VIDEO | नागझिरा अभयारण्याजवळ वाघाकडून गायीची शिकार, वन विभाग म्हणतं गावात वाघच नाही

नागरिकांना वाघाचे दर्शन होऊनही वन विभाग मात्र गोरेगाव तालुक्यात परिसरात वाघ नसल्याचे म्हणतो. त्यामुळे वन विभागाच्या भूमिकेवरच संशय निर्माण झाला आहे.

VIDEO | नागझिरा अभयारण्याजवळ वाघाकडून गायीची शिकार, वन विभाग म्हणतं गावात वाघच नाही
वाघाकडून गायीची शिकार


गोंदिया : नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार गाव परिसरात वाघाने हल्ला करुन गायीला ठार केले. या घटनेने परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. वाघाने केलेल्या शिकारीच्या थराराची दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

काय आहे प्रकरण?

नागरिकांना वाघाचे दर्शन होऊनही वन विभाग मात्र गोरेगाव तालुक्यात परिसरात वाघ नसल्याचे म्हणतो. त्यामुळे वन विभागाच्या भूमिकेवरच संशय निर्माण झाला आहे. गोरेगाव तालुक्यातील नागरिक दहशतीत असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नागरिक दहशतीच्या छायेत

मुंडीपार जंगल परिसराला लागून गाव आणि शेती आहे. इथल्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे. मात्र आता अभयारण्यातील वाघ शेताकडे आणि गावाकडे धाव घेत आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना शेतीची कामेदेखील करणे कठीण झाले आहे. तेव्हा वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली असली तरी वन विभाग कुंभकर्णी झोपेत आहे.

पाहा व्हिडीओ :

राजस्थानात अजगराची निर्घृण हत्या

दुसरीकडे, अजगराला कुऱ्हाडीने वार करुन निर्घृणपणे ठार मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानमध्ये उदयपूर जिल्ह्यातील परमदा ग्राम पंचायती अंतर्गत येणाऱ्या भागात हा प्रकार घडला. शेतात आलेल्या अजगराला गावकऱ्यांनी अत्यंत निर्दयीपणे जीवे मारलं. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

शेतात आलेल्या अजगराने आधी एका प्राण्याची शिकार केली होती, त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी कुठलीही दयामाया न दाखवता अजगराची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. विशेष म्हणजे काही जण अजगराला मारत असताना गावातील नागरिकही काहीही न बोलता शांतपणे या प्रकाराचे मूक साक्षीदार झाले. वन्यजीव कायद्याच्या अंतर्गत वन्य प्राण्यांना मारहाण करणे किंवा जीवे ठार मारणे हा गुन्हा आहे. वन विभागाचे पथक संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

संबंधित बातम्या : 

पायाला पीळ मारण्याचा प्रयत्न, वसईत अग्निशमन दलाच्या जवानांकडून साडेसात फुटी अजगराची सुटका

मुंबईतील वांद्रे परिसरात 24 तासात दोन अजगर सापडले!

धारावीतील घरात अजगराची एन्ट्री, जांबाज पोलिस शिपायाकडून थरारक सुटका

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI