Sanjay Rauat : ठेकेदारांचं हित लक्षात घेऊन मांडलेला अर्थसंकल्प – संजय राऊतांची टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला. यात शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याची घोषणा झाली. सत्ताधाऱ्यांनी कौतुक केले तरी, संजय राऊत यांनी याला 'ठेकेदारांसाठी' तयार केलेला अर्थसंकल्प म्हणत टीका केली. शेतकऱ्यांच्या खऱ्या गरजांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Sanjay Rauat : ठेकेदारांचं हित लक्षात घेऊन मांडलेला अर्थसंकल्प - संजय राऊतांची टीका
संजय राऊत
| Updated on: Mar 07, 2026 | 11:26 AM

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर केला. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी यासाह अनेक महत्वाचे निर्णय जाहीर करत मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी विविध घोषणाही केल्या. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केलं असलं तरी विरोधक मात्र या अर्थसंकल्पावर फार खुश नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे नते, खासदार संजय राऊत यांनीही या यअर्थसंकल्पावरून टिपण्णी केली आहे.
ठेकेदारांच हित लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडलेला दिसतोय, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्र सोडलं.

काय म्हणाले राऊत ?

शेतकऱ्यांना खरोखर कर्जमाफी मिळणार असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. राज्याचा शेतकरी संकटात आहे. विशेषत: आखाती युद्धामुळे, इराणच्या युद्धामुळे इथून जी निर्यात होते ती दुबईच्या पोर्टवर, अन्य पोर्टवर 8 दिवसांपासून तशीच पडून आहे. माल सडतोय, शेतकऱ्यांचे नुकसान होतंय. अशा शेतकऱ्यांना कर्ज काढावं लागतं, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलाय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार संपूर्ण कर्जमाफीच्या दिशेने जात असताना, ते सरकार पाडण्यात आलं. त्यामुळे आता ही जबाबदारी नव्या सराकरची आहे. खरोखर कर्जमाफी होणारा का हे पहावं लागेल. असं राऊत म्हणाले.

ठेकेदारांसाठी निर्माण झालेला अर्थसंकल्प

या अर्थसंकल्पाचं उत्तम विश्लेषण आदित्य ठाकरे यांनी केलं. हा ठेकेदारांसाठी निर्माण झालेला अर्थसंकल्प आहे, असं ते म्हणाले होते. ज्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर, योजना दिसत आहेत, हे ठेकेदारांचं हित लक्षात घेऊ अर्थसंकल्प तयार केलाय हे स्पष्ट दिसतंय असंही राऊत यांनी नमूद केलं.

कर्जमाफी नको, शेतकऱ्यांना हवाय हमीभाव

शेतकऱ्यांना कर्जमाफी पण नकोय, त्यांना फक्त हमीभाव हवा आहे. त्यांच्या मालाला भाव हवाय, मालासाठी विमाकवच हवं आहे. युद्धामुळे दुबईच्या पोर्टवर माल पडून आहे,  त्याच्या इन्श्युरन्सचं, त्याच्या भावाचं काय, त्याच्या नुकसानीचं काय? हाच महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांना या परिस्थितीची जाणीव आहे का ? इराण-अमेरिका-इस्त्रायलच्या युद्धामुळे फक्त गॅस आणि तेलाचा प्रश्न नाहीये. आपल्या शेतकऱ्यांनी मालाची, कृषी उत्पादनाची जी निर्यात केली आहे, तो माल ठिकठिकाणी अडकून पडलाय, काही ठिकाणी तो सडलाय, हे मोठं नुकसान आहे, असंही राऊत म्हणाले.

 

Follow Us