Maharashtra Breaking Marathi News Live | चर्चगेटमधील मुलींच्या वसतिगृहात तरुणीची हत्या, नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 07, 2023 | 7:07 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | चर्चगेटमधील मुलींच्या वसतिगृहात तरुणीची हत्या, नेमकं काय घडलं?
Marathi News Live
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई :  रविवारी बिहारमधून एक अजस्र पूल कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या पुलाच्या बांधकामाचे कंत्राट एस. पी. सिंगला या कंपनीकडे होते. त्यामुळे मुंबईतील पुलाच्या बांधकामाचे कंत्राट या कंपनीकडून काढून घेण्याची मागणी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे. बिहार पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रवी राजा यांनी ही मागणी केली आहे.

 

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Jun 2023 11:52 PM (IST)

    धानोरी – कलवड रस्ता, खेसे पार्क, ब्रह्मा स्कायसिटी या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील सदनिकेत आग

    पुणे

    धानोरी – कलवड रस्ता, खेसे पार्क, ब्रह्मा स्कायसिटी या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील सदनिकेत आग

    पुणे अग्निशमन दल तातडीने दाखल

    अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आणि पीएम आरडीएची 1 गाडीच्या सहाय्याने आग आटोक्यात

    कोणतीही जीवितहानी नाही

  • 06 Jun 2023 11:30 PM (IST)

    रेल्वे दुर्घटनेनंतर पाच दिवसांनी कोरोमंडल एक्सप्रेस उद्यापासून पुन्हा सुरू होणार

    कोलकाता

    बालासोर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर पाच दिवसांनी कोरोमंडल एक्सप्रेस उद्यापासून पुन्हा सुरू होणार

    ओडिशातील बहंगा बाजार स्थानकाजवळ गेल्या शुक्रवारी संध्याकाळी या ट्रेनला झाला होता अपघात

    पाच दिवसांनी कोरोमंडल एक्स्प्रेस बुधवारी दुपारी 3.30 वाजता शालिमार येथून पुन्हा चेन्नईसाठी रवाना होणार

    ही ट्रेन पूर्वीच्या मार्गावरच धावणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट

    बुधवारी दुपारी 3.20 वाजता ही ट्रेन शालिमारहून चेन्नईसाठी सुटणार.


  • 06 Jun 2023 11:14 PM (IST)

    बस स्थानकातून बाहेर निघालेली एसटी बस थेट चार चाकी मोटारींवर आदळली; पुणे ते खिरेश्वर बसला अपघात

    नारायणगाव /जुन्नर

    बस स्थानकातून बाहेर निघालेली एसटी बस थेट चार चाकी मोटारींवर आदळली

    अपघाताची घटना सीसीटिव्हीमध्ये कैद

    पुणे ते खिरेश्वर ही बस  नारायणगाव येथे बस स्थानकातून बाहेर आली होती

    त्यानंतर थेट कुरेशी मार्केटच्या समोर जाऊन  चारचाकी  वाहनांना धडकली.

    सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसून दोन मोटारींचे नुकसान

  • 06 Jun 2023 10:40 PM (IST)

    चर्चगेटमधील मुलींच्या वसतिगृहात तरुणीची हत्या

    अतिप्रसंग करून हत्या केल्याचा संशय

    तरुणीचा मृतदेह हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावर विवस्त्र अवस्थेत आढळला

    हॉस्टेलचा सुरक्षारक्षक गायब असल्याची माहिती

    मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून तपास सुरू

    सावित्रीबाई फुले महिला वसतिगृतील धक्कादायक घटना

  • 06 Jun 2023 10:37 PM (IST)

    विरारमध्ये चालू बांधकामाची भिंत कोसळली

    तीन महिला मजुरांचा मृत्यू

    घटना दुपारी चारच्या सुमारास घडली

    इमारतीच्या फायलिंगचे काम सुरू होते

    विरार पोलीस घटनेचा तपास करत आहेत

  • 06 Jun 2023 10:14 PM (IST)

    भंडारा : खासदार सुनील मेंढे यांनी घेतला अधिकाऱ्याचा क्लास

    मुजोर अधिकाऱ्यांना खासदार मेंढे यांनी धरले धारेवर

    मोहाडीतील जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांवर काढला तोडगा

    वनविभागाच्या अधिकाऱ्यांना खासदार मेंढे यांनी सुनावले

  • 06 Jun 2023 10:10 PM (IST)

    जळगाव : शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा

    भुसावळमध्ये शिवप्रेमींच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीसह विविध सजीव देखावे

    छत्रपतींचे विचार तळागळात रुजावी, यासाठी कार्यक्रमाचे आयोजन

  • 06 Jun 2023 09:57 PM (IST)

    चर्चगेटमधील मुलींच्या वसतिगृहात तरुणीची हत्या, नेमकं काय घडलं?

    मुंबई :

    चर्चगेटमधील मुलींच्या वसतिगृहात तरुणीची हत्या

    अतिप्रसंग करून हत्या केल्याचा संशय

    मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून तपास सुरू

    सावित्रीबाई फुले महिला वस्तीगृहातील धक्कादायक घटना

  • 06 Jun 2023 09:34 PM (IST)

    अमरावतीत अपघाताच्या वादातून एका शेतकऱ्याला मारहाण

    अमरावती :

    अमरावती शहरातील कठोरा नाका येथे अपघाताच्या कारणावरून हाणामारी

    अपघाताच्या वादातून एका शेतकऱ्याला मारहाण करून अडीच लाख रुपयांचे लुटल्याचा आरोप

    गाडगेनगर पोलिसांनी 6 जणांना घेतले ताब्यात

    अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

    नांदूरा येथील शेतकरी अमरावती वरून गावाला जात असतानाची घटना

    घटनास्थळी मारहाणीचे दृश्य मोबाईल मध्ये कैद

  • 06 Jun 2023 09:17 PM (IST)

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिल्लीत, बड्या नेत्याची घेतली भेट

    नवी दिल्ली :

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दिल्लीत

    अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची घेतली भेट

    सदिच्छा भेट घेतल्याची चव्हाण यांची प्रतिक्रिया

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या विजयाबद्दल केले अभिनंदन

    2024 मधील लोकसभा निवडणूक, राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थिती आणि सध्याच्या महत्त्वपूर्ण सार्वजनिक प्रश्नांवर चर्चा झाल्याची चव्हाण यांची माहिती

  • 06 Jun 2023 09:13 PM (IST)

    तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी भगीरथी भालके यांच्यासाठी विशेष विमान पाठवलं, उद्या हैदराबादला गाठभेट होणार

    पंढरपूर :

