Maharashtra News Live Update : पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्याकडून महागाईची दहीहंडी

| Updated on: Aug 19, 2022 | 9:43 AM

Maharashtra News Live Upब्रह्मपुरीच्या जंगलात हल्लेखोर ठरलेल्या नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यशdate : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्याकडून महागाईची दहीहंडी
Big breakingImage Credit source: tv9

मुंबई : आज गुरूवार 18 ऑगस्ट 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. ब्रह्मपुरीच्या जंगलात हल्लेखोर ठरलेल्या नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. टी-103 असे या नर वाघाचे आहे नाव, जून महिन्यापासून या वाघाच्या हल्ल्यात या भागात तीन मोठ्या हल्ल्यात ग्रामस्थांचा झाला होता मृत्यू,खरीप पिकांच्या पेरणी व देखभालीसाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना वाघाने केले होते लक्ष्य, त्यामुळेच नागरिकांमधील संताप लक्षात घेता मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी या वाघाला पिंजराबंद करण्याचे दिले होते आदेश. आज सकाळी ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील जंगलातल्या भगवानपुर येथील कक्ष क्रमांक 890 मध्ये फिरताना वाघ आढळून आला. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे व सशस्त्र पोलीस कर्मचारी अजय मराठे यांनी नेमका डार्ट मारून अडीच वर्षाच्या नर वाघाला बेशुद्धा केले. या वाघाची वैद्यकीय तपासणी करून चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रुषा केंद्रात हलविले जाणार आहे. वाघ जेरबंद झाल्यानंतर ब्रह्मपुरी शहरालगतच्या शेतशिवारात नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Aug 2022 07:15 PM (IST)

    बदलीची भीती दाखवत येरवडा कारागृहातील एका महिला पोलिसाची आर्थिक फसवणूक

    बदलीची भीती दाखवत येरवडा कारागृहातील एका महिला पोलिसाची आर्थिक फसवणूक

    एडीजी ऑफिसमधील क्लार्क असल्याचं सांगत अज्ञात व्यक्तीनं १०,००० रुपये या महिला पोलिसाकडून उकळले

    याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

  • 18 Aug 2022 05:41 PM (IST)

    बोरिवली पूर्वेत आमदार प्रकाश सुर्वे यांच्या बाजूने दहीहंडीची जोरदार तयारी सुरू

    बोरिवली पूर्वेत आमदार प्रकाश सुर्वे यांच्या बाजूने दहीहंडीची जोरदार तयारी सुरू झाली.

    मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे गेल्या १५ वर्षांपासून बोरिवली पूर्व देवी पाडा मध्ये दरवर्षी मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करतात.

    यंदाही दहीहंडी उत्सवाचे जोरदार आयोजन करण्यात आले असून त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत नायक-नायिका येणार आहेत.

    या कार्यक्रमात यावेळी अंध गोपाल देखील हंडी फोडण्यात सहभागी होणार असल्याचे ज्युनियर मिस्टर इंडिया राज प्रकाश सुर्वे यांनी सांगितले.

    यावेळी आम्ही केवळ दहीहंडी साजरी करणार नसून गरीब आदिवासी मुलांना दर महिन्याला अन्नदान करण्याची शपथ घेणार आहोत.

  • 18 Aug 2022 05:40 PM (IST)

    अमरावती शहरात पडले जीवघेणे खड्डे

    अमरावती शहरात पडले जीवघेणे खड्डे.खड्डा विरोधात शिवसेना-युवासेना आक्रमक

    अमरावती महानगर महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या दालना समोर शिवसेनेने बसवला गणपती.

    31 ऑगस्ट पूर्वी शहरातील खड्डे बुजवा

    शिवसेनेचे राहुल माटोडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन.

  • 18 Aug 2022 05:25 PM (IST)

    शिखर धवन-शुभमन गिलची संयमी फलंदाजी

    शिखर धवन आणि शुभमन गिल दोघेही संयमाने फलंदाजी करत आहेत. 13 षटकानंतर भारताच्या बिनबाद 64 धावा झाल्या आहेत. शिखर धवन 32 आणि शुभमन गिल 17 धावांवर खेळतोय.

