
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
नाशिक : मी आत्महत्या करतोय, माझी शूटिंग काढा, असे सांगत एकाने नाशिकरोडच्या दारणा नदीच्या पुलावरून घेतली उडी, उडी घेण्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद, युवकावर बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू, काल दुपारची घटना
– एनआयएने अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी संतोष शेलारचा प्रख्यात लखन भैय्या एन्काऊंटर केस प्रकरणाशी संबंध असल्याची सूत्रांकडून माहीती
– याप्रकरणी धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता
– लखन भैय्या केसमधील मुख्य साक्षीदार अनिल भेडा याची साल 2011 साली हत्या केल्याची कबूली, आरोपीने एनआयएला कबूली दिल्याची सुत्रांची माहीती
– आरोपीने हे कृत्य एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून केल्याचीही सुत्रांची माहीती
– एनआयए काही दिवसात या माजी पोलीस कर्मचाऱ्याला पून्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता, आमने सामने चौकशी करणार एनआय,
– या प्रकरणाचे धागेदोरे दूरवर जाण्याची दाट शक्यता
– बड्या माशांची नावे या प्रकरणात गूंतल्याची प्राथमिक माहीती
सांगली :
शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे सापडले “एट्याकस एॅटलास मोथ” दुर्मिळ फुलपाखरू. जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेली आशिया खंडातील जंगलात आढळणारी प्रजाती
जळगाव : शहरासह जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे हातगाडीधारक, रस्त्यावरील विक्रेत्यांची त्रेधातिरपीट उडाली. शहरात जलधारा चांगल्याच बरसल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना पाण्यातून वाट काढावी लागली. जिल्ह्यातील बहुसंख्य भागात पाऊस पडला. त्यामुळे आता खरिपाच्या पेरणीला वेग येणार आहे.
“आपल्याच राज्यातले मंत्री सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत असतील तर घटनात्मक तरतुदी बघाव्या लागतील”, मंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात उतरण्याच्या निर्णयावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया,
सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याच्या वेळी महाविकास आघाडी राजकारण करत राहिल्याचा लगावला टोला
याच मुद्द्यावर मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता रस्त्यावर आंदोलन कशासाठी?
सर्वांचे या मुद्यावर एकमत असताना सर्वोच्च न्यायालयात यासाठी वकिलांची फौज उभी करण्याबाबत व्यक्त केले मत,
विरोधी पक्षांनी याबाबत आंदोलन केले तर समजण्यासारखे मात्र मंत्री म्हणून आंदोलन कसे करता येईल? असा विचारला सवाल,
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दर वेळेस हा विषय चर्चेला घेण्याची केली सूचना
गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहत आहेत. सध्या पाऊस नाही परंतु वादळामुळे वातावरण बदललेले आहे. ढगाळ वातावरण आणि त्यात वादळ सुरू झाल्याने रस्त्यावर शुकशुकाट. एकही नागरिक बाहेर नाही.
पुणे :
जयंत पाटील ;
* सोलापूर जिल्हातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांना भेटण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती.
* दत्तात्रय भरणे हेच सोलापुरचे पालकमंत्री कायम राहतील. त्यांना बदलण्याची मागणी झालेली नाही.
* नाना पटोले यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे.
* मराठा आरक्षणाचा प्रश्न आता संसदेत पोहचला आहे.
खताचा दरावरून राज्यातले काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांसह काही शिष्टमंडळ दिल्लीत भेटणार
खत दर वाढीवरून केंद्रातल्या अधिकाऱ्यांच्या घेणार गाठीभेटी
कोल्हापूर :
कोल्हापुरातील उद्याच्या मराठा मूक आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सहभागी होणार
काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी घेतली होती प्रकाश आंबेडकर यांची भेट
प्रकाश आंबेडकर उद्या आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याची माहिती
ठाणे :
दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे
हवेत गारवा असून ढगाळ वातावरण झाले आहे..
सद्या तरी कुठेही पाणी साचले नाही मात्र 2 ते 3 ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली आहे
सिंधुदुर्ग :
काही वेळाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरूवात. थांबून-थांबून पावसाच्या मोठ-मोठ्या सरी. तर काही भागातील वीज पुरवठाही खंडीत. जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी.