    पंढरपुरातील राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भेटीला

    भगीरथी भालके उद्या बुधवारी चंद्रशेखर राव यांच्या भेटीला जाणार

    चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने भगीरथ भालके यांच्यासाठी पुणे येथे विशेष विमान पाठवले

    मंगळवारी सोलापूर येथे साखर कारखान्याच्या चिमणीच्या अडथळ्यामुळे हे विमान उतरले नाही

    मात्र, भालके पुणे येथून हैदराबाद येथे जाऊन बुधवारी केसीआर यांची भेट घेणार

  • 06 Jun 2023 08:57 PM (IST)

    Vicky Kaushal-Sara Ali Khan Siddhivinayak Temple | सारा अली खान आणि विक्की कौशल सिद्धिविनायकाच्या चरणी, फोटो व्हायरल

    अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमा बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई करत आहे. सिनेमाच्या दणदणीत यशानंतर विकी कौशल आणि सारा अली खान हे दोघे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. दोघांनी चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल सिद्धीविनायकाचे आभार मानले. तसेच हात जोडून प्रार्थनाही केली. सिद्धीविनायकाचं आशीर्वाद घेतल्यानंतर दोघांनीही मंदिर परिसरात भाविकांना प्रसादही दिला.

  • 06 Jun 2023 08:46 PM (IST)

    Virar | पुनर्विकसित इमारतीचा ढिगारा कोसळला, तिघांचा मृत्यू

    पालघर जिल्ह्यातील विरार भागात पुनर्विकसित इमारतीचा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत 3 मजूरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 2 जखमी झाले आहेत. जखमी मजुरांवर स्थानिक रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

  • 06 Jun 2023 08:31 PM (IST)

    Maharashtra SSC Supplementary Exam 2023 | दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

    महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 2 जून रोजी जाहीर झाला. या दहावीच्या परीक्षेत असंख्य विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर काही विद्यार्थ्यांना अपयश आले. दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

    महाराष्ट्र राज्य माध्यमिकशिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचं आवाहन

    विद्यार्थ्यांना 7 जूनपासून अर्ज करता येणार आहे.तर अर्ज करण्याची 16 जून ही शेवटची तारीख असणार आहे. तसेच लेट फीसह 21 जूनपर्यंत अर्ज करता येईल.

  • 06 Jun 2023 08:15 PM (IST)

    Mumbai University Chancellor | मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रविंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती

    राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी डॉ रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. तसेच डॉ सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ संजय भावे यांची डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

    डॉ रवींद्र कुलकर्णी हे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. तर डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ संजय भावे डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रि. बॉटनी विभाग विभागप्रमुख आहेत.

  • 06 Jun 2023 08:01 PM (IST)

    ओडिशा रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक दावा

    -ओडिसामध्ये झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघाताबाबत एका व्यक्तीने खळबळजनक दावा केलाय.

    -अपघात होण्याआधी तिथे ट्रॅक दुरूस्तीचं काम सुरू असल्याचं संबंधित व्यक्तीने म्हटलं आहे.

    -20 मीटर अंतरावर दूर उभ्या असलेल्या व्यक्तिने हा दावा केला आहे.

  • 06 Jun 2023 07:32 PM (IST)

    पुण्यातील पर्वती मंदिराजवळ आढळली अनधिकृत मजार

    -पुण्यात पुन्हा मजारीवरून वाद पेटण्याची शक्यता आहे.

    -पुण्यातील पर्वती मंदिराच्या पायथ्याशी अनधिकृत मजार आढळली आहे. मात्र मजारीचा इतिहास मात्र अस्पष्ट आहे.

    -अनुचित प्रकार घडू नये यासाठी मजारीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

    -अनधिकृत मजारवर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे.

    -भाजपच्या शिष्टमंडळाने वनाधिकारी राहुल पाटील यांची भेट घेतली आहे.

  • 06 Jun 2023 07:23 PM (IST)

    माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर

    -लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ गैरव्यवहार प्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर झाला आहे.

    -जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर.एन. पांढरे यांनी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलाय.

    -बोगस लाभार्थीच्या नावे कर्ज काढून महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

    -रमेश कदम यांची आज्जी बायम्मा गणपत क्षीरसागर यांच्या नावे दुग्धव्यवसाय करण्यासाठी बेकायदेशीररित्या कर्ज मंजुरीचे आदेश काढले होते.

    -दरम्यान माजी आमदार रमेश कदम यांना 7 वर्षानंतर जमीन मंजूर झाला आहे.

  • 06 Jun 2023 07:16 PM (IST)

    शरद पवार यांचं सूचक वक्तव्य

    -रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघात राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

    -भोकरदन विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांचा दौरा

    -जाफराबादच्या नगराध्यक्षाच्या घरी शरद पवार यांनी भेट दिली आहे.

    -जाफराबादच्या कार्यक्रमात शरद पवार यांचा रावसाहेब दानवे यांना गर्भित ईशारा

    -येणाऱ्या काळात पुढचा कार्यक्रम व्यवस्थित करू, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनीकेलं आहे.

  • 06 Jun 2023 07:08 PM (IST)

    विरारला भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू

    -मुंबईला लागून असलेल्या विरार परिसरात भिंत कोसळली आहे.

    -या भिंतीखाली दबल्यामुळे 3 महिला मजुरांचा मृत्यू झालाय.

    -ही घटना पूर्व रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे.

  • 06 Jun 2023 06:57 PM (IST)

    येवला भागामध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

    येवला भागामध्ये अचानक झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे

    वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने लोकांनी तारांबळ

    वाऱ्यामुळे टपरी उडून गेल्याची घटना

  • 06 Jun 2023 06:44 PM (IST)

    साखर कारखान्याच्या चिमणीमुळे सोलापूरच्या विमानसेवेला मोठा अडथळा

    सोलापूर विमानसेवेला मोठा अडथळा निर्माण झालाय

    सोलापुरात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पाठवलेल्या विमानाला उतरण्यात आल्या समस्या

    साखर कारखान्याच्या चिमणीमुळे सोलापूरच्या विमानसेवेत अडथळा

    भगिरथ भालके यांचा हैद्राबाद दौरा बुधवार वर गेला आहे

    आज ते सोलापूरच्या विमानसेवेत अडथळा निर्माण झाल्याने हैद्राबाद रवाना होऊ शकले नाहीत

    आता बुधवारी भगीरथ भालके सहकुटुंब हैद्राबादला जाणार आहेत

  • 06 Jun 2023 06:38 PM (IST)

    11 वर्षांनंतर नाशिक शहरात रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार, नागरिकांची गर्दी 

    सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर नाशिक शहरात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले

