Maharashtra News Live Update: कोल्हापुरात गणेश विसर्जादरम्यान एक तरुण पंचगंगा नदीत वाहून गेला

राज्यासह देश पातळीवरील राजकीय, सामाजिक आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काय काय घडत आहे आणि घडणार आहे त्या घटनाघडामोडींचे अपडेट तुम्हाला टीव्ही 9 मराठीवर वाचायला मिळणार आहेत.

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात गणेश विसर्जादरम्यान एक तरुण पंचगंगा नदीत वाहून गेला
| Updated on: Sep 13, 2022 | 8:33 AM

राज्यात आज गौरी गणपती विसर्जन होत आहे. गणेशोत्सवानिमित्त राजकीय घडामोडींनाही प्रचंड वेग आला आहे. राज्यातील अनेक नेते आपापल्या परिसरातील श्रींचे दर्शन घेत आहेत. त्याचवेळी राजकीय टीका टिपणीही केली जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधानही आले आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीसारखीच बिहार आणि झारखंडमध्येही स्थिती निर्माण झाली आहे,त्यामुळे भाजपवरही राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरुन निशाणा साधला जात आहे. तर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडून भेटीगाठी वाढल्या असल्याने मुंबईसह इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबतही आता जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत. राज्यासह देश पातळीवरील राजकीय, सामाजिक आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काय काय घडत आहे आणि घडणार आहे त्या घटनाघडामोडींचे अपडेट तुम्हाला टीव्ही 9 मराठीवर वाचायला मिळणार आहेत.