सोलापुर :
समान निधी वाटपावरून महासभेत नगरसेवकांचा गोंधळ
सत्ताधारी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
सत्ताधारी भाजपच्या विरोधात विरोधक एकवटले
काँग्रेस,राष्ट्रवादी, बसपा आणि शिवसेनेचे नगरसेवकांचा मोठा गोंधळ
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ
राज्यात प्राध्यापक भरती लवकरच तर तासिका प्राध्यापकांचे मानधनही वाढविणारः उदय सामंत यांची माहीती
संभाजी राजेंना मोदींने भेटण्यासाठी वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अपमानः उदय सामंत
प्रोफेशनल कोर्सेसची सीईटी जुलै महिण्यातःउदय सामंत यांची माहीती
– पाकिस्तानचा कांदा भारतीय कांद्याला टक्कर देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल ?
– मात्र कोरोनामुळे अनेक देशात लॉकडाऊन असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याची मागणी नाही
– दरवर्षी 37 हजार कंटेनरद्वारे कांद्याची निर्यात
– यंदा 12 हजार कंटेनरद्वारे कांद्याची निर्यात झाल्याने 70 टक्के निर्यात घट
– श्रीलंकेत भारतीय कांदा 450 डॉलर प्रति टन दर तर पाकिस्तानी कांदा 310 डॉलर इतक्या प्रति टन कमी दराने होतो उपलब्ध
– देशांतर्गत कांद्याची मागणी असल्याने कांद्याच्या बाजारभावात कुठलाही परिणाम होणार नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता गरजेपुरता कांदा विक्री करण्याचे केले आहवान – जयदत्त होळकर
जळगाव – बहुजन मुक्ती मोर्चा तर्फे महागाई विरोधात धक्का मारो आंदोलन
दुचाकी, रिक्षा आणि महागाईचा बकासुर तयार करत केला दरवाढीचा निषेध
महागाई कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची केली मागणी
नाशिक – मराठा समाजानंतर आता ओबीसी देखील आक्रमक
ओबीसींचं राजकीय आरक्षण काढल्यानंतर जिल्ह्यातील पहिली बैठक सुरू
नाशिकच्या भुजबळ फार्म वर ओबीसी समाजाची मिटिंग सुरू
बैठकीला समता परिषदेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित
राजकीय आरक्षण रद्द च्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्याचा बैठकी निर्णय
दादा भुसे-
राज्यात पावसाचा लपंडाव सुरू आहे…
शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई करू नये..
80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाला तर लागवड करायला हरकत नाही…
राज्यात 17 जून नंतर मान्सून पाऊस सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे…
आधी लागवड झाली पावसात खंड पडला तर नुकसान होऊ शकते..
सोयाबीय पीक शेतकऱ्यांच्याकडे होते तेच बियाणे वापरात अधिक आणले जात आहे…
नवीन नांवाची बियाणे राज्यात दाखल झाली आहेत..
या बियाणांची गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत….
पिक विमा योजना अतर्गत मदत वाटपाचा कार्यकम त्वरित अमलबजावणी होत आहे…
पालघर
विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळ पासून पालघर ग्रामीण भागात मुसळधार पावसाळा सुरुवात झाल्यामुळे खरेदी करण्यासाठी व बँकेत आलेल्या आदिवासींची अक्षरशा तारांबळ उडाली
– नागपूरसह संपूर्ण विदर्भात आशा वर्कर्स आजपासून बेमुदत संपावर
– ‘कोरोनात जीव धोक्यात घालून काम केलं तरीही हत्तीसाठी संघर्षाची वेळ’
– कोरोना काळात रोज 300 रुपये मानधन मिळावं
– आशा, गट प्रवतर्क महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात बेड राखीव असावेत
– सॅनिटायझर, मास्क यांसह सुरक्षेचे साधनं मिळावीत, या मागण्यांसाठी संप
– नागपूरातील संविधान चौकात आशा वर्कर्सचं आंदोलन सुरु