    11 वर्षांनंतर नाशिक शहरात बैलगाडा शर्यतीचा थरार शहरवासींना अनुभवता आला

    म्हसरूळ परिसरातील बोरगड येथील ठक्कर मैदानावर स्पर्धेचे आयोजन

    बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी बघायला मिळाली

    विशेष म्हणजे विजेत्यांना मिळणार दुचाकीचे बक्षीस

  • 06 Jun 2023 06:34 PM (IST)

    थेट मागणी शरद पवारांनीच करावी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई

    जितेंद्र आव्हाड यांनी मोठा खुलासा करत सर्वांनाच धक्का दिला

    आनंद दिघे यांना शरद पवारांनी सोडवल्याचे  वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले

    आता शरद पवार यांनीच जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे

    इतकेच नाही तर जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेकडून निषेध देखील करण्यात आलाय

  • 06 Jun 2023 06:26 PM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ.सुरेश गोसावी यांची नियुक्ती

    शेवटी तब्बल एक वर्षांनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाले पूर्णवेळ कुलगुरू

    डॉ.सुरेश गोसावी यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा ही राज्यपाल कार्यालयाने केली आहे

    कुलगुरू पदासाठी मोठी चुरस देखील बघायला मिळाली

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी तब्बल २७ उमेदवारांकडून अर्ज आले होते

    डॉ.सुरेश गोसावी हे पुणे विद्यापीठात पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख आहेत

  • 06 Jun 2023 06:20 PM (IST)

    हिंदू महासंघाकडून औरंगजेबाचे पोस्टर पुण्यातील लाल महालासमोर फाडण्यात येणार

    हिंदू महासंघाकडून औरंगजेबाचे पोस्टर पुण्यातील लाल महालासमोर फाडण्यात येणार

    हिंदू महासंघ आक्रमक, फाडण्यात येणार औरंगजेबाचे पोस्टर

    अहमदनगर छत्रपती संभाजीनगर येथे एका मिरवणुकीत

    औरंगजेबाचे पोस्टर नाचवल्याचा प्रकार घडला होता

    त्याचाच निषेध म्हणून हिंदू महासंघातर्फे पुण्यात आज

    औरंगजेबाचे पोस्टर्स लाल महाला समोर फाडण्यात येत आहेत

  • 06 Jun 2023 06:16 PM (IST)

    कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

    कोल्हापुरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे

    औरंगजेबाचा संदर्भ देऊन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करण्यात आलीये

    कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे

    आता कारवाईसाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्ते मोठया संख्येने जमले आहेत

    आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी ही केली जात आहे

  • 06 Jun 2023 06:12 PM (IST)

    पुण्यात हिंदू महासंघ करणार कसबा गणपतीची आरती

    पुण्यात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हिंदू महासंघ करणार आहे कसबा गणपतीची आरती

    छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत बालकलाकार करणार कसबा गणपतीची आरती

    हिंदू महासंघातर्फे साहसी खेळांच्या प्रात्यक्षिकाचे देखील आयोजन

     

  • 06 Jun 2023 06:09 PM (IST)

    विरारमध्ये चालू बांधकामाची भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू

    विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये

    चालू बांधकामाची भिंत कोसळून मोठा अपघात झालाय

    मातीखाली 5 मजूर अडकले, त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे

    तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे

    मृत्यामध्ये तीन महिलांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे

    विरार पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळावर दाखल झाले

    हे सर्व कामगार नांदेड, परभणी भागातील असल्याची प्राथमिक माहिती आहे

  • 06 Jun 2023 06:01 PM (IST)

    ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 288

    तिहेरी रेल्वे अपघातातील मृताचा आकडा वाढला

    बेलासोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महिती

    अजूनही काही मृतदेहांची ओळख पटविणे बाकी

  • 06 Jun 2023 05:49 PM (IST)

    मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माबाबत चिंता वाटावी अशी स्थिती

    शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता

    व्यक्तिगत कारणातून समाच आणि चर्चवर हल्ला करणे चूक

    काही लोक जाणीवपूर्वक भेदभाव करत असल्याचा आरोप

  • 06 Jun 2023 05:47 PM (IST)

    सुप्रिया सुळे यांचे ट्विट, गडकरी यांनी घेतली तातडीने दखल

    पालखी महामार्गावरील खड्डे त्वरीत बुजवले

    सुप्रिया सुळे यांनी केले होते ट्विट

    केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली तातडीने दखल

    सुप्रिया सुळे यांनी मानले गडकरी यांचे आभार

  • 06 Jun 2023 05:41 PM (IST)

    समनापूर गावात तणावपूर्ण शांतता

    दगडफेकीत 2 गटात तुफान दगडफेक

    दगडफेकीत 2 जण जखमी

    अहमदनगर जिल्ह्यातील समनापूर गावात परिस्थिती नियंत्रणात

    घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त

  • 06 Jun 2023 05:35 PM (IST)

    आता मुंबई महानगर प्रदेशातही क्लस्टर योजना

    धोकादायक इमारतींच्या क्लस्टर योजनेचा मार्ग मोकळा

    मीरा-भाईंदर, कल्याण, भिवंडी येथील क्लस्टर योजना लवकरच

    दिवाळीनंतर योजनेच्या कामाला मुहूर्त

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

  • 06 Jun 2023 05:30 PM (IST)

    कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

    औरंगजेबाचा संदर्भ देऊन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट

    आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यांना अटक करण्याची केली मागणी

    कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर

  • 06 Jun 2023 05:24 PM (IST)

    निराधार बालकांसाठी मुंबईत रुग्णवाहिका

    किलबिलाट या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्धघाटन

    ‘ज्यांचे कोणी नाही’, या संकल्पनेवर आधारीत सेवा

  • 06 Jun 2023 05:12 PM (IST)

    राज्यात मान्सूनचा लवकरच सांगावा

    अरबी समुद्रात पुढील 24 तासात चक्रीवादळाची शक्यता

    सध्या हे चक्रीवादळ किनारपट्टीपासून 1000-1100 किमी दूर

    किनारपट्टीला सध्या तरी कुठलाही धोका नाही

    मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून मनाई

  • 06 Jun 2023 05:05 PM (IST)

    बालासोर अपघातातील 531 लोकांना भरपाई

    आतापर्यंत 15.6 कोटी रुपयांची नुकसान भरपाई

    अपघातात 303 जण किरकोळ जखमी

    या अपघातात 109 जण गंभीर जखमी

    119 मयतांच्या कुटुंबियांना आतापर्यंत नुकसान भरपाई देण्यात आली

    बालासोरचे CPRO आदित्य कुमार चौधरी यांची माहिती

  • 06 Jun 2023 04:58 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकदिवसीय सिंधुदुर्ग दौऱ्यावर

    – शासन आपल्या दारी ही योग्य संकल्पना, आम्ही ती राज्यभरात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत

    – या सर्व योजनेचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे.

