LIVE | महाबळेश्वरमध्ये विहिरीत कोसळला जंगली गवा, क्रेनच्या मदतीशिवाय गवा बाहेर काढणं अशक्य

LIVE NEWS & UPDATES The liveblog has ended. 10 Jan 2021 09:40 PM (IST) वसईच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एक कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली वसईच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर आज पुन्हा एक कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकून पडल्याची घटना घडली होती. मात्र, सतर्क पर्यटकांच्या मदतीमुळे कार तात्काळ बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. आज रविवारचा सुट्टीचा […]

LIVE | महाबळेश्वरमध्ये विहिरीत कोसळला जंगली गवा, क्रेनच्या मदतीशिवाय गवा बाहेर काढणं अशक्य
Breaking news
| Edited By: | Updated on: Apr 15, 2021 | 3:59 PM

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Jan 2021 09:40 PM (IST)

    वसईच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एक कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली

    वसईच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर आज पुन्हा एक कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकून पडल्याची घटना घडली होती. मात्र, सतर्क पर्यटकांच्या मदतीमुळे कार तात्काळ बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने, मुंबई, ठाणे परिसरातील शेकडो पर्यटक वसईच्या राजोडी, विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आपल्या कुटुंबासह पिकनिक बनविण्यासाठी आले होते. वसईच्या राजोडी बीचवर अतिउत्साही पर्यटकांने आपली कार समुद्राच्या पाण्याजवळ काही अंतरावर लावली होती. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अचानक समुद्रात भरती आल्याने कार पाण्यातच फासून बसली होती. पण आजूबाजूच्या पर्यटकांच्या ही बाब लक्षात आल्याने कारला बाहेर काढण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

  • 10 Jan 2021 07:53 PM (IST)

    डोंबिवलीमधील St.Thomas शाळेच्या प्रशासनाला लवकरच दणका, फीमध्ये सवलत मिळालीच पाहिजे

    – डोंबिवलीमधील St.Thomas शाळेच्या प्रशासनाला लवकरच दणका !!!

    – शाळेच्या शेकडो पालकांनी मनसे रस्ते आस्थापना डोंबिवली शहर संघटक ओम लोके यांची घेतली भेट.

    – लवकरच शाळा प्रशासना विरोधात करणार आंदोलन.

    – मनसे पालकांच्या सोबत पुर्ण ताकदीनिशी आंदोलनात उतरणार..

    – फीमध्ये सवलत मिळालीच पाहिजे

  • 10 Jan 2021 07:52 PM (IST)

    महाबळेश्वरमध्ये विहिरीत कोसळला जंगली गवा, क्रेनच्या मदतीशिवाय गवा बाहेर काढणं अशक्य

    सातारा: महाबळेश्वर मध्ये विहिरीत कोसळला जंगली गवा, तब्बल एक टन वजन असलेला गवा पडला विहिरीत, वनविभाग आणि महाबळेश्वर ट्रेकरचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल, क्रेनच्या मदतीशिवाय गवा बाहेर काढणे अशक्य

  • 10 Jan 2021 06:42 PM (IST)

    मुबंई-पुणे एक्सप्रेसवर दोन ट्रकचा अपघात, दोन गंभीर जखमी तर एक अन्य एक किरकोळ जखमी

    – मुबंई पुणे एक्सप्रेसवर दोन ट्रकचा अपघात, दोन गंभीर जखमी तर एक अन्य एक किरकोळ जखमी

    – बोरघाट उतरताना मुबंई कडे जाणा-या लेनवर पुढे मागे जाणा-या ट्रक एकमेकांवर आदळुन झाला अपघात.

    – डेल्टा फोर्स, देवदुत, महामार्ग वाहतुक पोलीस, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टिम ने ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढले

  • 10 Jan 2021 05:54 PM (IST)

    निवडणुकीमध्ये उभे असणाऱ्या उमेदवारांची उद्यापासून होणार कोरोना चाचणी

    वाशिम : कारंजा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभे असणाऱ्या उमेदवारांची उद्यापासून होणार कोरोना टेस्ट चाचणी

  • 10 Jan 2021 04:46 PM (IST)

    वाशीत मनसे आणि आपच्या कार्यकर्त्यांची गर्दी, एकाचवेळी जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटन

    वाशीत मनसे आणि आपच्या कार्यकर्त्यांची गर्दी, एकाचवेळी मनसे आणि आपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटन,  निवडणुकीच्या तोंडावर सर्वपक्षीय जनसंपर्क कार्यालय उद्धाटनाचा सपाटा, मनसेसह आम आदमी पार्टीसुद्धा निवडणूकीच्या रिंगणात

     

  • 10 Jan 2021 12:46 PM (IST)

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेवर निर्बंध, पन्नास लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्याचे आदेश

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेवर निर्बंध, केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्याचे प्रशासनाचे आदेश, नंदीध्वज मिरवणूक, शोभेचे दारुकाम इत्यादी विधींची परवानगी नाकारली, तर यात्रा काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी मंदिर परिसर राहणार बंद, 12 ते 16 जानेवारीच्या दरम्यान होणार आहे श्री सीदेश्वर यात्रा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

  • 10 Jan 2021 11:23 AM (IST)

    फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

    मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांनी दिल्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.