  • 18 Aug 2022 05:13 PM (IST)

    शिर्डी लोकसभेत पुन्हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले लढण्यास इच्छुक

    शिर्डी लोकसभेत पुन्हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले लढण्यास इच्छुक

    शिर्डीच्या जागेवरून एकदा मी हरलो तर मी पुन्हा इच्छुक आहे कारण मी लोकसभेचा माणूस आहे

    पुन्हा माझा विचार झाला तर शिर्डीत नव्हे तर नगर जिल्ह्याच्या विकासासाठी माझ्या मंत्री पदाचा उपयोग करता येईल

    मला अनेक लोकांचे फोन येतात त्यावेळेला आमची चूक झाली, तर आता माझे प्रामाणिक इच्छा आहे मला संधी मिळाली तर मी त्याचा सोना करेल

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि देवेंद्र फडणवीस माझा विचार केला तर नक्कीच मी विचार करेल

    लढायचं असेल तर शिर्डीतूनच लढायचं आहे पडायचं नाही

    त्यावेळी नगरची जागा बाळासाहेब विखे यांना दिली असती तर तीही आणि माझी जागा निवडून आली असते

    बाळासाहेब विखे यांची इच्छा होती मी शिर्डीतून लढावी जेणेकरून त्यांना नगरची मिळेल पण राष्ट्रवादीने नकार दिला त्यामुळे माझ्या जागेला पाठिंबा मिळाला नाही

  • 18 Aug 2022 05:05 PM (IST)

    पंतप्रधानांच्या सुरक्षित पहिल्यांदाच देशी श्वान

    पंतप्रधानांच्या सुरक्षित पहिल्यांदाच देशी श्वान

    सुरक्षेत पहिल्यांदाच देशी श्वानाचा समावेश

    कर्नाटकातील मुधोल हाउंड श्वान आता पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यात दिसणार

    पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) च्या पथकात या शिकारी श्वानाचा समावेश होणार

  • 18 Aug 2022 05:05 PM (IST)

    शिर्डी लोकसभेत पुन्हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले लढण्यास इच्छुक

    शिर्डी लोकसभेत पुन्हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले लढण्यास इच्छुक

    शिर्डीच्या जागेवरून एकदा मी हरलो तर मी पुन्हा इच्छुक आहे कारण मी लोकसभेचा माणूस आहे

    पुन्हा माझा विचार झाला तर शिर्डीत नव्हे तर नगर जिल्ह्याच्या विकासासाठी माझ्या मंत्री पदाचा उपयोग करता येईल

    मला अनेक लोकांचे फोन येतात त्यावेळेला आमची चूक झाली, तर आता माझे प्रामाणिक इच्छा आहे मला संधी मिळाली तर मी त्याचा सोना करेल

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि देवेंद्र फडणवीस माझा विचार केला तर नक्कीच मी विचार करेल

    लढायचं असेल तर शिर्डीतूनच लढायचं आहे पडायचं नाही

    त्यावेळी नगरची जागा बाळासाहेब विखे यांना दिली असती तर तीही आणि माझी जागा निवडून आली असते

    बाळासाहेब विखे यांची इच्छा होती मी शिर्डीतून लढावी जेणेकरून त्यांना नगरची मिळेल पण राष्ट्रवादीने नकार दिला त्यामुळे माझ्या जागेला पाठिंबा मिळाला नाही

  • 18 Aug 2022 04:55 PM (IST)

    महापालिकेची आजची महासभा विविध विषयाने ठरत आहे वादळी

    महापालिकेची आजची महासभा विविध विषयाने ठरत आहे वादळी

    आज सुरू असलेल्या महासभेत भाजप नगरसेवक शेखर इनामदार आणि मनपा नगर सचिव चंद्रकांत आडके यांच्यात जोरदार वादावादी सुरू

    महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्या आदेशाचे पालन करीत नगरसेविकांना कोणतीही माहिती दिली नाही तरी आडके यांनी महिला कर्मचारी यांना जाब विचारल्याचा आणि महिलांचा अपमान केल्याचा आरोप ठेवीत भाजपाच्या नगरसेविका संगीता खोत,स्वाती शिंदे,भारती दगडे सह सर्व महिला नगरसेवकांनी नगरसचिव चंद्रकांत आडके यांना जाब विचारत घेराव घातला

    नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही नगरसेवकाला माहिती देऊ नये असा आदेश आडके यांनी काढल्याने भाजपाच्या महिला नगरसेविका संतप्त झाल्या

  • 18 Aug 2022 04:52 PM (IST)

    नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा आणि नाशिकच्या पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाची संयुक्त कारवाई

    - नवापूर शहरालगत असलेल्या मानस हॉटेल च्या बाजूला असलेल्या शेडमध्ये असलेल्या जुगारीच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड

    - नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा आणि नाशिकच्या पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाची संयुक्त कारवाई

    - कारवाईत सात लाख 23 हजारांची रोकड जप्त

    - तर जुगार खेळणारे पन्नास पुरुष ,चार महिला आणि त्या ठिकाणी काम करणारे नऊ ते दहा जण ताब्यात

    - पोलिसांच्या कारवाईने सीमा वरती भागातील जुगारीच्या अड्ड्यांचे धाबे दणाणले

  • 18 Aug 2022 04:28 PM (IST)

    पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्याकडून महागाईची दहीहंडी

    पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं महागाईची दहीहंडी

    राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्या बाहेर फोडण्यात येणार महागाईची दहीहंडी

  • 18 Aug 2022 04:05 PM (IST)

    भरकटलेल्या बोटीची चौकशी सुरु

    - हरिहरेश्वर च्या परिसरात भरकटलेली बोट सापडली घातक शस्त्र यात आहे माझं पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणे झाले पोलीस घटनास्थळी पोचले आहे सागरी किनाऱ्या च्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

    93 साल मध्ये बॉम्बस्पॉट झाले तेव्हा शस्त्र सापडले 26 11 ला सागरी मार्ग वापरला ,Ats नावाची यंत्रणा या बाबतीत काम करायला आहे राज्य सरकार ने या घटनेचा सखोल तपास करावा,

    सागरी सुरक्षा संदर्भात केंद्र सरकार राज्य सरकार चे नियम असताना सुद्धा अवैध पध्दतीने अशी एक बोट घातक शस्त्र सह कशी आली यंत्रणेच्या लॅपसेस आहेत का तपास केला जावा सत्य बाहेर आले पाहिजे

    - मी केंद्रीय गृहमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शी बोलले सम्पर्क करतोय अदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांनी हा प्रश्न सभागृहात विचारला असेलच - माझी नागरिकांना आवाहन आहे की। कोणत्याही अफवा वर विश्वास न ठेवता सामोरे जाऊ या

    - उद्या गोकुळाष्टमी आहे श्रीवरधन भागात पारंपरिक दहीहंडी साजरी होते लोकांनी आनंदी कुठलीही भीती न बाळगता काळजीपूर्वक सण साजरा करावा

  • 18 Aug 2022 03:59 PM (IST)

    अग्नीवीर सैन्य भरती दरम्यान एका तरुणाचा मृत्यू

    अग्नीवीर सैन्य भरती दरम्यान एका तरुणाचा मृत्यू

    1600 मीटर रनिंग करताना चक्कर येऊन पडलेल्या तरुणाचा मृत्यू

    रनिंग दरम्यान चक्कर येऊन पडल्यामुळे घाटी रुग्णालयात केले होते दाखल

    उपचार सुरू असताना तरुणाचा झाला मृत्यू

    कारण पवार असं मृत्यू झालेल्या 20 वर्षीय तरुणाचे नाव

    कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी गावातील तरुण आला होता भरतीसाठी

  • 18 Aug 2022 03:58 PM (IST)

    रायगडचे हरिहरेश्वर येथील बोटीवर आढळली शस्त्रं,

    रायगडचे हरिहरेश्वर येथील बोटीवर शस्त्र सापडल्यानंतर, आता मुंबईत मध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे, मुंबईतील रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे,

    बोरीवली वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पोलिसांकडून नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे,

  • 18 Aug 2022 03:46 PM (IST)

    कल्याण डोंबिवलीत रंगणार थरांचा थरथराट

    कल्याण डोंबिवलीत रंगणार थरांचा थरथराट

    गोविंदा पथकं सज्ज, पोलीस प्रशासनानेही कसली कंबर

    यंदा कल्याण डोंबिवलीतही थरांचा थरथराट रंगणार भाजपा सह सेनेचे ठाकरे आणि शिंदे गट आपली स्वतंत्र दहीहंडी उत्सव ठेवणार

    तर मनसे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचीही तयारी पूर्ण झालीये.लाखोंच्या हंड्या यंदा फुटणार असून पोलीस प्रशासन देखील सज्ज झालंय..