    – आम्ही आमची ताकद वाढवतोय, आमचे नेते इथे काम करत आहेत.

    – आमची ताकद वाढत आहे. नेते,पदाधिकारी, मोठ्या प्रमाणात आमच्याकडे प्रवेश करत आहेत.

     

     

  • 06 Jun 2023 04:52 PM (IST)

    देशातील सर्व संस्था संकटात आहेत – शरद पवार

    – माझा देशातील सामान्य माणसांवर विश्वास आहे, देशातील सामान्य माणूस शहाणा आहे.

    – राजकारणी जर चुकीच्या मार्गावर गेले तर सामान्य माणूसच त्यांना योग्य मार्गावर आणतो

    – 77 साली संसदीय लोकशाहीला धोका निर्माण झाला, त्यांनाही लोकांनी पराभूत केलं.

    – पुन्हा जनता सरकार आले, जेव्हा त्यांच्या काही चुका झाल्या तेंव्हा त्यांनाही जनतेनं खाली खेचलं

  • 06 Jun 2023 04:45 PM (IST)

    अमरावती : शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने लावली हजेरी

    अमरावती शहरासह विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार बरसला पाऊस

    अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली

    उकाड्यामुळे वैतागलेल्या नागरिकांना पावसामुळे मिळाला दिलासा

  • 06 Jun 2023 04:35 PM (IST)

    येवला : जोरदार पावसाच्या हजेरीमुळे ग्रामस्थांची उडाली तारांबळ

    येवला तालुक्यातील भारम ,वाघाळा, रहाडी या गावासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.

    अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली.

    मात्र अचानक दुपारच्या सुमारास जोरदार वादळासह आला पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला.

  • 06 Jun 2023 04:27 PM (IST)

    शिक्षण आयुक्तांनी 72 अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे पत्र पाठवल्याने खळबळ

    शिक्षण आयुक्तांनी थेट एसीबीला पत्र दिल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली

    मात्र सकाळपासून शिक्षण आयुक्तांशी संपर्क होऊ शकला नाही

  • 06 Jun 2023 04:22 PM (IST)

    बालासोर ट्रेन दुर्घटना: पश्चिम बंगालमध्ये 103 मृतदेहांची ओळख पटली, 31 अद्याप बेपत्ता

    बालासोर रेल्वे दुर्घटनेप्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. पश्चिम बंगाल सरकारने दावा केला आहे की दुर्घटनेतील 103 मृतदेहांची ओळख पटली आहे.

    तर 97 जणांवर उपचार सुरू आहेत. अद्याप 31 प्रवासी बेपत्ता असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

    इतक्या लोकांचा मृत्यू झाला, सत्य बाहेर आलं पाहिजे , मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मागणी

  • 06 Jun 2023 04:14 PM (IST)

    क्लस्टर वरून जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा

    क्लस्टरमधून अब्जावधी रुपये मिळतील आणि पुढच्या 10 पिढ्या बसून खातील या हव्यासापोटी क्लस्टर योजना राबवली, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

  • 06 Jun 2023 04:07 PM (IST)

    ओडिशा : सिकंदराबाद-अगरतळा एक्स्प्रेसला आग लागली

    ब्रह्मपूर स्थानकाजवळ सिकंदराबाद-अगरतळा एक्स्प्रेसला आग लागल्याचे वृत्त

    आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

  • 06 Jun 2023 04:04 PM (IST)

    नवी मुंबई : तरुणावर सख्ख्या भावाचा जीवघेणा हल्ला

    सानपाडा येथे तरूणावर सख्ख्या भावानेच जीवघेणा हल्ला केला.

    हल्ला झाल्यानंतर तरुण स्वतःच रुग्णालयात जाऊन दाखल झाला

    चार तासाच्या शस्त्रक्रियेनंतर चाकू काढण्यात डॉक्टर यशस्वी ठरले

    सानपाडा पोलिस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

     

  • 06 Jun 2023 03:45 PM (IST)

    केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या भाजपकडे तीन मोठ्या मागण्या 

    लोकसभेच्या दोन तर विधानसभेच्या पंधरा जागा मिळाव्यात- आठवले

    मंत्रीमंडळ विस्तारात एक मंत्रीपद आपल्याला मिळावं- रामदास आठवले

    लोकसभेला शिर्डीतून उमेदवारी मिळावी- आठवलेंची मागणी

  • 06 Jun 2023 03:19 PM (IST)

    एस. पी. सिंगला दिलेल्या मुंबईतील पुलाचं कंत्राट रद्द करा- मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांची मागणी 

    बिहार पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रवी राजा यांची मागणी

    बिहार मधील कोसळलेल्या पुलाचं काम एस. पी. सिंगला या कंपणीने केले होते- रवी राजा

    रवी राजा यांचं मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांना पत्र

    कमीशन मिळवण्यासाठी उध्दव ठाकरे सरकारच्या काळात ही कंत्राट दिली गेली – भाजप आमदार राम कदम यांचा आरोप

  • 06 Jun 2023 03:09 PM (IST)

    खोके घेतल्याशिवाय अजित पवार काम करत नव्हते- खासदार कृपाल तुमाने यांचा आरोप 

    तुमानेंनी आरोप सिद्ध केले तर मी राजकारण सोडेल- अजित पवार

    आरोप सिद्ध झाले नाही तर तुमानेंनी राजकारण सोडावे- अजित पवार

  • 06 Jun 2023 03:02 PM (IST)

    अहमदनगरच्या समनापूर गावात दोन गटात वाद

    समनापूर गावातील वादाचा व्हिडीओ आला समोर

    दोन गटात वाद झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल

    समनापूरमध्ये तणावाची परिस्थिती

  • 06 Jun 2023 02:52 PM (IST)

    संजय पवार यांच्या ‘त्या’ आरोपानंतर कोल्हापुरात शिवसेना आक्रमक, केली कारवाईची मागणी

    ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरात शिवसेना आणि ठाकरे गटातील वाद चिघळला.

    ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यावर कायदेशीर कारवाई करा.

    शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    संजय पवार शासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप

    पवार यांच्यावर कारवाई करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ

    राजकीय सभा यशस्वी करण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रमाचा वापर केला जात असल्याचा संजय पवार यांनी केला होता आरोप.

  • 06 Jun 2023 02:37 PM (IST)

    शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवरायांना अनोखे अभिवादन

    येवल्यातील पैठणी ही सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे.

    येवल्यातील ओमकार रत्नाकर रोडे यांनी पैठणीपासून साकारली शिवरायांची प्रतिकृती.