– सरकार विरोधात आशा वर्कर्सची घोषणाबाजी
पुणे –
– शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक,
– बैठकीला अजित पवारही उपस्थित राहणार,
– हर्षवर्धन पाटील बैठकीला पोहचलेत
अहमदनगर
श्रीगोंद्यात तोतया पोलिसाला पकडण्यात पोलिसांना यश
अबालू जाफर इराणी अस पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव
आरोपी पोलिस असल्याची बतावणी करून रस्तालूट करत होता
अखेर या सराईत आरोपीला श्रीगोंदे पोलिसांनी शिरूर पोलिसांच्या मदतीने शिताफीने केली अटक
या आरोपीवर यापूर्वी राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत सतरा गुन्हे दाखल
या आरोपिकडून 58 हजारांचा ऐवज हस्तगत
पिंपरी चिंचवड
-पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी गाव गुंडाची काढली धिंड
-वाकड परिसरामध्ये चारचाकी वाहनाची तोडफोड करणाऱ्या गाव गुंडाची पोलिसांनी धिंड काढली आहे
-दोन-तीन दिवसांपूर्वी वाकड परिसरातील म्हातोबा नगर झोपडपट्टी समोर गाव गुंडाच्या टोळक्यानी पंधरा माल वाहक ऑटो रिक्षाची तोडफोड केली होती
-वाकड परिसरातील नागरिकांत मोठं दहशतीच वातावरण निर्माण झालं होतं
-या धिंड संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता ह्या आरोपींना गुन्ह्याच्या घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेलो होते असे सांगण्यात आले
सांगली –
जिल्ह्यात बेकायदा सावकारी विरोधात जिल्हा पोलिस प्रमुख याची धडक मोहीम
सावकारीच्या त्रासाला बळी पडलेल्या व्यक्ती नि पुढे येवून पोलिसात तक्रार दाखल करावी
कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे
याचा गैरफायदा काही सावकार घेत आहेत
त्यामुळे च ही विशेस धडक मोहीम राबविण्यात येत आहे
बुलडाणा
जिल्ह्यात काही भागात पेरणीला सुरुवात, तर काही भागात दमदार पावसाची प्रतीक्षा, मात्र बियाण्यांच्या तुटवड्यामुळे कृषी केंद्राकडून शेतकरी वर्गाची लूट, तर बियाण्यांचे दर भिडले गगनाला, कृषी विभागाचे डोळेझाक, अगोदरच डिझेल चे दर वाढल्याने आणि पेरणीची सुरुवात ही महागाई ने झालीय,
– निफाड एज्युकेशन संस्थेचे कामकाज ठप्प
– कोरोनामुळे मासिक सभा नाही
– अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या निधनाने अध्यक्षांच्या अधिकारावरून विद्यमान कार्यकारिणीत शहा-काटशह
सिंधुदुर्ग –
जिल्ह्यात पावसाची विश्रांती
सलग दोन दिवस संततधार पाऊस कोसळल्या नंतर राञी पासुन पावसाची विश्रांती.
माञ सर्वञ ढगाळ वातावरण.
कोल्हापूर
मराठा आरक्षणासाठी दुसऱ्या टप्प्यातील मूक आंदोलना ची सुरुवात उद्या कोल्हापुरातून होणार
खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली शाहू समाधी स्थळापासून होणार मूक आंदोलनाला सुरवात
शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात
समाधी स्थळाचा परिसर भगवामय
सांगली –
दुचाकी मोटारसायकलच्या चोऱ्या करणाऱ्यास अटक; 4 लाख 50 हजारचा मुढेमाल जप्त, जत पोलिसांची कारवाइ
भिवंडी –
भिवंडी पालिका क्षेत्रातील मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळलेला रिंगरोड एमएमआरडीए बनविणार ,पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बैठकीत निर्णय
पालिका नालेसफाई वरून महापौर व आयुक्त यांच्यात वाद.पाच पैकी दोन प्रभागातील नालेसफाई रोजंदारी मजुरां कडून करून घेण्यास लोकप्रतिनिधींचा होता विरोध
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पारीवली कवाड सोनटक्के रस्ता नादुरुस्त बनविल्याची ग्रामस्थांची तक्रार.
