Maharashtra Board Exam Date 2023-24 : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर

Maharashtra Board Class 10, 12 Exam Date 2024 | दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात.

Maharashtra Board Exam Date 2023-24 : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर
SSC AND HSC EXAM
Image Credit source: socialmedia
| Updated on: Nov 01, 2023 | 9:47 PM

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या काळात होणार आहे. फेब्रुवारी – मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( 10 वी ) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( 12 वी ) परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या निवेदनात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( 12 वी ) सर्वसाधारण आणि द्विलक्षी अभ्यासक्रम परीक्षा बुधवार दि. 21 फेब्रुवारी 2024 ते मंगळवार दि. 19 मार्च 2024 या काळात होणार आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12 वी ) व्यवसाय अभ्यासक्रम- बुधवार, दि.21 फेब्रुवारी 2024 ते मंगळवार, दि.19 मार्च 2024 या कालावधीत होईल.

माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा ( 12 वी ) – बुधवार, दि. 20 मार्च ते शनिवार, दि. 23 मार्च 2024 या कालावधीमध्ये होईल.

तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( इयत्ता दहावी ) – शुक्रवार, दि. 1 मार्च 2024 ते मंगळवारी, दि. 26 मार्च 2024 या कालावधीमध्ये होणार आहे.

SSC AND HSC EXAM DATE –

SSC AND HSC EXAM

तसेच दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दि.10 फेब्रुवारी 2024 ते गुरुवार, दि. 29 फेब्रुवारी 2024 आणि 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी ते मंगळवार दि. 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.

तसेच दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दि.10 फेब्रुवारी 2024 ते गुरुवार, दि. 29 फेब्रुवारी 2024 आणि 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी ते मंगळवार दि. 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.