    वॉल हँगिंग या हस्तकला माध्यमातून शिवरायांची प्रतिकृती साकारली.

    शिवरायांची प्रतिकृती साकारण्याकरता तीन महिन्यांचा कालावधी लागला.

    ओमकारने आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवरायांना अभिवादन केले.

  • 06 Jun 2023 02:26 PM (IST)

    “प्रकाश आंबेडकरांचा दिशा भरकटवण्याचा प्रयत्न”, देवेंद्र फडणवीस यांची टीका

    महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक येत आहे.

    परदेशी गुंतवणूक येण्यात महाराष्ट्र देशात नंबर 1

    2020 ते 2022 या काळात राज्यात परदेशी गुंतवणूक कमी झाली होती.

    आमच्या सरकारने महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणलं.

    प्रकाश आंबेडकर यांच्याकडून राजकारणाची दिशा भटकवण्याचं काम सुरु.

    भिमा कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

  • 06 Jun 2023 02:22 PM (IST)

    राज्यातील जलयुक्त प्रकल्पांना गती मिळणार, देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

    मुंबईतील लहान बालकांसाठी किलबीलाट अॅम्बुलन्स.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन.

    राज्याच्या वतीने प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केला जाणार.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार केला जाणार.

    राज्यातील जलयुक्त प्रकल्पांना गती मिळणार.

  • 06 Jun 2023 02:13 PM (IST)

    पुणे लोकसभा मतदारसंघाविषयी राष्ट्रवादीचा दावा, आणि कार्यकर्त्यांनाही इशारा

    पुणे पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कामाला लागली.

    पुणे लोकसभा मतदारसंघावर आमचा दावा कायम आहे.

    शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माझ्यावर पुणे लोकसभेची जबाबदारी देण्यात आली.

    पुणे लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात बुहनिहाय बैठका घेतल्या जाणार

    पोटनिवडणूकीसाठी उमेदवार कोण असेल हे शरद पवार, अजित पवार ठरवणार.

  • 06 Jun 2023 02:09 PM (IST)

    शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमेंची मोठी गर्दी, रायगडावरील गर्दी पोलिसांनी पांगवली

    किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

    शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमेंची मोठी गर्दी

    रायगडावरील गर्दी पोलिसांनी पांगवली

    पोलिसांनी शिवभक्तांनवर सौम्य प्रमाणात लाठीचार्ज केला

    हळूहळू सर्व शिवभक्तांना किल्ल्यावरून खाली पायवाटेने सोडण्यात आलं.

  • 06 Jun 2023 01:57 PM (IST)

    सांगलीत भाजप-राष्ट्रवादी संघर्ष

    सांगली महापालिकेत भाजपा विरोधात राष्ट्रवादीत संघर्ष

    महापौरांच्या विरोधात नगरसेवकांचा संताप

    भाजपा नगरसेवकांचा महापौर दालनात ठिय्या आंदोलन

    भाजपा नगरसेवकांना निधी वाटपात डावलले जात असल्याचा आरोप

    भाजपचे गटनेत्या भारती दिगडे यांच्यासह नगरसेवकांचे आंदोलन

    सांगली महापालिकेत राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी आहेत महापौर

  • 06 Jun 2023 01:53 PM (IST)

    कोल्हापुरात शिंदे, ठाकरे गटातील वाद वाढणार

    शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरात शिंदे आणि ठाकरे गटातील वाद वाढणार

    ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यावर कायदेशीर कारवाई करा

    शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

    संजय पवार शासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप

    पवार यांच्यावर कारवाई करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ

    शिंदे गटाचा इशारा

    राजकीय सभा यशस्वी करण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रमाचा वापर केला जात असल्याचा संजय पवार यांनी केला होता आरोप

  • 06 Jun 2023 01:49 PM (IST)

    भीमा कोरेगाव दंगलीसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांची मागणी

     

    तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भीमा कोरेगाव आयोगानं समन्स पाठवून चौकशीसाठी बोलवावं

    वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आयोगानं पाठवलेल्या पत्राला दिलं उत्तर

    भीमा कोरेगाव आयोगानं प्रकाश आंबेडकरांना अशा घटना घडणार नाहीत यासाठी सल्ला विचारण्यासाठी आयोगापुढे बोलवलं होते.

  • 06 Jun 2023 01:39 PM (IST)

    अजित पवार यांचे सरकारवर टीकास्त्र

    मोफत एसटी प्रवास फसवणूक

    सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही

    सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोळ

    अजित पवार यांनी केले सरकावर गंभीर आरोप

  • 06 Jun 2023 01:34 PM (IST)

    समनापूर गावात तणावाची परिस्थिती

    समनापूर गावात तणावाची परिस्थिती

    पोलिसांकडून जनतेला शांतता राखण्याचे आवाहन

    दोन गटात झाला आहे वाद

    वादाचे कारण अद्याप अस्पष्ट

    लव्ह जिहादच्या विरोधात काढलेल्या मोर्च्यानंतर झाला वाद

  • 06 Jun 2023 01:26 PM (IST)

    रायगडावर शिवभक्तांची मोठी गर्दी

    रायगडावर शिवभक्तांची मोठी गर्दी

    गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार

    गडावरुन खाली उतरण्याचे संभाजी राजे यांनी केले आवाहन

    जोपर्यंत सर्व शिवभक्त खाली उतरणार नाही, तोपर्यंत आपणही खाली उतरणार नाही

    संभाजी राजे यांची घोषणा

  • 06 Jun 2023 01:23 PM (IST)

    नगर जिल्ह्यात लव्ह जिहादची प्रकरणे- सोमय्या यांचा दावा

    लव्ह जिहाद संबंधी नगर जिल्हयात ६ प्रकरणे समोर

    भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दावा

    काही पालकांशी चर्चा झाली आहे

    उद्या सकाळी १० वाजता हे सगळे मला नगरला भेटणार -सोमय्या

    १६-१७ वर्षापासून मुलींना ट्रॅप करुन केले जात आहे लग्न

  • 06 Jun 2023 01:17 PM (IST)

    अहमदनगरमधील संगमनेरमध्ये दगडफेक

    भगव्या मोर्चाला लागले गालबोट

    संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात दोन गटात दगडफेक

    मोर्चातून गावाकडे परतत असताना घडला प्रकार

    अनेक गाड्यांचे नुकसान तर एक जण जखमी

    पोलीस घटनास्थळी दाखल

    समनापूर गावात तणावाची परिस्थिती

  • 06 Jun 2023 01:10 PM (IST)

