
आज दिनांक 8 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी (Maharashtra News Live Update ). पावसाने गेले अनेक दिवस दडी मारली होती. पावसाभावी पिके सुकून चालल्याने बळीराजाची चिंता वाढली होती. मात्र आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून, राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे (live updates). पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवस कोकणासह मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. जाणून घेऊयात मान्सून बाबतची प्रत्येक अपडेट