नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही; सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट…

नोकरभरतीच्या पेपर फोडणाऱ्यांची खैर नाही. आता पेपर फोडणाऱ्यांवर 10 कोटींचा दंड ठोठावला जाणार आहे. तसेच आरोपींना शिक्षेची देखील तरतूद करण्यात आली आहे.

नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही; सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट...
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 24, 2026 | 12:10 PM

मागील अनेक महिन्यात पेपर फुटीच्या अनेक घटना घडल्या. एमपीएससी आयोगाचे नोकरभरतीच्या पेपर फुटल्याचे समोर आले. पेपरफुटीच्या आडून काळा कारभार सुरू होता. या कारभाराला सरकारकडून चाप बसवला जाणार आहे. सरकारच्या नव्या कायद्याने आता पेपर फोडणाऱ्यांची खैर नाही. आता पेपरफुटी करणाऱ्यांवर 10 कोटींचा दंड ठोठावला जाणार आहे. तसेच 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिफारस करण्यात आली आहे.   भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल सादर करण्यात आला. त्यात पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची शिफारस करण्यात आली आहे.

संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती आणि संस्थांना ७ ते १० वर्षांच्या कारावासाची शिफारस करण्यात आली आहे. किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची तरतूद सुचवली आहे. अनुचित साधनांचा वापर करणाऱ्यांना ५ ते १० वर्षे कारावास आणि ५० लाखांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. गैरप्रकारात सहभागी सेवा पुरवठादार संस्थांना ५ कोटींपर्यंत दंड आणि ८ वर्षांसाठी बंदी घातली आहे. परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची शिफारस करण्यात आली आहे. गंभीर प्रकरणांच्या तपासासाठी विशेष कृती दल (STF) स्थापन करण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. परीक्षा गैरप्रकारांचे खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची शिफारस करण्यात आली आहे.

Loading...

सरकारच्या निर्णयाने एमपीएससी परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची शिफारस केली जाणार आहे. तसेच उत्तरतालिकेवरील उमेदवाराची हरकत योग्य ठरल्यास हरकतीसाठी भरलेले शुल्कही परत मिळणार आहे. दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांसाठी आधार किंवा MahaID द्वारे एकदाच नोंदणीची सुविधा मिळणार आहे. परीक्षांवर देखरेख ठेवण्यासाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे.  परीक्षा प्रक्रियेत मोठे प्रशासकीय बदल सुचवण्यात आले आहेत.

रिक्त पदांची माहिती वेळेत मिळण्यासाठी Integrated Requisition Portal विकसित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.  सप्टेंबरअखेरपर्यंत विभागांनी भरतीचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक (Venue Bank) तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या निवडी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याची सूचना करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेतील सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचललं आहे.  राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया पद्धतीत सुधारणा करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२६ रोजी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली.  समितीचा दुसरा अहवाल २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनाला सादर करण्यात आला आहे. या शिफारशींच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल पाहायल मिळण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us