    अपघातानंतर रेल्वे मार्ग सुरळीत

    बालासोर अपघातानंतर रेल्वे मार्ग सुरळीत

    NDRF टीमचे काम पूर्ण

    आठ NDRF टीमने केले सतत तीन दिवस काम

    घटनास्थळी एका तासांत पोहचली होती NDRF टीम

  • 06 Jun 2023 01:05 PM (IST)

    पतीने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला

    डोंबिवलीत पतीने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला

    दारूचे व्यसन असल्याने आरोपीने पत्नीला गळा दाबून केला हत्येचा प्रयत्न

    शेजारच्या लोकांच्या मदतीमुळे पत्नीचा वाचला जीव

    मानपाडा पोलीसानी गुन्हा दाखल करत आरोपी पतीला ठोकल्या बेड्या

  • 06 Jun 2023 01:03 PM (IST)

    मोर्शीत शेतकऱ्यांचे आंदोलन

    प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अमरावतीतील मोर्शीत आंदोलन

    जमिनीचा मोबदला, नोकरीसाठी लागणारे दाखले न मिळाल्याने शेतकरी आक्रमक

    अप्पर वर्धा धरणात शेती गेली पण मोबदला मिळाला नसल्याचा आरोप

    सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या जोरदार घोषणाबाजी

    आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

  • 06 Jun 2023 01:02 PM (IST)

    बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी विजय सिंघल

    विजय सिंघल यांनी सोमवार ५ जून रोजी बेस्ट उपक्रमाचे मावळते व्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्याकडून बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्विकारला.

    आयआयटी रूरकी मधून बी.टेक (स्थापत्य अभियांत्रिकी) या विषयात मिळवले सुवर्णपदक

    आयआयटी दिल्ली मधून ‘बिल्डींग सायन्स अँड कंन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट (इमारत विज्ञान आणि बांधकाम व्यवस्थापन)’ या विषयात एम. टेक पदवी संपादित

  • 06 Jun 2023 01:01 PM (IST)

    महाराष्ट्रात केसीआर यांच्या भारत राष्ट्र किसान समितीच्या वतीने विकासाचा तेलंगणा पॅटर्न राबवला जाणार

    विधानसभेच्या २८८ मतदारसंघात पक्षाचे काम सुरू

    स्थानिक स्वराज्य संस्थेसह विधानसभा लोकसभेच्या सर्व निवडणुका भारत राष्ट्र किसान पक्ष ताकतीने लढवणार

    महाराष्ट्राला भारत राष्ट्र किसान पक्षाचा मुख्यमंत्री देणार

    सातारा जिल्ह्यात तेलंगणाच्या विकासाचे रोल मॉडेल घराघरात पोचवले असल्याने सभासद नोंदणी सुरू

    तेलंगणा भारत राष्ट्र समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम यांची माहिती

  • 06 Jun 2023 01:01 PM (IST)

    पर्यटन वाढीसाठी लागणारा निधी राज्य सरकार देणार, सावंतवाडीतून मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    कोकणात पर्यटनासाठी सर्वकाही करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार

    पर्यटन वाढीसाठी लागणारा सर्व निधी राज्य सरकार देणार

    अंबोलीत हिल स्टेशन उभारण्याचा सरकारचा प्रयत्न

    आपलं सरकार लोकांना न्याय देणारं सरकार, यापूर्वी कुणी दिला नसेल इतका निधी सिंधुदुर्गात दिला

  • 06 Jun 2023 12:57 PM (IST)

    कोकणात पर्यटनासाठी सर्वकाही करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार – मुख्यमंत्री

    – कोकणात पर्यटनासाठी सर्वकाही करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार

    – पर्यटन वाढीसाठी लागणारा सर्व निधी राज्य सरकार देणार

    – अंबोलीत हिल स्टेशन उभारण्याचा सरकारचा प्रयत्न

  • 06 Jun 2023 12:55 PM (IST)

    महिला बचत गटांना सक्षम करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न – एकनाथ शिंदे

    मुख्यमंत्री शिंदे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    महिला बचत गटांना सक्षम करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न – एकनाथ शिंदे

    राणे यांच्या खात्याकडे असणाऱ्या योजना घेण्यास सरकार कमी पडणार नाही

    आपलं सरकार लोकांना न्याय देणारं सरकार, यापूर्वी कुणी दिला नसेल इतका निधी सिंधुदुर्गात दिला

    कोकणात ३ क्रीडी संकुल बांधण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री

  • 06 Jun 2023 12:42 PM (IST)

    वडांच्या झाडांचे वृक्षारोपण करून नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात पर्यावरण दिन साजरा

    नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात वडांच्या झाडाचे वृक्षारोपण

    वडांच्या झाडाचे वृक्षारोपण करत जागतिक पर्यावरण दिन साजरा

    सेवा समर्पण या स्वयंसेवी संस्थेने पाळज इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात केले वृक्षारोपण

    रुग्णालय कर्मचाऱ्यांनी घेतली या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी

  • 06 Jun 2023 12:39 PM (IST)

    सोलापूर | विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या ई रिक्षा पडल्या धुळखात

    विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या ई रिक्षा पडल्या धुळखात

    ई रिक्षा धुळखात पडल्याने भाविकातून तीव्र संताप

    ॲड .माधवी निगडी फाउंडेशन व वेनू सोपान गायकवाड फाऊंडेशनच्या वतीने विशिष्ट लोकांना सेवा

    विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, अपंग, अंध, भाविकाच्या सेवेसाठी दहा लाख रुपये खर्च करून मंदिर समितीला दिल्यात ई रिक्षा

    ई रिक्षा आज वापराविना धूळखात पडल्या

    मंदिर समितीच्या कारभारामुळे भाविकांमधून होते नाराजी व्यक्त

  • 06 Jun 2023 12:31 PM (IST)

    बीडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हलगी नाद आंदोलन

    बीडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाचा सातवा दिवस

    परळी तालुक्यातील सर्वे नंबर 7 मधील सातबारावरील चुकीचे नाव, बोगस रजिस्ट्री रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोल

    जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार, आंदोलनकर्त्यांचा इशारा

  • 06 Jun 2023 12:28 PM (IST)

    शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून सुरू असलेला वाद निरर्थक – इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे

    शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून सुरू असलेला वाद निरर्थक – इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे

    ‘ज्यांना आता 350 वा शिवराज्याभिषेक करायचा आहे, त्यांनी करावा, ज्यांना पुढच्या वर्षी करायचा आहे त्यांनी तेव्हा करावा.’

