AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update | राज्यात तीन दिवसात 25 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार

महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसात 25 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update).

Corona Update | राज्यात तीन दिवसात 25 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 19, 2020 | 12:55 AM
Share

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसात 25 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून दररोज 8 हजारांपेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाखांच्या पार गेला आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी नव्या कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंतेची बाब आहे (Maharashtra Corona Update).

राज्यात शनिवारी (18 जुलै) दिवसभरात 8 हजार 348 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 937 वर पोहोचला आहे. त्याआधी म्हणजे 17 जुलै रोजी 8 हजार 308 नवे रुग्ण आढळले होते. तर 16 जुलै रोजी राज्यात सर्वाधिक 8 हजार 614 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

राज्यात शनिवारी दिवसभरात 5 हजार 306 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 लाख 65 हजार 663 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 23 हजार 377 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.50 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात शनिवारी दिवसभरात 144 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये फक्त मुंबईतील 65 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.85 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 11 हजार 596 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 15 लाख 22 हजार 564 नमुन्यांपैकी 3 लाख 937 नमुने पॉझिटिव्ह (19.76 टक्के) आले आहेत. राज्यात 7 लाख 40 हजार 884 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 45 हजार 552 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात गेल्या 10 दिवसात किती रुग्ण वाढले?

  • 8 जुलै 2020 – 6 हजार 603 रुग्ण
  • 9 जुलै 2020 – 6 हजार 875 रुग्ण
  • 10 जुलै 2020 – 7 हजार 862 रुग्ण
  • 11 जुलै 2020 – 8 हजार 139 रुग्ण
  • 12 जुलै 2020 – 7 हजार 827 रुग्ण
  • 13 जुलै 2020 – 6 हजार 497 रुग्ण
  • 14 जुलै 2020 – 6 हजार 741 रुग्ण
  • 15 जुलै 2020 – 7 हजार 975 रुग्ण
  • 16 जुलै 2020 – 8 हजार 614 रुग्ण
  • 17  जुलै 2020 – 8 हजार 308 रुग्ण
  • 18 जुलै 2020 – 8 हजार 348 रुग्ण

हेही वाचा : Corona Vaccine | कोरोनाच्या लसीचा फॉर्म्युला चोरण्यासाठी हॅकिंग, रिसर्च लॅब अलर्टवर

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?