अमरावतीने राज्याचं टेन्शन वाढवलं, कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

| Updated on: Feb 18, 2021 | 1:29 PM

मुंबई, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची सगळ्यात जास्त संख्या असल्याचं समोर आलं आहे.

अमरावतीने राज्याचं टेन्शन वाढवलं, कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
Follow us on

अमरावती : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. अशात मुंबई, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची सगळ्यात जास्त संख्या असल्याचं समोर आलं आहे. आज अमरावती जिल्ह्यात 498 रुग्ण कोरोणा पॉझिटिव्ह आलेले आहे. तर सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे काल सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. (maharashtra corona update Amravati raises tensions patients grow faster than mumbai)

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर जिल्ह्यात कोरोनाची पुर्ववत परिस्थिती निर्माण होऊन पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही. कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना आणखी कठोर होऊ नये यासाठी सर्व नागरीकांनी ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेविअर’ चे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व आस्थापना, हॉटेल्स, खाद्यगृहे, रेस्टॉरेंट, बार, लग्न समारंभ, सर्व प्रकारची दुकाने आदींसाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार आज रात्रीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. खरंतर, लोकांमध्ये आधीसारखी कोरोना जनजागृती होत नाही आहे. मास्क ना वापरणं, गर्दी करणं, सामाजिक अंतर न ठेवनं, वेळीच उपचार न घेणं तसंच बदलेलं वातावरण इत्यादी कारणांमुळे कोरोनाने आता पुन्हा युटर्न घेतला आहे. अशात अमरावतीमध्येही धोका वाढत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांनी दिली आहे.

अमरावतीत बुधवारी काय होती कोरोनाची आकडेवारी?

दिवसभरात नवीन कोरोना पॉझिटीव्ह – 498

मृत रुग्णांची संख्या – 6

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या – 149

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्ण संख्या – 26726

आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या – 24419

आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या – 448

एकूण रुग्णांवर उपचार सुरू – 1859

कोरोणा रोखण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांचे कडक पाऊल

– विवाह सोहळ्यात 50 पेक्षा जास्त नागरिक आढळल्यास मंगल कार्यालय संचालकाला 50 हजार रुपये दंड तसेच आई वडिलांवरवर ही कारवाई होणार. 50 पेक्षा जास्त लोक असल्यास 500रू प्रती नागरिक दंड.

– हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त नागरिक आढळल्यास 25 हजार रुपयांचा दंड.

– हॉटेलची वेळ रात्री 11 वरून 10 करण्यात आली आहे.

– होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांकडून बंध पत्र घेणार कोरोना नियमाचं उल्लंघन केल्यास 25 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

– शहरातील गजबजलेली आणि मुख्य बाजारपेठ समजणारी सक्कर साथ या बाजारपेठेतील दुकाने सायंकाळी 6 वाजताच बंद करण्याचा निर्णय (maharashtra corona update Amravati raises tensions patients grow faster than mumbai)

संबंधित बातम्या – 

सांगलीत अवकाळी पावसामुळे सावळज गावात द्राक्षाची बाग पडली, लाखो रुपयांचं नुकसान

कोरोनाग्रस्त वाढतेच, ‘त्या’ तीन शहरांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेणार : अजित पवार

कोरोनाचा धोका वाढला; पुण्याच्या आयुक्तांकडून हॉटेल्स, मॉल्स आणि मंगल कार्यालयांना इशारा

कोरोनाच्या युटर्नमुळे राज्यात धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यामध्ये घरं सील करण्याचा पालिकेचा निर्णय

(maharashtra corona update Amravati raises tensions patients grow faster than mumbai)