ओबीसी आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचा एल्गार,
आज पंढरपूरात ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणासाठी घेणार बहूजन समाजाची घोंगडी बैठक,
दिवसभरात पंढरपूर शहरात 18 ठिकाणी बैठकीचं आयोजन,
नामदेव पायरीचं दर्शन घेऊन करणाळ बैठकीला सुरुवात,
ओबीसी आरक्षणासाठी पडळकरांचा एल्गार,
ओबीसींच राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर पडळकरांकडून आक्रमक भूमिका,
बहूजन समाजाची मोट बांधून उभारणार सरकारविरोधात मोठा लढा,
पंढरपूरात आज पडळकरांकडून कार्यक्रमाचं आयोजन , पडळकर ओबीसी आरक्षणावर काय भूमिका घेणार ? याकडे सगळ्यांच लक्ष…
पिंपरी चिंचवड
-नाशिक फाटा पुलाखाली आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह
-सांगवी पोलीस ठाण्याच्या ह्या महिलेचा मृतदेह आढळला
-मृतदेह आढळलेल्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. सांगवी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल
-मयत महिलेचा रंग गोरा, केस काळे, मध्यमवयीन असलेल्या महिलेने काळ्या रंगाचा स्वेटर घातलेला आहे. या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास सांगवी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नाशिक – जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ
जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी 24 टक्के जलसाठा उपलब्ध
पावसाने ओढ दिल्यास पाणी संकट ओढवण्याची शक्यता
गंगापूर धरणात 40 टक्के पाणी साठा
तर गंगापुर धरण समूहात 29 टक्के पाणी साठा
पाऊस लांबल्यास जलसाठा आणखी कमी होण्याची शक्यता
ऐरोली गोळीबाराचे सीसीटीवी फुटेज tv 9 च्या हाती
निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांना आपल्या पोटच्या मुलावरच झाडल्या गोळ्या
मोठा मुलगा विजय पाटील गोळीबारात झाला होता गंभीर जखमी
प्रकृती चिंताजनक असल्याने इंद्रावती रुग्णालयात केले होते दाखल
उपचारादरम्यान विजयचा झाला मृत्यू
अटक केलेल्या बापाने रबाळे पोलीस स्थानकात गुन्हा केला मान्य
नाशिक – शहरात 2000 बोगस फेरीवाले
महापालिकेच्या सर्वेक्षणात धक्कादायक प्रकार उघड
नोंदणी झालेल्या 9620 पैकी 1920 फेरीवाले बोगस
केंद्र शासनाच्या फेरीवाला धोरणानुसार प्रक्रिया सुरू असताना प्रकार उघड
शहरात 225 फेरीवाला झोन असून भविष्यात आणखी 83 झोन चा प्रस्ताव
नाशिकरोडला सर्वाधिक फेरीवाले असल्याचे सर्वेक्षणात उघड
नागपूर च्या ‘मिहान’मध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबई येथे उद्योग संमेलनाचे होणार आयोजन
अडवनटेज विदर्भ नावाने होणार आयोजन
अभ्यासगटांच्या माध्यमातून मिहानच्या अडचणी दूर करा
133 केव्ही केंद्र पर्यायी जागेत सुरू करण्याचे आदेश
मिहानमध्ये सहभागी सर्व उद्योजकांशी लवकरच चर्चा करणार
मिहानचा दर पंधरा दिवसांनी आढावा घेणार
मिहान संदर्भात झालेल्या बैठकीत झाला निर्णय
पालक मंत्री नितीन राऊत यांनी घेतला निर्णय
विरार – काल दिवसभराच्या उघाडीनंतर आज सकाळी विरारमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात
उघडझाप करीत पडत आहे रिमझिम पाऊस
सकाळी सात नंतर पावसाला सुरवात झाली आहे
चिपळूण – गोवा बनावटीची दीड कोटीची दारू कुंभार्ली घाटात पकडली
मध्यरात्री चिपळूण – कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात केली ही मोठी कारवाई
ट्रकमधून गोवा ते नाशिकला घेऊन जात होते विनापरवाना दारू
राज्य उत्पादन शुल्कच्या मुबई भरारी पथकाची सर्वात मोठी कारवाई
ट्रक व युटिलिटीसह दीड कोटींचा माल केला जप्त. कारवाई सुरू
कोल्हापूर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहा जणांवर गुन्हे दाखल
सकल मराठा समाजाचे सचिन तोडकर, दिलीप पाटील यांचा समावेश
शहरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाला गुन्हा दाखल
राज्यातील 2185 निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा केला होता प्रयत्न
आंदोलनावेळी पोलिस आणि आंदोलकां मध्ये झाली होती जोरदार झटापट
नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असताना महागाईच्या भडक्याचे मोठे आव्हान अर्थव्यवस्थेपुढे उभे राहिले आहे. मे महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले
पुणे: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यासह पिंपरी-चिंचवडसह सोलापुर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २ हजार ९०८ घरांची सोडत काढण्यात आली. कोरोनाचे गंभीर संकट असताना देखील म्हाडाच्या घरांना सर्व स्तरातील लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, तीन हजार घरांसाठी तब्बल ५७ हजार लोकांनी अर्ज केला आहे
कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली असून गेल्या २४ तासांत नवे ११८४ रुग्ण नोंदविण्यात आले असून त्यापेक्षा जास्त १५६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य सूचनेनुसार कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आज मंगळवारपासून पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.
वसई : पावसाळ्यात शहरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, पाण्याचा निचरा व्हावा तसेच उघडय़ा गटारात पडून दुर्घटना घडू नये, यासाठी वसई-विरार महापालिकेने यंदा विशेष योजना तयार केली आहे. त्याअंतर्गत बंदीस्त गटारांवरील उघडय़ा चेंबरवर पाच हजार झाकणे, नालासोपारा पूर्वेला ४२ कोटींचा नाला बांधणे आदींचा समावेश आहे