    बाईट :- दीपेश मात्रे ( शिंदे गट माजी नगरसेवक )

    बाईट :-मनोज घरत ( मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष)

    बाईट :-दत्तात्रय शिंदे (अप्पर पोलीस आयुक्त कल्याण )

  • 18 Aug 2022 03:46 PM (IST)

    राज्य सरकारकडे विनंती आहे की एटीएसने याची चौकशी करावी

    हरिहरेश्वर परिसरात भरकटलेली बोट सापडली, घातक शस्त्र सापडलेत. रायगड पोलिस घटनास्थळी आहेत त्याची चौकशी होईल

    समुद्र सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेत

    राज्य सरकारकडे विनंती आहे की एटीएसने याची चौकशी करावी

    सखोल तपास केला जावा

    याचं सत्य लवकरात लवकर बाहेर आलं पाहिजे

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करतोय,

    उद्या गोकुळाष्टमी साजरा केला जातो

    जनतेने आनंदाने सण साजरा करावा

    जनतेच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठलीही त्रुटी राहणार नाही याची खबरदारी राज्य आणि केंद्राने घ्यावी

  • 18 Aug 2022 03:37 PM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा अलर्ट जारी

    रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा अलर्ट जारी

    रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांनी दिले आदेश

    सागरी महामार्गावरील गस्त पोलिसांनी वाढवली

    20 अधिक सागरी महामार्गावरील चेक पोस्ट अलर्ट वर

    सागरी किनाऱ्यावरील लँडिंग पॉईंट वर 24 तास पोलिसांची नजर

    सागरी महामार्गावरील गाड्यांची कसून चौकशी सुरू

  • 18 Aug 2022 03:33 PM (IST)

    मिठाई दुकानात केली चोरी आणि समोर आले अट्टल गुन्हेगार

    मिठाई दुकानात केली चोरी आणि समोर आले अट्टल गुन्हेगार

    सीसीटीव्हीच्या मदतीने कल्याण महात्मा फुले पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

    सात गुन्हे झाले उघड गुन्ह्यात वापरलेली स्कुटी ,कटावणी व आठ लाखाचा माल पोलिसांनी केले हस्तगत

  • 18 Aug 2022 03:14 PM (IST)

    मैत्रिणीच्या मदतीने विरार मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

    विरार:-मैत्रिणीच्या मदतीने विरार मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

    - 3 जणांना अटक; एक जण फरार अटक मध्ये 21 वर्षाच्या तरुणीचा सहभाग

    - 21 वर्षाच्या मैत्रिणीच्या मदतीने एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 2 जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे.

    - याबाबत विरार पोलीस ठाण्यात काल बुधवार ता 17 रोजी सायंकाळी पोस्को सह सामूहिक बलात्कार चा गुन्हा दाखल करून अवघ्या 12 तासाच्या आत 3 जणांना अटक केले असून एक जण फरार झाला आहे. अटक आरोपी मध्ये 21 वर्षाच्या तरुणीचा समावेश आहे

  • 18 Aug 2022 03:01 PM (IST)

    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूरच्या दोन अस्थायी कर्मचाऱ्यांना लाच घेताना एसीबीने केली अटक,

    चंद्रपूर- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूरच्या दोन अस्थायी कर्मचाऱ्यांना लाच घेताना एसीबीने केली अटक,

    प्रशिक्षण संस्थेमध्ये मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा चार महिन्याचा थकीत पगार काढून दिल्यामुळे आणि उर्वरित तीन महिन्याच्या पगार काढून देण्यासाठी मागितली लाच,

    लाच घेणारा एक कर्मचारी मानधन तत्वावर तर दुसरा कंत्राटी तत्त्वावर करत होता कार्यरत,

    लाचेची बारा हजार रक्कम घेत असताना शांताराम राठोड गटनिदेशक आणि प्रशांत वांढरे निदेशक या दोघांना रंगेहात केली अटक

Published On - Aug 18,2022 2:59 PM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.