    ‘तिथीनुसार करायचा की तारखेनुसार यामध्ये मी जाणार नाही’, डॉ. सदानंद मोरे यांचं स्पष्ट विधान

    शिवाजी महाराजांबद्दल रोज काहीतरी करता येईल, सोहळ्यावरून वाद करण्यांना सुनावलं

    ‘कोण काय म्हटलं यामध्ये मी जाणार नाही, राजकारणात मला पडायचं नाही’ – डॉ. सदानंद मोरे

  • 06 Jun 2023 12:24 PM (IST)

    छ. संभाजीनगर | शिवराज्याभिषेक सोहळ्यात अंबादास दानवे यांना तलवार फिरविण्याचा मोह

    छत्रपती संभाजीनगर येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यात अंबादास दानवे यांना तलवार फिरविण्याचा मोह

    शिवराज्याभिषेक सोहळ्यातील विरोधी पक्ष नेत्याच्या तलवारबाजीची सर्वत्र चर्चा

    क्रांती चौकात शिवराज्य अभिषेक सोहळ्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

    शिवकालीन शस्त्रे, त्या काळातील देखाव्याचं प्रदर्शन

  • 06 Jun 2023 12:21 PM (IST)

    ‘मंत्रिमंडळ विस्ताराला कोणताही मुहूर्त लागणार नाही’, विरोधी पक्ष नेत्याचं वक्तव्य

    ‘मंत्री न झाल्याने अनेकांना राग येईल, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार करणार नाही’

    ‘मंत्रिमंडळ विस्ताराला कोणताही मुहूर्त लागणार नाही’

    विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं मोठं विधान

    अंबादास दानवे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावरील विधानानं चर्चा

  • 06 Jun 2023 12:17 PM (IST)

    आयुक्तांच्या मागणीमुळे शिक्षण विभागातील बाजारीकरण चव्हाट्यावर, काय केली मागणी?

    शिक्षण विभागातील 72 अधिकाऱ्यांची खुली चौकशी करा, खुद्द शिक्षण आयुक्तांची मागणी

    शिक्षण विभागातील 72 अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासीठी खुद्द शिक्षण आयुक्तांनी केली मागणी

    शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे अँटी करप्शन ब्युरोला पत्र

    पत्रात केली 72 अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

    शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराबाबत स्वतः आयुक्तांनी पुढाकार घेतल्याने खळबळ

    आयुक्तांच्या मागणीमुळे शिक्षण विभागातील बाजारीकरण चव्हाट्यावर

    आयुक्तांच्या मागणीमुळे अनेकांचे धाबे दणाणले

    चौकशीत शिक्षण विभागातील मोठे गैर व्यवहार समोर येण्याची शक्यता

  • 06 Jun 2023 12:14 PM (IST)

    छ. संभाजीनगर | अंबादास दानवे यांनी घातली चंद्रकांत खैरे यांना टोपी

    अंबादास दानवे यांनी घातली चंद्रकांत खैरे यांना टोपी

    पूजेला बसलेल्या चंद्रकांत खैरे यांना अंबादास दानवे यांनी घातली टोपी

    अंबादास दानवे चंद्रकांत खैरे यांना लोकसभेलाही टोपी घालणार का? चर्चेला उधाण

    अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांना टोपी घालताच उपस्थित लोकांमध्ये कुजबूज सुरू

  • 06 Jun 2023 12:06 PM (IST)

    नितीश कुमार आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून चर्चा

    नितीश कुमार आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून चर्चा

    विरोधीपक्षांच्या बैठकीबाबत दोघांमध्ये झाली चर्चा

    १२ जून रोजी होणारी पाटण्यातील बैठक पुढे ढकल्याची माहिती

    काही नेत्यांच्या पूर्वनियोजित कामांमुळे बैठक पुढे ढकलली

    आता पाटण्यात नाही तर शिमला येथे नवी बैठक घेण्यास काँग्रेस आग्रही

  • 06 Jun 2023 11:52 AM (IST)

    कोल्हापूर | शिवाजी स्टेडियमवर फुटबॉल खेळाडूंमध्ये हाणामारी

    वेताळमाळ आणि हनुमान तालीम मंडळातील खेळाडूंमध्ये वाद

    कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन कडून सुरू आहेत स्पर्धा

    स्पर्धेदरम्यान झालेल्या वादाचे हाणामारीत रूपांतर

     

  • 06 Jun 2023 11:43 AM (IST)

    पुणे | पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय

    पुण्यातील येरवड्यात कोयता हातात घेत आरोपींकडून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न

    येरवड्यातील गांधी नगर मध्ये रविवारी घडली घटना

    कोयता आणि शस्त्र हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा आरोपींचा प्रयत्न

    पाच आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक

  • 06 Jun 2023 11:34 AM (IST)

    मंत्रिमंडळ विस्तारात १४ जणांनात संधी मिळण्याची शक्यता – सूत्र

    भाजपाच्या ७, शिवसेनेच्या ७ जणांना स्थान मिळण्याची शक्यता

    सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार छोटेखाणी होणार

    उर्वरित १४ मंत्रिपदांचा विस्तार ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होणार असल्याची माहिती समोर

    अन्य इच्छुकांची महामंडळावर बोळवण होणार?

  • 06 Jun 2023 11:24 AM (IST)

    आज मनसेच्या तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची बैठक

    राज ठकरे मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार

    बैठकीसाठी मनसेचे पदाधिकारी जमण्यात सुरुवात

  • 06 Jun 2023 11:19 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांना भिमा कोरेगाव आयोगानं समन्स पाठवून चौकशीसाठी बोलवावं

    वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आयोगानं पाठवलेल्या पत्राला दिलं उत्तर

    भिमा कोरेगाव आयोगानं प्रकाश आंबेडकरांना अशा घटना घडणार नाहीत यासाठी सल्ला विचारण्यासाठी बोलवलं होतं

    मात्र आधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन राज्याचे मुख्य सचिव आणि तत्कालीन पुणे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना आयोगापुढे बोलावण्यात यावं

    देवेंद्र फडणवीसांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत त्यानंतर मी सल्ला देतो, प्रकाश आंबेडकरांनी आयोगाकडे केली मोठी मागणी….