  • 10 Jan 2021 09:51 AM (IST)

    अमरावतीच्या बडनेऱ्यात 28 कोंबड्या दगावल्या, बर्ड फ्लूची भीती

    अमरावतीच्या बडनेऱ्यात 28 कोंबड्या दगावल्या, बर्ड फ्लूची भीती, अहवालाअंती होणार कारण स्पष्ट, वस्तीतील दत्तवाडी परिसरात राहणारे उमेश गुळरांधे, नलिनी फेंडर, गजानन कडव, अजय चोरआमले यांच्याकडील एकूण 28 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या, या सर्व कोंबड्यांना पांढरी शौच झाल्याचे त्यांचे म्हणणे, अचानक जमिनीवर कोसळून त्या कोंबड्या गतप्राण झाल्या, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश निमकर, बाळू ठवकर यांनी बडनेऱ्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याला याची माहिती दिली

  • 10 Jan 2021 08:54 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची आत्महत्या

    नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने केली आत्महत्या, गजानन धांडे असे आत्महत्या करणाऱ्या उमेदवारांचे नाव, लिहिगाव येथील घटना, महालगाव ग्रामपंचायत ची लढत होते ते निवडणूक, आत्महत्या कारण अद्याप स्पष्ट नाही, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद

  • 10 Jan 2021 08:03 AM (IST)

    नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, 68 लाख रुपयांची सुपारी आणि सुगंधी तंबाखू जप्त

    नागपूर गुन्हेशाखा युनिट 3 ची मोठी कारवाई, लकडगंज परिसरातील फ्री ओक्टरॉय झोनमध्ये छापा घालून केली 68 लाख रुपये किमतीची सुपारी आणि सुगंधी तंबाखू जप्त, नागपुरात गुटखासाठी वापरण्यात येणाऱ्या सुपारीचा मोठा काळाबाजार होतो, याआधी सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई

  • 10 Jan 2021 07:40 AM (IST)

    भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाची धावपळ

    भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाची उडाली धावपळ, नाशिक जिल्हा रुग्णालय, मालेगाव रुग्णालयासह जिल्ह्यातील 18 ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांचे दोन वर्षांपासून फायर ऑडिटच झालं नसल्याची धक्कादायक माहिती उघड, संपूर्ण जिल्ह्यात दोनच फायर ऑफिसर असल्यामुळे वेळेवर फायर ऑडिट होत नसल्याची बांधकाम विभागाची माहिती, त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासनाचा ही भोंगळ कारभार चव्हाट्यावर

  • 10 Jan 2021 07:31 AM (IST)

    नाशिकमध्ये मांजामुळे जीवघेण्या घटना घडूनही मांजाची छुप्या पद्धतीने शहरात सर्रास विक्री

    नाशिकमध्ये मांजामुळे जीवघेण्या घटना घडूनही मांजाची छुप्या पद्धतीने शहरात सर्रास विक्री, कारमध्ये मांजा विक्री करणाऱ्या 3 जणांना क्राईम युनिट 1 ने ठोकल्या बेड्या, 40 हजार रुपयांचा मांजा कार मधून केला जप्त, मांजा विक्री कराल तुमची गै नाही शहर पोलिसांचा सज्जड दम

  • 10 Jan 2021 07:30 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 273 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह

    नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 273 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह, तर 216 रुग्णांनी कोरोनावर केली मात, 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू, जिल्ह्यातील मृत्यूचा एकूण आकडा गेला 2,010 वर

  • 10 Jan 2021 07:30 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठं नुकसान

    नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठं नुकसान, द्राक्ष,कांदा पिकांना जोरदार फटका, सततच्या बदलत्या वातावरणामुळे बळीराजा हैराण, वातावरण असच राहिल्यास द्राक्ष एक्स्पोर्टवर ही होणार परिणाम

  • 10 Jan 2021 06:48 AM (IST)

    मनमाडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस, कांद्यासह, द्राक्ष बागांना फटका

    मनमाडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाचा कांद्यासह, द्राक्ष बागांना फटका, चांदवड तालुक्यातील अनेक द्राक्ष बागा उध्वस्त, तर उन्हाळ कांद्यावर करपा , बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढणार, बळीराजा पुन्हा एकदा सापडला अडचणी

  • 10 Jan 2021 06:44 AM (IST)

    मराठा क्रांती मोर्चाचा पुन्हा एल्गार, मराठा क्रांती मोर्चाची आज आझाद मैदानावर सभा

    मराठा क्रांती मोर्चाचा आज पुन्हा एल्गार मराठा क्रांती मोर्चाची आज आझाद मैदानावर सभा होणार आहे, या सभेला राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत

  • 10 Jan 2021 06:43 AM (IST)

    कोकणासह अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात, बळीराजा चिंतेत

    कोकणासह अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात, बळीराजा चिंतेतसिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु, पुढचे दोन दिवसही पावसाळी वातावरण, बंगालचा उपसागर आणि देशाच्या दक्षिणेकडे श्रीलंकेच्या बाजूने सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले

  • 10 Jan 2021 06:42 AM (IST)

    20 जानेवारीपर्यंत 50 टक्के उपस्थितीत महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार – उदय सामंत

    20 जानेवारीपर्यंत 50 टक्के उपस्थितीत महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

  • 10 Jan 2021 06:41 AM (IST)

    16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण

    16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण, पहिल्या टप्प्यात राज्यात 8 लाख, तर देशात 3 कोटी लोकांना मिळणार लस

  • 10 Jan 2021 06:39 AM (IST)

    ठाण्यात आग विझवताना गॅस सिलेंडरचा स्फोट, 3 जवान, 4 नागरिक जखमी

    ठाण्यात काल रात्री 11.30 च्या सुमारास राम नगर रोड नंबर 28 वागळे इस्टेट ठाणे येथे एका रिक्षाच्या स्पेयर पार्टच्या दुकानाला अचानक आग, आग विझवत असताना घरगुती गॅस सिलेंडरचा अचानक जबरदस्त स्फोट होऊन अग्निशमन दलाचे 3 जवान आणि परिसरातील ते 4 लोक जखमी,