविकांसह परिसरातील नागरिकांमध्येही उत्साह आहे..
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकामध्ये कर वसुलीत ढिलाई
आयुक्त अभिनव गोयल यांचा कारवाईचा बडगा; हलगर्जीपणा खपवून घेणार नाही इशारा. ५१ कोटी उद्दिष्टापैकी फक्त १६.७३ कोटी वसुली; मोठी तूट उघड. अरविंद काळण आणि राजेंद्र पाटील यांचे निलंबन. कमी वसुलीवर थेट कारवाईचे संकेत; सर्व प्रभागांचा आढावा सुरू
-
मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदार संघात एसीबीची मोठी कारवाई
रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि पती विठ्ठल बेडकुळे लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात. उपसरपंचावर आणलेला अविश्वास ठराव ना मंजूर करण्यासाठी मागितली होती ५० हजारांची लाच. तडजोडीत २५ हजार मान्य करत १५ हजार स्वीकारताना सरपंच पत्नीसह पती अटकेत. नाशिकच्या एसीबीच्या पथकाने दिंडोरी तालुक्यात केलेल्या कारवाईने खळबळ
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. आज या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. अजित पवार यांच्याकडून या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी सुरू होती. मात्र, त्यांच्या अपघाती निधनानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांच्य निधनानंतर शोकप्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. आज अधिवेशनात काही मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाच प्रकरणावरून विरोधक आज गोंधळ घालण्याची शक्यता आहे. यासोबतच अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अहवाल पुढे आला. त्यावरूनही विरोधक काही प्रश्न अधिवेशनात करू शकतात. यासह राज्य, देश-विदेशातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Feb 25,2026 8:09 AM