     

     

  • 06 Jun 2023 11:14 AM (IST)

    भाजपचं ‘संपर्क से समर्थन’ नवं अभियान; राज्यातील बड्या सेलिब्रिटींना भाजप भेटणार

    ‘संपर्क से समर्थन’ अभियानाअंतर्गत राज्यातील बड्या सेलिब्रिटींना भाजप भेटणार

    ऋषभ शाह, साजिद नाडियाडवाला, बोनी कपूर यांची भेट घेणार

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सेलिब्रिटींना भेटणार

    भाजप कोअर कमिटीची मुंबईत महत्त्वाची बैठक

    २५ पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नवीन अध्यक्ष नेमणार

  • 06 Jun 2023 11:07 AM (IST)

    350 वर्षात कुणाच्या मनात एखादा राजा कुणी असेल तर ते छत्रपती शिवाजी राजे – शरद पवार

    देशात राजे अनेक होऊन गेलेत त्यांचा इतिहास वेगळा आहे, 350 वर्षात कुणाच्या मनात एखादा राजा कुणी असेल तर ते छत्रपती शिवाजी राजे

    देशात अनेकांनी राज्य केलं, मात्र शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य केलं

    सर्वसामान्य माणसांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं

    शिवाजी महाराजांनी कष्टाने, त्यागाने राज्य मिळवलं

     

  • 06 Jun 2023 11:05 AM (IST)

    अहमदनगर | औरंगजेबाचे फोटो झळकावल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

    दोघांना अटकेनंतर मिळाला जामीन

    पोलीस ठाण्यातच बॉंडवर करण्यात आला जामीन

    सरफराज जहागीरदार आणी जावेद शेखचा जामीन मंजूर

  • 06 Jun 2023 10:57 AM (IST)

    हे भाजप-सेनेचं सरकार – राम शिंदे

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणाला संधी द्यायची हा निर्णय घेतील

    वरीष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल

  • 06 Jun 2023 10:56 AM (IST)

    अहिल्यादेवींच्या जयंती कार्यक्रमात मी नगर जिल्ह्याबाबत मागणी केली – राम शिंदे

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लागलीच या विनंतीला मान दिला

    अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवी होळकरनगर करण्याची घोषणा झाली

    बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयालाही अहिल्यादेवींचे नाव देण्यात आले

    या दोन्ही नामकरणामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

  • 06 Jun 2023 10:54 AM (IST)

    नितीशकुमार आणि उद्धव ठाकरे यांच्यात काल दूरध्वनीवर चर्चा

    विरोधी पक्षांच्या बैठकीबाबत चर्चा

    12 तारखेला पाटण्यात आयोजित बैठक पुढे ढकलली

    काही पक्षांच्या नेत्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे 12 तारखेला बैठकीला उपस्थित राहण्याबाबत असमर्थता दर्शवली

    नव्या तारखेबाबत नितीशकुमार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

    पाटणाऐवजी शिमलात बैठक व्हावी यासाठी काँग्रेस आग्रही

    काँग्रेस शासित राज्यात बैठकीसाठी काँग्रेसचे नेते आग्रही

    बैठकीला पक्षाच्या प्रमुख नेताच उपस्थित राहणे आवश्यक, प्रतिनिधी नको अशी नितीशकुमार यांची आग्रही भूमिका

    विरोधी पक्षांच्या एकजुटीआधीच मतमतांतरे

  • 06 Jun 2023 10:53 AM (IST)

    दिल्ली वारीच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बैठकी संदर्भात तर्क लावू शकत नाही – नरेंद्र भोंडेकर

    20 मंत्र्यांवर राज्याच्या कार्यभार सांभाळता येणार नाही

    आता लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे

    शिंदे साहेबांसोबत गुवाहाटीला गेलेल्या 10 अपक्ष आमदारांपैकी मी पहिला अपक्ष आमदार

    भंडारा जिल्ह्याला बाहेरचा पालकमंत्री नको तर जिल्ह्याचा पालकमंत्री असावा

    मला नाही तर भाजपच्या सामान्य कार्यकर्ता तरी पालकमंत्री बनवावा

  • 06 Jun 2023 10:48 AM (IST)

    बिहारमधील विरोधी पक्षांची बैठक तूर्तास लांबणीवर

    12 जूनला होणार होती विरोधी पक्षांची बैठक

    मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केली होती बैठक

    बैठकीला प्रत्युत्तर म्हणून भाजपची नवी रणनीती

    भाजप 15 नेत्यांना पाटण्यात पाठवणार

    केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे गिरीराज सिंह यांच्यासह पंधरा नेत्यांना बिहारमध्ये पाठवलं जाणार

    विरोधी पक्षांच्या बैठकीवेळी भाजपचे 15 नेते पाटण्यात दाखल होणार

  • 06 Jun 2023 10:47 AM (IST)

    आज होणारा राज्याभिषेक जोरदार आपल्याला पाहायला मिळतोय – अनिल देसाई

    त्या दिवशी जो झाला तो सामन्य माणसासाठी नव्हता तर राज्यकर्त्यांसाठी होता

    आज होत असलेला सर्व सामन्यांसाठी आहे

    येणाऱ्या काळात शिवसेनेचा राज्याभिषेक सोहळा होत असल्याचा आपल्याला पाहायला मिळेल

  • 06 Jun 2023 10:43 AM (IST)

    अहमदनगरमध्ये संदल दरम्यान औरंगजेबाचे फोटो नाचवल्याचे प्रकरण

    राज्यभरात फक्त राजकीय नाही तर धार्मिक क्षेत्रात देखील त्याचे तीव्र पडसाद उमटले

    नाशिकच्या महंत सुधीरदास महाराज यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका

    इतर वेळेस नाकाने कांदे सोलणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी आता अहमदनगरमध्ये घडलेल्या या घटनेचा खुलासा करावा

    महंत सुधीरदास महाराज यांनी केली मागणी

  • 06 Jun 2023 10:41 AM (IST)

    नाशिक महापालिकेकडून विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

    पर्यावरण दिनानिमित्त नाशिक महानगरपालिका आणि शहरातील स्वयंसेवी संस्थांकडून विशेष उपक्रमाचे आयोजन

    गोदावरी नदीच्या किनारी विशेष स्वच्छता मोहीम आणि प्लास्टिक संकलन मोहीम

    सर्व उपस्थित नागरिकांना स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली

    मोहिमेत सुमारे 250 ते 300 किलो कचरा जमा करत मनपाच्या घंटागाडीद्वारे खत प्रकल्प येथे पाठवला

  • 06 Jun 2023 10:39 AM (IST)

    नाशिकमध्ये शाळा, कॉलेजच्या 50 मार्गांवर सिटीलिंककडून बसचे नियोजन

    नाशिक शहर आणि परिसरात महापालिकेची बससेवा असलेल्या सिटीलिंककडून बसेसचे नियोजन

    गेल्या महिनाभरापासून शाळा, कॉलेजला सुट्टी असल्याने या मार्गांवर बससेवा बंद होती

    महापालिकेच्या वतीने सद्यस्थितीत 200 बसद्वारे शहर आणि उपनगरात नियमित बससेवा सुरू

    आता पुन्हा एकदा उत्पन्न वाढीसाठी 50 मार्गांवर बससेवा सुरू करण्यात येणार

  • 06 Jun 2023 10:36 AM (IST)

    पुण्यातील लाल महालात शिवराज्याभिषेक सोहळा सुरु

    शरद पवारांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा सुरु