Maharashtra Marathi Breaking News Live : 10 वर्षात नरेंद्र मोदींनी किती रोजगार दिला?- राहुल गांधींचा सवाल

Maharashtra Breaking News Live Updates : आज 28 डिसेंबर... आज विविध घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील... राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी... तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Marathi Breaking News Live : 10 वर्षात नरेंद्र मोदींनी किती रोजगार दिला?- राहुल गांधींचा सवाल
| Edited By: | Updated on: Jun 04, 2024 | 7:01 AM

मुंबई | 28 डिसेंबर 2023 : आज काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्त नागपूरमध्ये 40 एकरवर आज काँग्रेसची सभा होणार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे इतरही नेते उपस्थित राहणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यानंतर ते अंतरवली सराटीत जाणार आहेत आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. तसंच येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. याचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तेव्हा दिवसभर आमचा हा ब्लॉग फॉलो करा.